दिव्यांग कल्याणकारी विभागाच्या दालनामध्ये बैठक आयोजन केली.

 दिव्यांग कल्याणकारी विभागाच्या दालनामध्ये बैठक आयोजन केली.

उल्हासनगर: दि, 10/05/2023 रोजी उल्हासनगर महानगरपालिका दिव्यांग कल्याणकारी विभागामध्ये उल्हासनगर शहरांमधील दिव्यांग हितार्थ कार्य करणारे संघटना यांनी दिनांक 11/5/2023 रोजी दिव्यांग बांधवांच्या हितार्थ मागणी पत्राद्वारे " *ठिय्या आंदोलन* " करण्याचे योजले होते, तत्पूर्वी दिव्यांग विभागाचे अधिकारी राजेश घणघाव, दिव्यांग विभाग प्रमुख, संतोष खोटरे ,दिव्यांग विभाग लिपिक यांनी आंदोलन कर्त्यांच्या शिष्टमंडळाची दिनांक 10/5/2023 रोजी दुपारी 3.00 वा. दिव्यांग कल्याणकारी विभागाच्या दालनामध्ये बैठक आयोजन केली. यावेळी ठिय्या आंदोलन आयोजित केलेल्या शिष्टमंडळांनी दिव्यांग आधार सेवा संस्थेचे अध्यक्ष सचिन राम सावंत, अंध हितकारी संस्था चे अध्यक्ष जगदीश पाटील, अपंग भाविक सेवा अध्यक्ष विक्रम उदासी, विकलांग गुरुकृपा शक्ती अध्यक्ष विजय सिंग लबाना, दिव्यांग संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेश गायकवाड, तसेच बी. आर. पाटील, छाया सावंत, जनहित न्यूज चैनल चे संपादक हरी आल्हाट , ज्योती पवार, संगीता साळवे यांच्या उपस्थितीमध्ये दिव्यांग बाबतीत उपस्थित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी दिव्यांग कल्याणकारी योजनेचे संबंधित अधिकारी यांनी उपस्थित मुद्द्यांवर योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करण्याचे आश्वासन दिले व दिनांक 11/5/2023 चे आंदोलन हे मागे घेण्याबाबत विनंती केली. तूर्तास आयोजित केलेले आंदोलन हे पंधरा दिवसांकरिता मागे घेण्यात येत आहे. अशी माहिती सचिन राम सावंत यांनी दिली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार