लोकांनी बुद्ध वाचला पाहिजे- मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड.

लोकांनी बुद्ध वाचला पाहिजे- मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड.
पद्मश्री रमेश पतंगे यांच्या तथागतांचा कर्तव्य धर्ममार्ग पुस्तकाचे प्रकाशन संपन्न.

लातूर : साप्ताहिक विवेक नी प्रकाशीत केलेले पद्मश्री रमेश पतंगे यांच्या तथागतांचा कर्तव्य धर्ममार्ग पुस्तकाचे प्रकाशन लातूर चे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मभूषण आदरणीय डॉ अशोक कुकडे काका यांच्या विशेष उपस्थितीत आणि लातूर चे खासदार सुधाकर शिंगारे,संजय कांबळे  यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
प्रमुख वक्ता संजय कांबळे यांनी तथागताचा कर्तव्य धर्ममार्ग या पुस्तकाच्या संदर्भात माहिती दिली.सुधाकर सिंगारे यांनी ही आपले मत व्यक्त केले.पद्मभूषण डॉ अशोक कुकडे काका यांनी आपल्या मनोगतात १९५४ पासून बुद्ध शी माझा अभ्यास आहे असे सांगून जातक कथा च्या माध्यमातून बुद्धाचे ज्ञान लोकापर्यंत गेले आहे असे म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करताना माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड म्हणाले की पद्मश्री रमेश पतंगे यांनी लिहलेला ग्रंथ तथागतांचा कर्तव्य धर्ममार्ग पुस्तक हे सर्वांनी वाचले पाहिजे आणि लेखकांनी बुद्धांच्या जातक कथेचा संदर्भ देत सध्याच्या परिस्थिती वर लिखाण केले आहे. समाजातील गैर समज दूर झाले पाहीजेत आणि बुद्ध शिकवणी नुसार जीवन जगले पाहिजे,जो त्रिशरण पंचशील ग्रहण करतो तो सर्वश्रेष्ठ मानव होतो असे डॉ सुनील बळीराम गायकवाड म्हणाले.आचरणानी बुद्ध झाले पाहिजे त्यासाठी बुद्ध वाचले पाहिजे असे ही म्हणाले.पद्मश्री रमेश पतंगे यांच्या तथागतांचा कर्तव्य धर्ममार्ग पुस्तकाचे प्रकाशन संपन्न कार्यक्रमाच्या वेळी मा. खासदार सुनील बळीराम गायकवाड यांच्या कार्याचे कौतुक बहुजन संग्रामचे महाराष्ट्र अध्यक्ष व वृत्तदर्शन मीडियाचे संपादक भीमराव चिलगावकर यांनी केले
लातूर च्या बुद्धा गार्डन च्या सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी लोक उपस्थित होते. सूत्र संचलन साप्ताहिक विवेक चे मराठवाडा संयोजक विलास आराध्य,आभार धन्वंतर पाठक यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशील धारण करून केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार