लावणी सम्राज्ञीवर आली बसस्टॉपवर भीक मागण्याची वेळ.

लावणी सम्राज्ञीवर आली बसस्टॉपवर भीक मागण्याची वेळ.कोपरगांव:( गणेश तळेकर)
सध्या सोशल मीडियावर एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत ही महिला या रावजी बसा भावोजी हे गाणे हातवारे करत गात आहे. या महिलेला तुम्ही ओळखळलंत का? ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर आहेत.                    
सध्या त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे सांगितले जात आहे.

कोपरगाव येथील बस स्थानकावर त्या गेल्या अनेक वर्षांपासून भीक मागत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे त्या कलावंत असल्याचे समजले. कोपरगावचे बसस्थानक हेच त्यांचे घर बनले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच स्थानिक कार्यकर्त्यांनी शांताबाई यांना हुडकून काढले. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शांताबाई कोपरगावकर यांना शासनाने आर्थिक मदत मिळवून द्यावी आणि कलावंतांची दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे. सुरेखा पुणेकर यांनी देखील शांताबाईंना योग्य ती मदत मिळवून द्यावी असे म्हटले आहे.

या घटनेनंतर शांताबाईंचे मानसिक संतुलन बिघडले

शांताबाई कोपरगावकर यांचे सध्याचे वय ७५ वर्षे आहे. एकेकाळी शांताबाईंनी आपल्या लावणी नृत्याने लालबाग परळमधील हनुमान थिएटर गाजवले होते. त्यावेळी कोपगाव बसस्थानकावर काम करणाऱ्या कर्मचारी अत्तार भाईंशी त्यांची ओळख झाली होती. अत्तार भाईंनी शांताबाईंच्या नावाने तमाशा फड काढला. शांताबाईंना त्यांनी या फडाची मालकीण बनवले होते. महाराष्ट्रात जत्रा यात्रामध्ये शांताबाईंनी अनेक कार्यक्रम सादर केले. बक्कळ पैसा कमावला. पुढे अत्तार भाईंनी त्यांचा तमशा फड विकायला काढला. यात शांताबाईंची मोठी फसवणूक करण्यात आली.या घटनेनंतर शांताबाईंचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्या बसस्थानकावर भीक मागू लागल्या. पन्नास साठ लोकांचे पोट भरणाऱ्या शांताबाईंची बिकट अवस्था झाली आणि त्या रस्त्यावर आल्या.लावणी सम्राज्ञी शांताबाई यांची आपल्या असोसिएशनच्या काही कार्यकर्त्यांनी जाऊन भेट घेतली व चौकशी केली  २१/६/२०२३ रोजी त्याच बरोबर आखिल भारतीय तमाशा परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष श्री संभाजीराजे जाधव यांच्या सोबत मी फोन वर चर्चा केली ते आणि त्यांचे सहकारी पण २२ जून ला कोपरगाव येथे जाऊन चौकशी केली आणि शिर्डीच्या साईबाबा हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. तसेच शांताबाई यांना जीवनाशक लागणार्या वस्तू त्यांना देण्यात आल्या आहेत.
शांताबाई यांचे भाऊ त्यांची बायको. आणि इतर नातेवाईक कोपरगाव येथे राहतात तिचा सांभाळ पण करतात परंतु शांताबाई यांचे मानसिक संतुलन हरपल्याने ही परिस्थिती त्यांची आहे. समस्त तमाशा फड मालकांनी त्यांची दखल घेतली आहे. त्यांना औषधे उपचारांची गरज आहे. 
आपण सर्वांनी देवा जवळ हिच प्रार्थना करावी शांताबाई यांची तब्बेत पुर्णपणे बरी व्हावी
ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबई ( अध्यक्ष ) श्री सुभाष जाधव.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार