उल्हासनगर महानगरपालिका इमारतीमध्ये राहत असलेले कर्मचारी यांना भरमसाठ घर भाडे कपात करूनही मूलभूत सुविधा मिळत नाहीत

उल्हासनगर महानगरपालिका इमारतीमध्ये राहत असलेले कर्मचारी यांना भरमसाठ घर भाडे कपात करूनही मूलभूत सुविधा मिळत नाहीत उल्हासनगर महानगरपालिकेच्या ए बी आणि सी अशा एकूण तीन इमारती उल्हासनगर महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांना राहण्याकरिता दिलेल्या आहेत या इमारतीमध्ये एकूण 128 खोल्या आहेत,प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्यांच्या वेतनातून घर भाडे कपात होत आहे उल्हासनगर महानगरपालिका इमारतीमध्ये मागील अनेक वर्षापासून पाणीपुरवठा करणारी जलपरी ही मोटर बंद पडली असून स्थानिक रहिवासी यांना पिण्याचे पाणी मिळत नाही,घराच्या खिडक्या व दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असून याची डागडुजी सुद्धा महानगरपालिका करीत नाही,पीडब्ल्यूडी विभागाकडे या इमारतीचे विकास कामाची मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मिळत असतानाही पीडब्ल्यूडी विभागाने या इमारतीची कोणतीही डागडुजी केली नाही,कर्मचाऱ्यांच्या वेतनातून घर भाडे रुपये सहा हजार पासून  साडे आठ हजार रुपये पर्यंत घर भाडे कपात होत आहे परंतु कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या इमारतीमध्ये सुविधा मिळत नाही,अशा तक्रारी इमारतीमध्ये राहत असलेले कर्मचारी करीत आहेत,
दिनांक १७/०८/२०२२ रोजी उल्हासनगर महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी यांच्या हक्काच्या घराबाबत प्रलंबित असलेले प्रकरण घेऊन हरि चंदर आल्हाट यांनी,उल्हासनगर महानगरपालिका चे आयुक्त यांना निवेदन देण्यात आले होते, हरि चंदर आल्हाट तसेच त्यांचे सहकारी यांनी उल्हासनगर महानगर पालिका आयुक्त अजीज शेख यांना उल्हासनगर महानगर पालिका वसाहती मध्ये राहतं असलेल्या सफाई कर्मचारी यांना हक्काची घरे देण्यात यावी असे लेखी पत्र देवून विनंती केली होती त्याची दखल घेऊन तत्काळ आयुक्त साहेब यांनी उप आयुक्त व संबधित अधिकारी यांना आदेश दिलें होतें की लवकरात लवकर सफाई  कामगारांच्या मालकी हक्काच्या घरांचा प्रश्न सोडवण्यात यावा, परंतु कोणत्याही अधिकाऱ्यांनी या कामगारांच्या प्रश्ना कडे लक्ष दिले नाही, मागील ३७ वर्षा पासून महानगर पालिका वसाहती मध्ये आपल्या परिवारा सोबत राहतं असलेले हरी चंदर आल्हाट   मागील १५ वर्षा पासून सफाई कामगारांना हक्काची घरे मिळावी या साठी मागणी करीत आहेत, सन १९८४ मध्ये नगरपालिकेने ३ दुमजली इमारती ६४ सफाई कर्मचारी यांना राहण्या साठी दिल्या होत्या त्या कामगारांच्या जुन्या इमारती सन २०१२ साली  धोकादायक घोषित करून निष्कासीत करण्यात आल्या होत्या त्या वेळी इमारती मध्ये राहत असलेल्या ६४ कर्मचाऱ्यांना  आवास योजना अंतर्गत  मालकी हक्काचे घरे देण्यात येतील असे उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांनी सुचित करून मोडकळीस आलेल्या इमारती निष्काशीत करून त्याच ठिकाणी नव्याने योजनेअंतर्गत इमारती बांधून देण्यात येतील असे लिखित आश्वासन दिले होते, त्या वेळी माजी नगरसेविका जया मोहन साधवाणी , मोहन साधवानी, तसेच आमदार बालाजी किणीकर आणि आयुक्त, आणि युनियन संघटना चे अध्यक्ष यांनी कामगारांना आश्वासन देवून इमारती खाली करण्यासाठी समजूत काढली होती, त्या नंतर नवीन इमारती चे बांधकाम सुरू केले होते व ह्या निविन इमारती बांधल्या व त्या इमारतीमध्ये  श्रम साफल्य योजनेच्या अंतर्गत विज मीटर सुद्धा बसविण्यात आले आहेत सन २०१६/१७ साली म न पा आयुक्त निंबाळकर साहेब यांच्या कारकिर्दीत जुन्या इमारती मधील सफाई कर्मचारी यांच्या सोबत हरी चंदर आल्हाट यांनी आयुक्त निंबाळकर साहेब यांना भेट देवून सफाई कामगार यांच्या मालकी हक्काच्या घरासाठी मागणी केली असता आयुक्त निंबाळकर साहेब यांनी माहिती दिली की योजनांची निधी आली होती ती निधी महानगर पालिका ने परत केली असल्या मुळे योजनेची दुसरी निधी मिळे पर्यंत सफाई कामगारांना अल्प प्रमाणात रुपये १७०० से ते २१०० तसेच मेंटेनन्स चे अतिरिक्त १२० रुपये अशा प्रकारे भाडे तत्वावर देण्यात येतील अशी माहिती दिली व सफाई कामगार यांना आश्वासन दिले की लवकरच योजनेची निधी मागवून घेवून सफाई कर्मचाऱ्यांच्या मालकी हक्काच्या  घरांचा प्रश्न सोडवू , असे आश्वासन देवून लॉटरी पद्धतीने घराच्या चावी वाटप करण्यात आल्या होत्या, त्या नंतर काही काळातच निंबाळकर साहेब यांची बद्दली झाल्या मुळे पुन्हा वसाहती मध्ये राहत असलेल्या कामगारांना अडचणीला सामोरे जावे लागले , अचानक म न पा ने वसाहती मध्ये राहत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मिळणाऱ्या मासिक वेतनातून पूर्ण HRA कपात करणे सुरू केले , जे बेसिक प्रमाणे अंदाजे रुपये ४८०० पासून ७८०० पर्यंत कपाती सुरू झाल्या त्या मुळे सफाई कामगारांना आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणे व मुलांच्या शिक्षणावर खर्च करणे त्रासदायक झाले असून, त्यातच उल्हासनगर महानगरपालिका ने ह्या इमारती दुरुस्ती करण्यासाठी एकही रुपया खर्च केलेला नाही, सफाई कामगारांच्या वसाहतीमध्ये, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या लावण्यात आलेल्या आहेत परंतु, पाण्याच्या मोटरी बंद आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही, तीन पैकी फक्त एका इमारती मध्ये लिफ्ट बसवून दिली आहे ती सुद्धा सतत बंद पडत आहे,कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे, भरमसाठ HRA कपात होत असल्याने अनेक कामगारांचे विज बिल थकले आहे, या सर्व कामगारांच्या समस्या म न पा आयुक्त अजिज शेख यांच्या समोर मांडल्या  असता, म न पा आयुक्त अजीज शेख यांनी उप आयुक्त यांना आदेश दिलें होतें लवकरात लवकर पाठ पुरावा करून सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर देण्यात यावे असे आदेश दिलें होते परंतु आजपर्यंत कोणतेही दिलेले आश्वासन पूर्ण झाले नसल्याने कामगारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे, सध्या उल्हासनगर मुन्सिपल लेबर युनियन ने पुढाकार घेतला असून लवकरच कामगारांना न्याय देण्यासाठी उल्हासनगर महानगर पालिका आयुक्त यांना निवेदन पत्र देवून कामगारांच्या समस्या सोडविण्याची विनंती करू असे आश्वासन युनियन संघटनाचे रमेश आगळे यांनी दिले आहे,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार