राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या २६ जून २०२३ रोजी १४९ व्या जयंती निमित्तानेराज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या २६ जून २०२३ रोजी १४९ व्या जयंती निमित्ताने
राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा
( प्रतिनिधी आशा रणखांबे ) उल्हासनगर / ठाणे
श्रावस्ती युवा सेवाभावी संस्था आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच, उल्हासनगर, जि. ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या २६ जून , २०२३ रोजी १४९ व्या जयंती निमित्ताने संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सर्वांना विनंती आहे की सदर स्पर्धेत आपण जास्तीत जास्त सहभागी व्हावे तसेच आपल्या संपर्कातील विद्यार्थी वर्गाला सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे.
आपले निंबध, लेखन दिलेल्या लिंकवर
(https://forms.gle/SroLb6rYWbjR5Jm48)
२२ जुन २०२३, रोजी ठिक रात्री ९:०० वाजेपर्यंत पाठवायचे आहेत.
प्रथम पारितोषिक : २०००/- + सर्टिफिकेट , द्वितीय पारितोषिक : १०००/- + सर्टिफिकेट , तृतीय पारितोषिक : ५००/- + सर्टिफिकेट . ३ उत्तेजनार्थ पारितोषिक ३०० /- + सर्टिफिकेट सर्व स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल सर्टिफिकेट देण्यात येतील.
स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण समारंभ रोजी गुगल मिटच्या माध्यमातुन होईल.
आयोजक:
डॉ. सुमेध पारधे
आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक,विचारवंत आणि आंतरराष्ट्रीय राजनीती विषयाचे अभ्यासक
Visiting Faculty in Mumbai University (MA, M.Phil., Ph.D. in International Relations from Central University of Gujarat)
9422707787
जीवनसंघर्षकार नवनाथ आनंदा रणखांबे
(साहित्यिक, आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक व विचारवंत, आंतरराष्ट्रीय , राष्ट्रीय , राज्यस्तरीय विविध पुरस्काराने सन्मानित, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विविध बुक ऑफ रेकॉर्ड धारक )
M.A. History, LL.B., DJ & MC
अॅड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे
(आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक, वक्ते व विचारवंत)
B.A., LL.B., LL.M., M.A. IN PALI, PGD IN DR. BABASAHEB AMBEDKAR THOUGHT'S
7045991143
इंजि. गौतम विजय बस्ते
BE, LLB, MBA , M.A. IN PSY, MA IN PALI (II), PGD IN AT, MA IN AMBEDKAR STUDIES (I), PGDCFT
श्रावस्ती युवा सेवाभावी संस्था 8308271107
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्र लिहून राजर्षी छ. शाहू महाराजांना, "तुम्ही लोकशाहीचे आधार स्तंभ आहात". असे म्हटले होते त्याचबरोबर छत्रपति शाहू महाराजांची जयंती ही "दिवाळी सणासारखी साजरी केली पाहिजे" असे बाबासाहेब म्हणतात.
*स्पर्धेचे विषय खालील प्रमाणे देण्यात आलेले आहेत*
*स्पर्धेचे विषय* :-
*गट अ (वय : १५ ते २२ वर्ष)* :-
१. राजर्षी छ. शाहू महाराज यांचे राजकीय, सामाजिक व शैक्षणिक धोरण.
२. राजर्षी छ. शाहू महाराज यांचे जनकल्याणकारी राज्य.
३. तत्कालीन कोल्हापूर संस्थानचा सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक विकास आणि राजर्षी छ. शाहू महाराज यांचे योगदान.
४. राजर्षी छ. शाहू महाराज यांना पत्र.
*गट ब (वय : २२ - ३० वर्ष )*
१. सामाजिक परिवर्तनाच्या आंदोलनात राजर्षी छ. शाहू महाराज यांचे योगदान.
२. आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते राजर्षी छ. शाहू महाराज.
३. सत्यशोधक आंदोलन आणि राजर्षी छ. शाहू महाराज.
*गट क (वय : ३० वर्ष + )* :-
१. स्त्रियांच्या सामाजिक प्रगतीसाठी राजर्षी छ. शाहू महाराज यांनी केलेले कार्य.
२. राजर्षी छ. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर हे आधुनिक समाजरचनेचे जनक.
३. कला व खेळ या क्षेत्रात राजर्षी छ. शाहू महाराज यांचे योगदान.
४. वर्तमानातील खाजगीकरण निती आणि राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या विचारांची गरज.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद