.मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा टँकर उलटला आहे.
मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणामपुण्यातून टँकर अपघाताची मोठी अपघात घडली आहे. गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना घडली आहे. चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने आज पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा टँकर उलटला आहे. यामुळे या जुन्या महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात काल मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या दरम्यान गॅस कॅप्सूल टँकरचा अपघात झाला. गॅस कॅप्सूल टँकर चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने वाहन उलटून हा अपघात झाला आहे.
मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बीपीसीएल कंपनीच्या या गॅस टँकरचा अपघात झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील जुन्या पुणे - मुंबई महामार्गावरील मधुकरराव पवळे पुलाच्या सुरुवातीलाच हा अपघात झाला आहे.वायू गळती थांबवण्याचा प्रयत्न सुरू
गॅस टँकरचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यांनंतर पिंपरी चिंचवड महापालिकेचे अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी वायू गळती थांबवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
ज्या ठिकाणी अपघातग्रस्त टँकरमधून गॅस गळती झाली आहे. तो भाग वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद करण्यात आला आहे. तसेच दुपारी तीन वाजेपर्यंत वायू गळती थांबवण्याचा प्रयत्न अग्निशमन विभाग करत आहे.
अग्निशमन दल, पोलीस मदतीला धावले
दरम्यान, टॅकरचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अग्निशमन विभागाची टीम तसेच मुख्य अग्निशमन अधिकारी विजय थोरात, अग्निशमन अधिकारी चिपाडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, पोलीस उपायुक्त विवेक पाटील ,सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, उपायुक्त रविकिरण घोडके, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे व इतर 50 पोलीस पोहोचले. त्यांच्याकडून पुढील कार्यवाही सुरू आहे. सध्या गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वाहने आलेली असून कार्यवाही सुरू आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद