मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या,बी आर एस, पक्षांची पत्रकार परिषद पार पडली

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या,बी आर एस, पक्षांची पत्रकार परिषद पार पडली
मुंबई : मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान येथे दिनांक  ६ जुलै २०२३रोजी 
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या,बी आर एस, पक्षांची पत्रकार परिषद पार पडली
पक्षांचे नेते मानिक कदम, समन्वय समिती महाराष्ट्र राज्य,व खासदार हरिभाऊ राठोड,नेते,बी आर एस पक्ष
अशोकराव आल्हाट संस्थापक ,राष्ट्रीय अध्यक्ष जनहित लोकशाही पार्टी
संतोष दादा चौधरी, लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष,बी आर एस,पक्ष
बाळासाहेब सानप,शुक्ला अन्य मान्यवर नेत्यांच्या, उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली
पत्रकार परिषदेत, महाराष्ट्रातील अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली
आगामी काळात,होत असलेल्या सर्व निवडणुकीत,  बी आर एस,पक्षाच्या वतीने, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा लोकसभा, निवडणुकीत बी आर एस हा पक्ष ताकतीने उतरणार आहे
अशी माहिती या वेळी उपस्थित मान्यवर नेत्यांनी दिली
आमचा पक्ष कोणत्याही परिस्थितीत येथील प्रस्थापित राजकीय पक्षांना सोबतीला घेणार नाही

तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर अल्पावधीतच त्या राज्याची प्रगती झाली त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्य देखील आम्ही, प्रगती पथावर नेणार आहोत
त्याच तेलंगणा राज्य च्या धर्तीवर आम्हीवमहाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम राबविणार आहोत
वंचित घटकांच्या सर्व समाज बांधवांना आम्ही विविध लाभाच्या योजना सुरू करण्यावर आम्ही भर देणार आहोत.हाही निर्णय झाला आहे
आमचे सरकार आल्यास आम्ही, महाराष्ट्र राज्य एक नंबर करणार हीच आमची पक्षांची महत्वाची भूमिका राहिल,
मागसलेले लोक गरीब शेतकरी,दलित पददलित कष्टकरी कामगार यांना विविध लाभाच्या योजना देण्यात येतील.व त्या राबवल्या जातील
जनहित लोकशाही पार्टी,व इतर अनेक पक्ष, विविध घटकांच्या अनेक, सामाजिक संघटना पण आगामी काळात,या पक्षासोबत जोडण्याचे  काम आम्ही करतो आहे
अशोकराव आल्हाट  जनहित लोकशाही पार्टी चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सांगितले,की, भविष्यात, महाराष्ट्रातील मागासवर्गीय ओबीसी आदिवासी विमुक्त जाती जमाती भटके आदि वंचित घटकांच्या विकासासाठी,हाच एक पर्याय आहे.आता पर्यंतयेथील, प्रस्थापित राजकीय नेत्यांनी व पक्षांनीआम्हाला,कोणत्याही योजनेचा लाभ दिला नाही.काही ही, दिलं नाही,यांनी फक्त आमच्या, मतदानाच्या माध्यमातून, आमची फसवणूक केली आहे
आता मात्र आम्ही, संपुर्ण महाराष्ट्रात जावून, आमच्या, सर्व घटकांच्या विकासासाठी, आम्ही, त्यांना  जागं करणार आहोत, या सर्व पक्षांना, धडा शिकवला जाईल,ही माझी व आमची सर्वांची भूमिका आहे
    गेल्या,72वर्षांत आमच्या गोरगरीब जनतेचा कोणताही विकास झाला नाही ,परंतू,येथील प्रस्थापित राजकारण्यांनी पुढील,पाच पिढ्यांची सोय करून ठेवली.आहे
राजकीय पटलावर, फक्त, त्याचेच,वारस, मुलं मुली, नातेवाईक, संगे सोयरे, अशांचीच वर्णी लावली आहे

गोरगरीब जनतेला वार्यावर सोडून,आपलीच घरं भरली,
आता मात्र आम्ही संपुर्ण महाराष्ट्रात वनवा पेटवण्यासाठी सज्ज झालो आहोत
आता आम्हीमा. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव साहेब यांच्या सोबत ,खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत अशी माहिती जनहित लोकशाही पक्षाचे अशोकराव आल्हाट यानी दिली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत