माजी नगरसेवक सुभाष नारायण साळुंके यांची सोलापूर जिल्हातील माढा, माळशिरस, करमाळा व सांगोला विधानसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली
माजी नगरसेवक सुभाष नारायण साळुंके यांची सोलापूर जिल्हातील माढा, माळशिरस, करमाळा व सांगोला विधानसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली शिवसेना पक्ष मुख्यनेते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार , शिवसेना सचिव संजय मोरे यांनी अंबरनाथचे अभ्यासू व कार्यक्षम माजी नगरसेवक सुभाष नारायण साळुंके यांची सोलापूर जिल्हातील माढा, माळशिरस, करमाळा व सांगोला विधानसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बाळासाहेब भवन येथे नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसनेचे उपनेते ॲड. अरूण जगताप, शिवसेना प्रवक्ते अरूण सावंत,सहसचिव एकनाथ शेलार, कार्यालयीन पदाधिकारी पांडुरंग पाटील उपस्थित होते.