मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या “राजभाषा किसे कहते” पुस्तकाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा जी यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या “राजभाषा किसे कहते” पुस्तकाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा जी यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न
पुणे ( विशेष प्रतिनिधी)
आज पुणे येथील श्रीशिव छत्रपती स्पोर्ट्स काम्प्लेक्स,बालेवाडी येथील स्टेडियम मध्ये भारत सरकारच्या गृहमंत्रालया ने आयोजित केलेल्या हिंदी दिवस निमित तिसरे अखिल भारतीय हिंदी संमेलनच्या उद्घाटन सत्रामधे लातूर लोकसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट संसद रत्न,राजभाषा समिती भारत सरकारच्या समितीचे माजी सदस्य,माजी खासदार  प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी लिहलेले “राजभाषा किसे कहते है” या अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन भारत सरकार चे गृहराज्यमंत्री अजय मिश्रा,राज्यसभेचे उप सभापती हरिवंश जी,केंद्रीय आरोग्यराज्य मंत्री भारती पवार,राजभाषा समिती चे उपाध्यक्ष भर्तहरी महंताब,एमएसएमई चे राज्यमंत्री वर्मा जी, गृहमंत्रालय भारत सरकार च्या सचिव अंशुली आर्या, सह सचिव श्रीमती जॉली, या मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले.

माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी लिहलेल्या राजभाषा किसे कहते है ? हे पुस्तक त्यांनी २०१४ ते २०१९ या काळात भारत सरकारच्या राजभाषा समितीचे सदस्य या नात्यांनी केलेल्या कामाच्या अनुभवावरून आणि  भारतीय संविधान मध्ये केलेल्या कायद्याची नियमाची  माहिती या पुस्तकात दिल्यामुळे हे पुस्तक केंद्र सरकारच्या कार्यालयात हिंदी मध्ये कामकाज करण्यासाठी अत्यंत मार्गदर्शक ठरेल असा आशावाद पुस्तक प्रकाशन प्रसंगी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी व्यक्त करुन माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचे अभिनंदन करुन खूप शुभेच्छा दिल्या.
हे पुस्तक थोडक्यात राजभाषा कशाला म्हणतात हे सांगून सर्व अवश्यक नियमावली या पुस्तकात लिहले आहे. संसदीय समिती , उपसमिती ची स्थापना, सदस्य, आणि कार्यालय सूची. मांडण्यात आले आहे.
प्रोफेसर डॉ सुनील गायकवाड यांच्या या महत्वपूर्ण पुस्तका साठी अनेक अधिकारी आणि मंत्र्यांनी शुभेच्छा देऊन कौतुक करण्यात आले.
या संमेलनाला हजारो लोकांनी आपली उपस्थिती नोंदवली. भारतातून विविध राज्यातून हजारो अधिकारी या संमेलना साठी उपस्थित होते.
पुणे मावळ चे खासदार श्रीरंगअप्पा बारने, संघ परिवाराचे ब्रिजेश कुंतल,गृहमंत्रालय राजभाषा विभागाच्या डेप्यूटी डायरेक्टर अभिलाषा मिश्रा,साइंटिस्ट पांडे,आदि मान्यवर उपस्थित होते.
गुगल प्ले बुक वर पण ebook राजभाषा किसे कहते है? याचे ही प्रकाशन मान्यवर मंत्री अजय मिश्रा आणि राज्यसभा उपसभापती  हरिवंश जी, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
माजी खासदार डाॅ.सुनिल बळीराम गायकवाड यांनी लिहलेल्या "राजभाषा किसे कहते है"? या पुस्तकाबद्दल बहुजन संग्रामचे प्रदेशाध्यक्ष व व्रूत्तदर्शन मिडीयाचे संपादक,भीमराव चिलगावकर यांनी त्यांचे विशेष कौतूक व अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप