मा.खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड योगा थेरपिस्ट परीक्षा उत्तीर्ण

मा.खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड योगा थेरपिस्ट परीक्षा उत्तीर्ण

लातूर ( विशेष प्रतिनिधी)
लातूर चे माजी लोकप्रिय संसदरत्न खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड हे भारत सरकार च्या आयुष मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या “योगा थेरपिस्ट “ च्या अत्यंत अवघड अशा परीक्षेत चांगल्या मार्कांनी उतीर्ण झाले आहेत. भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी योगा ला जगात ओळख दिली. त्यांच्या सोबत १६ व्या लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी केलेले लातूर चे माजी खासदार यांनी योगाच्या सर्व परीक्षा पास झाले आहेत.
डॉ सुनील बळीराम गायकवाड हे अनेक विषयात पदवीधर असून १६ व्या लोकसभेत हायली एज्युकेटेड मेंबर ऑफ पार्लियमेंट असे हाई रेंज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डकडे नोंद झालेली आहे. लातूर लोकसभेत अनेक विकास कामे केलेले खासदार अशी लोकप्रियता डॉ सुनिल बळीराम गायकवाड यांची आहे.
यापूर्वी ही भारत सरकारच्या आयुष मंत्रालय कडून योगाच्या “योगा इन्स्ट्रक्टर” आणि “योगा टिचर अँड ईवैल्यूयर “ या दोन परीक्षा डॉ गायकवाड चांगल्या मार्कानी पास झाले आहेत. 
योगा थेरपिस्ट चे भारत सरकार च्या योगा सर्टिफिकेशन बोर्ड चे प्रमाणपत्र लातूर पतंजली युवा चे योगगुरु अमर वाघमारे यांच्या हस्ते देण्यात आले.
माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या या यशाबद्दल पतंजली योग विद्यापीठाचे संस्थापक योग गुरु रामदेव बाबा, योग गुरु आचार्य बालकृष्ण,पतंजली चे सचिन,आदी मान्यवरानी डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
डॉ सुनील बळीराम गायकवाड हे सतत नवीन नवीन ज्ञान घेण्याचा प्रयत्न करीत असतात.योग सर्टिफिकेशन बोर्ड भारत सरकारच्या तीन परिक्षा पास झाले आहेत.

 लोकप्रतिनिधी असून ही शिक्षणाची सतत ओड असणारे डॉ सुनील बळीराम गायकवाड हे तरुण पिढीसाठी एक आदर्श आहेत असा गौरव योगगुरु रामदेव बाबा यांनी केला आहे
मा.खासदार सुनिल गायकवाड यांच्या या यशाबद्दल बहुजन संग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व व्रूत्तदर्शन मिडीयाचे संपादक भीमराव चिलगावकर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. ं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार