नवरात्री च्या दिवसांत शेकडो नवदुर्गा आक्रमक

नवरात्री च्या दिवसांत शेकडो नवदुर्गा आक्रमक..
उल्हासनगर

उपविभागीय अधिकारी 
उल्हासनगर प्रांत कार्यालय, व आयुक्त व प्रशासक, उल्हासनगर महानगर पालिका यांना शेकडो महिलानी हस्ताक्षर करुन निवेदन दिले जाईल कि समाजमंदिर बांधून मिळावे,
ह्यासाठी सतत 10 वर्षांपासुन मागणी करुन सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही म्हणुन प्रशासनाचे ध्यानाकर्षण करणेसाठी 20 ऑक्टोबर रोजी सह्यांची मोहिम राबवण्यात आली,
रमाबाई आंबेडकर नगर च्या बाजुला, दत्त मंदिर च्या पुढे, राम डेकोरेटर च्या मागे, भाऊराव तबेला च्या बाजुला, चोपडा कोर्ट उल्हासनगर 3 येथील खाली असलेल्या शासकीय जागेवर समाजमंदिर बांधून मिळावे ह्याकामी गेल्या 10 वर्षांपासुन स्थानिक नागरिक व महिला पुर्व आमदार ज्योती कालानी व पुर्व महापौर पंचम कालानी यांचेद्वारे पत्रव्यवहार करुन उल्हासनगर महानगर पालिका प्रशासनास सतत मागणी करीत आहेत,
सदर रिकाम्या असलेल्या जागेच्या आसपास 1500 ते 2000 लोकवस्ती आहे, व त्या जागी आसपास एक ही समाजमंदिर नसल्याने ही मागणी केली जात आहे,
धार्मिक कार्य, आंगणवाडी, छोट्या मुलांसाठी चे उपक्रम ह्यासाठी सदर समाजमंदिर त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना उपयोगी राहील,
व रिकाम्या जागेवर असामाजिक तत्व सुद्धा वावरणार नाहीत,
म्हणुन, सदर जागी खाली असलेल्या शासकीय जागेवर समाजमंदिर बांधून मिळावे ह्यासाठी स्थानिक नेत्या शोभाताई जाधव यांचे अध्यक्षतेखाली शेकडो महिलानी सह्या केल्या, 
सदर प्रसंगी उल्हासनगर चे माजी आमदार श्री पप्पु कालानी उपस्थित होते,ह्या विषयावर श्री पप्पु कालानी यांची उपविभागीय अधिकारी यांचेशी चर्चा झाली असुन माहिती घेऊन पुढील आठवड्यात अहवाल दिला जाईल, असे आश्वासन एसडीओ महोदयानी दिले अशी माहिती उमनपा पुर्व नगरसेवक मनोज लासी यानी उपस्थित महिलांना दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार