बुद्ध भुमि फाउंडेशन बुद्ध विहार,वालधुनी, कल्याण (पुर्व) येथे.पहिल्यांदा रंगल "संविधान प्रेमी कलाकार प्रशिक्षण शिबीर."
दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी बुद्ध भुमि फाउंडेशन बुद्ध विहार,वालधुनी, कल्याण (पुर्व) येथे.पहिल्यांदा रंगल "संविधान प्रेमी कलाकार प्रशिक्षण शिबीर."
युग क्रांती सांस्कृतिक युवा मंच, शाहीरी जलसा आणि आम्ही भारताचे लोकमोहिमेचे शाहीर आकाश पवार आणि ऐश्वर्या पवार व सर्व कार्यकर्ते यांनी शिबिराचे आयोजन केलें होते.या शिबिराचा मुख्य विषय "चित्रपट निर्मिती प्रक्रिया " हा होता याचे मुख्य मार्गदर्शक आघाडीचे कलादिग्दर्शक संतोष संखद हे होते.ज्यांनी सैराट, कासव, नीलकंठ मास्तर, अस्तु अशा 40 हुन अधिक चित्रपटाचे कलादिग्दर्शन केलें आहे तसेच दादासाहेब फाळके या अतिशय मौल्यवान पुरस्कारणे ते सन्मानित आहेत. संतोष संखद यांनी चित्रपटाच्या सुरवातीला ते चित्रपटाच्या प्रदर्शना पर्यंत आवश्यक सर्व गोष्टी अतिशय प्रभावी पणे शिबिरात मांडल्या. चित्रपट बनवणाऱ्या व्यक्ती समोर असणारी सर्व आव्हाणे तसेच चित्रपटाचा मानवी जीवनावर कशा पद्धतीने प्रभाव पडतो हेच त्यांनी अतिशय गांभीर्याने पटऊन दिले. राजा आदाटे( जेष्ठ पत्रकार )यांनी येणाऱ्या काळात संविधानिक भुमिका जपत असताना त्यांचे संवर्धन करत असताना नागरिकांने कशा पद्धतीने काळजी घ्यावी हे सांगितले. तसेच कुणाल रामटेके (सामाजिक कार्यकर्ता आणि चालवळीचे अभ्यासक )यांनी 'जात-वर्गीय-पितृसत्ताक समाजात कलावंतांची भूमिका' या विषयावर मांडणी केली . कार्यक्रमाला, लोकांकवी प्रा. प्रशांत मोरे, हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक दया शंकर शेट्टी तसेच सुशील कुमार गांगुर्डे , शाहीर संभाजी भागत यांनी मोलाचे सहकार्य केलें. भंते गौतम रत्न थेरो यांच्या मंगलमय आशीर्वादाने या कार्यक्रमाला सुरवात झाली . युग क्रांती सांस्कृतिक युवा मांचाचे कार्यकर्ते धनंजय काकडे, अर्जुन येरबागे, संतोष चंदनशिवे, विनायक गायकवाड, रोहित जगताप,ऋतिक जाधव,पायल चौधरी, रोहित सोनावणे यांनी महत्वाची कामगिरी करत शिबीर पूर्णतःवास नेले. तेजस मर्चंडे तसेच संपुर्ण चित्रपट मीडिया प्रोडक्शनची टीम कार्यक्रमाला उपस्तित राहिली आणि सहकार्य केलें.कवी हृदय मानव यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार म्हणून शिबिराची सांगता केली. संविधानिक विचार आणखीन बळकट करण्यासाठी आणि लोकशाही, अभिव्यक्ती ही मुल्य जपान्यासाठी अशा शिबिराची सुरवात होणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. येणाऱ्या काळात असे शिबीर जास्तीत जास्त घेऊन जास्तीत जास्त लोकांना या प्रक्रियेशी जोडुन घ्यायला हवे अशीच एक भावना सर्वांनी प्रकट केली. संतोष संखद यांनी तळागाळातील जनतेच्या विषयाला मुख्य प्रवाहात घेऊन येण्याचे आव्हान केलें
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद