खाजगीकरणाच्या सरकारी धोरणाविरोधात उल्हासनगर महानगरपालिकेच्या गेटवर उग्र निदर्शने व उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन*

*खाजगीकरणाच्या सरकारी धोरणाविरोधात उल्हासनगर महानगरपालिकेच्या गेटवर उग्र निदर्शने व उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन*

 ' *मिशन जय भारत* अंतर्गत खाजगीकरणाच्या सरकारी धोरणानुसार मुरबाड रोड, म्हारळ येथील उन्हासनगर महानगरपालिकेचे रुग्णालय  सार्वजनिक खाजगी भागीदारी (P.P.P) मध्ये प्लॅटिनम हॉस्पीटल प्रा. लि. या कंपनीशी झालेल्या कराराविरोधात आणि सदर रुग्णालय महानगरपालिकेनेच सुरु करण्यासाठी विविध संस्था संघटनांच्या प्रतिनिधींकडून उल्हासनगर महानगर पालिकेच्या गेट समोर दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी तीन वाजेपासून संघटीतपणे निदर्शने करण्यात आली.
निदर्शनाच्या ठीकाणी निदर्शने सुरु असतांना, उल्हासनगर महानगरपालिकेचे मा.आयुक्त अजीज शेख यांनी निदर्शनकर्त्यांना भेटण्यास प्रतिनिधि पाठविले. प्रतिनिधिमार्फत शिष्टमंडळास मा. आयुक्तांच्या भेटीसाठी बोलावण्यात आले.

शिष्टमंडळ आणि  मा. आयुक्तांच्या भेटीमध्ये शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले की, सदर रुग्णालय हे सार्वजनिक खाजगी भागीदारीत (P.P.P) सुरू करण्यात येऊ नये व सदर करार रहित करून महानगरपालिकेनेच रुग्णालय आपल्या अधिपत्याखाली सुरु करावे. तसेच सदर करारासंबंधी सखोल चर्चा झाली.
शिष्टमंडळास मा. आयुक्तांनी सांगितले की, आपण पुन्हा या करारावर संबंधित अधिकारी वर्ग व कंपनींच्या प्रमुखासोबत सविस्तर चर्चेसाठी भेट ठरविण्यात आली. तसेच  महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिष्टमंडळासमोर आदेश दिले. चर्चेवेळी  शिष्टमंडळाने आ.आयुक्तांना विचारले, महानगर पालिका आपल्या अधिकाराखाली जनतेच्या पैशातून बांधलेले सदर रुग्णालय का चालवू शकत नाही? त्यावेळेस मा. आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितले की, महानगरपालिका रुग्णालय चालविण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. हे ऐकून सुद्धा शिष्टमंडळांनी माननीय आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलं की सदर रुग्णालय महानगरपालिकेनेच चालवावे नाहीतर आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे.
 *शिष्टमंडळामध्ये विविध संस्था संघटनांचे उपस्थित असलेले प्रतिनिधी* 
 आनंदा होवाळ, विनायक आठवले, नवीन गायकवाड, निलेश देशमुख, मीरा सपकाळे, विजय हळदे रोहिणी जाधव, पदमाकर अहिरे, अशोक साळवे, विवेक गंभीरराव, नितीन घोले, छाया उमरे, सुमन मधाळे, नूतन मुटघरे, स्नेहा रोकडे, ज्योती सपकाळे, अभिमन्यू भालेराव, शशिकांत दायमा, अमर जोशी, साक्षी डोळस, मंगल जाधव तसेच निदर्शनामध्ये  सहभागी विविध संस्था संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासन व पत्रकार बांधव यांनी सदर आंदोलनाला सहकार्य केले
जनहित न्यूज महाराष्ट्र / बातमी जनहित 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार