महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंतीचे आयोजन

मराठी शाळा क्र २९ येथे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती साजरी 

उल्हासनगर (अशोक शिरसाट) 
उल्हासनगर - ३ मध्ये उल्हासनगर महापालिका मराठी शाळा क्र २९, येथे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आणि अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली, महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते तसेच या शाळेत, शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज शंभुराजे जिजाऊ आणि मावळे असे विविध वेशभूषा साकारली होती शिवराज्याभिषेक या विषयावर छोटासा प्रयोग या विद्यार्थ्यांनी शाळेत सादर केले होते इयत्ता सहावीतील विद्यार्थी चंद्रमणी शिरसाट, या विद्यार्थ्यांने मावळ्यांच्या वेशभूषेत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजा विषयी मोठी ललकारी घोषणा देऊन उपास्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले होते तसेच काही विद्यार्थ्यांनी भाषण आणि नृत्य सादर केले होते  या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून समजा सेवक दिपक साठे सर, पत्रकार अशोक शिरसाट, मराठी शाळा क्र २९ च्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्योतीताई शिरसाट यांच्यासह मराठी शाळा क्र २९ चे मुख्याध्यापक अनिल पाटील सर, सहशिक्षक सुनिल मराठे सर, गोवर्धन मॅडम, दवणे मॅडम, शाळा क्र ८ चे मुख्याध्यापक साळुंके सर्व वर्ग शिक्षक शिक्षिका आणि पालक यावेळी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार