एक अविस्मरणीय क्षण ९ मे २०२४ माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस

एक अविस्मरणीय क्षण ९ मे २०२४ माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस

 मुंबई:आमचे मित्र किरण कुडाळकर यांनी  अचानक बोलावून दिलेला सत्कार हा खरंच आश्चर्यकारक होता , निवेदक संतोष जी आणि  सचिन जी ,हरी पाटकर सर माझे जुने मित्र यांनी माझे नाव सत्कारारसाठी पुकारून  एक धक्का दिला , आत्तापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून सत्कार होत आला आहे.  ९ मे २०२४  रोजी " महाराष्ट्र बाजारपेठ " यांचा  " ७ वर्धापन दिवस " होता आणि या गुणगौरव सोहळ्यात मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांसोबत माझा सुद्धा सत्कार सत्कार झाला हे माझे भाग्य म्हणायचे . या गुण गौरव सोहळ्यात माझा सत्कार केला  त्याबद्दल मी महाराष्ट्र बाजारपेठ चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्माननीय डॉ. कौतिक दांडगे सरांचा शतश आभारी आहे.. महाराष्ट्र बाजारपेठ च्या ७ व्या  वर्धापन दिनानिमित्त गुणगौरव पुरस्कार सोहळा - २०२४ ,चा गुरुवारी ९  मे  २०२४ ला दुपारी ठीक ३.३० वाजता सुरू झाला आणि रात्री १२ वाजता संपला ... तरी मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे , आपण सर्वांनी दादर येथील श्री शिवाजी नाट्यमंदिर येथे या सोहळ्यास उपस्थिती दर्शविली. अनेक नवीन जुने मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार सोबत भेट झाली... फुल धमाल मस्ती मनोरंजनाचा अविस्मरणीय सोहळा पाहायला मिळाला आणि या सोहळ्या मध्ये उपस्थित सभासदांना लकी ड्रॉ मध्ये भाग  घेऊन बक्षीस ही मिळाले - गणेश तळेकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार