बदलापूरात आंदोलकांचा रेल रोको, कर्जत-बदलापूर रेल्वे सेवा ठप्प

बदलापूरात आंदोलकांचा रेल रोको, कर्जत-बदलापूर रेल्वे सेवा ठप्प
अकरा वाजेपर्यंत पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आंदोलक आरोपीच्या फाशीची मागणी करत घोषणाबाजी करत होते.

बदलापूर: दोन चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणी संतप्त पालक आणि बदलापूरकरांनी मंगळवारी आदर्श शाळेसमोर तीव्र आंदोलन केले. यातील काही आंदोलकांनी साडेदहाच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या मांडला. त्यामुळे मुंबईहून येणारी आणि मुंबईकडे जाणारी अशा दोन्ही रेल्वे सेवेला त्याचा फटका बसला.मंगळवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेबाहेर पालक आणि नागरिकांनी आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन आक्रमक रूप घेत असतानाच यातील काही आंदोलकांनी आपला मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकाकडे वळवला. साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून येणारी अशी दोन्ही रेल्वे सेवा बंद पाडली. रेल्वे रुळावर आंदोलक बसल्याने एकाच गोंधळ उडाला त्यामुळे लोकल वाहतूक ठप्प झाली. अकरा वाजेपर्यंत पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आंदोलक आरोपीच्या फाशीची मागणी करत घोषणाबाजी करत होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप