माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या, दोन आरोपींना पकडल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या, दोन आरोपींना पकडल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांचा मृत्यू झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी खेरवाडी सिग्नलजवळील आमदार झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाकडे जात असताना त्यांच्यावर तीन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला ज्यात त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. यातील एक आरोपी हरियाणा तर दुसरा उत्तर प्रदेश इथला असल्याची माहिती आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस लिलावती रुग्णालयात पोहोचले. मुंबई क्राईम ब्रांचकडून घटनेचा तपास केला जात आहे.

बाबा सिद्दिकी हे गेली तीन ते चार दशकं राजकारणात सक्रिय होते. राजकीय आयुष्यातील बहुतांश काळ ते काँग्रेस पक्षात होते. काही महिन्यांपूर्वीच ते अजित पवारांच्या गटात गेले होते.

तसेच. हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांशी त्यांचे जवळचे संबंध होते. त्यामुळे सुद्धा ते चर्चेत असत.

बाबा सिद्दिकी यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता.                                

बाबा सिद्दिकी यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता.

गोळ्या झाडण्यापूर्वी फुटले फटाके

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार सिद्दिकी यांच्यावर एकूण 5 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या. त्यातली एक गोळी त्यांच्या छातीजवळ लागल्याची माहिती आहे.

सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यापूर्वी त्याठिकाणी फटाके फोडण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, अशीही माहिती मिळाली आहे.

बाबा सिद्दिकी यांना 10-15 दिवसांपूर्वी धमकी मिळाली होती, अशीही माहिती मिळाली आहे. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली होती.

सध्या आरोपींची चौकशी सुरू असून पोलिसांकडून काहीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दोन आरोपी पकडले-मुख्यमंत्री

दरम्यान बाबा सिद्दिकी यांच्यावरील हल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

"बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या हल्ल्यासंदर्भात तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत. दोन आरोपी पकडण्यात आले आहेत.

एक हरियाणाचा आहे आणि एक उत्तर प्रदेशचा आहे. तिसरा आरोपी फरार आहे. त्याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यालाही लवकरच अटक केली जाईल," असं शिंदे म्हणाले.

चांगला नेता गमावला-अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही 'एक्स' अकाऊंटवरुन बाबा सिद्दिकी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

त्यांनी म्हटलं की, "राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे.

या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बाबा सिद्दीकी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.                                       या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं.

"बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचं निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान आहे. झिशान सिद्दीकी, सिद्दकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे," असं अजित पवार म्हणाले.

कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी-शरद पवार
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे प्रमुख शरद पवार यांनी यासंदर्भात 'एक्स'वर ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे.

त्यांनी म्हटलं आहे की, "राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.                 

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही 'एक्स'वर बाबा सिद्दिकी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांच्या निधनाचं वृत्त ऐकून धक्का बसला. हा भ्याड आणि क्रूर हल्ला हल्ला आहे असं ते म्हणाले. यामागे ज्यांचा हात आहे, त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी, असं त्यांनी म्हटलं आहे.

मिलिंद देवरा

शिवसेना शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा यांनी 'एक्स'वर म्हटलं आहे की, "बाबा सिद्दिकी यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. मी त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी निघालो आहे. या कठीण प्रसंगी त्यांचे सुपुत्र झिशान सिद्दिकी आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत माझ्या सहवेदना आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."

मुंबई काँग्रेस

मुंबई काँग्रेसने आपल्या अधिकृत 'एक्स' अकाऊंटवरुन बाबा सिद्दिकी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, "बाबा सिद्दिकी यांच्या निधनामुळे मुंबई काँग्रेस शोकाकूल आहे. त्यांनी लोकांसाठी अथकपणे केलेलं काम आणि सेवा कायमस्वरुपी लक्षात राहिल. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांप्रती आमच्या संवेदना आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.                                  पोटनिवडणुकीत कॉंग्रेसकडून नारायण राणेंचा पराभव करत बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत निवडून आल्या. त्यानंतर बाबा सिद्दिकी मतदारसंघापलिकडे राजकीयदृष्ट्या फारसे सक्रीय दिसत नव्हते.

2019 च्या निवडणुकीसाठी वांद्रे पूर्वचा मतदारसंघ त्यांनी बांधला. पण बाबा सिद्दिकी यांनी निवडणूक न लढवता त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं.

शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण नाराज तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

मतांच्या विभाजनामुळे आणि शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे झिशान सिद्दिकी शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव करत जिंकून आले. त्यावेळी शिवसेनेच्या बालेकिल्यात आणि मातोश्रीच्या दारात कॉंग्रेसने पराभव केल्यामुळे या लढतीची जोरदार चर्चा झाली होती.

काही महिन्यांपूर्वी बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

बाबा सिद्दिकी यांचं बॉलीवूड कनेक्शन
बाबा सिद्दीकी हे 15 वर्षं वांद्रे पश्चिमचे आमदार राहीले आहेत. वांद्र्यांच्या या भागात अनेक बॉलीवूड अभिनेते राहतात. दरवर्षी रमझान महिन्यात बाबा सिद्दिकी यांची इफ्तार पार्टी ही चर्चेत असते. त्या पार्टीला राजकीय नेत्यांबरोबर निम्म बॉलीवूड हजेरी लावतं.                काही वर्षांपूर्वी अभिनेत्री कॅटरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत अभिनेता शाहरूख खान आणि सलमान खान यांच्यात जोरदार वाद झाला.

त्यानंतर काही वर्षं ते एकमेकांशी बोलत नव्हते. पण बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीत त्यांनी दोघांना एकत्र आणलं. यावेळी या दोन्ही सुपरस्टारमध्ये समेट झाली होती. त्यावेळी बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीची जोरदार चर्चा रंगली होती.

बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क 
9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार