पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उल्हासनगर मधील रस्त्यांची खोदकाम सुरू असल्याने वाहन चालकांची कोंडी

इमेज
उल्हासनगर मधील रस्त्यांची खोदकाम सुरू असल्याने वाहन चालकांची कोंडी  .                        ( पटेल लो प्राईस/लिंक रोड मार्ग ) उल्हासनगर मधील रस्त्याच्या खोदकामा मुळे रस्त्यांची दुरवस्था सध्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत रस्त्यावर कामे सुरू असून प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसून येत आहे तसेच रस्त्याचे खोदकाम सुरू असताना वाहन चालकांना कोणत्या रस्त्यावर खोदकाम सुरू आहे हे नेमके कळत नाही त्याच्या मागचे कारण म्हणजेच पुढे रस्त्याचे काम सुरू आहे परंतु चौकात कोणत्याच प्रकारचे रस्ता बंद असल्याचे फलक लावलेले नसल्याने वाहन चालक सरळ पुढे गेल्यानंतर त्याला पुढे काम चालू असल्याचे दिसून येते परंतु पुढे वाहन घेऊन जाता येत नसल्याने पुन्हा त्याला त्या ठिकाणाहून परत मागे वळावे लागते त्यामुळे शहरात ट्राफिक ची समस्या निर्माण झाली आहे                    ( पटेल लो प्राईस/लिंक रोड मार्ग ) यामुळे रस्त्यावर वाहन चालकांना वाहन चालवत असताना नाहक त्रास सहन करावा लागत ...

भ्रष्टाचार जनअक्रोश संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने उल्हासनगर तहसीलदार यांना निवेदन पत्र

इमेज
भ्रष्टाचार जनअक्रोश संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने उल्हासनगर तहसीलदार यांना निवेदन पत्र विठ्ठल रुक्मणी पतपेढी कल्याण संस्थेने हरी आल्हाट यांच्यावर केलेल्या अन्यायाविरुद्ध सहकार मंत्री यांच्याकडे आल्हाट यांना न्याय मिळण्यासाठी केली मागणी                                                                   विठ्ठल रुक्मिणी पतपेढी कल्याण संस्थेने हरी आल्हाट यांच्यावर  लादलेल्या अवाढव्य कर्जामुळे हरी आल्हाट यांची मनस्थिती बिकट झाली असून त्यांना न्याय मिळावा यासाठी भ्रष्टाचार जन आक्रोश संघटना महाराष्ट्र राज्यचे पदाधिकारी यांनी उल्हासनगर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी निवेदन पत्र देऊन सहकार मंत्री मंत्रालय मुंबई यांच्याकडे मागणी केली आहे निवेदन पत्रात लिहिले आहे की  हरि चंदर आल्हाट यांच्यावर  विठ्ठल रुक्मणी पतपेढीकडून होत असलेल्या अन्याय बाबत यांनी सहकार मंत्री तसेच संबंधित अधिका...

भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा

इमेज
भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा  गावचा आणि गाव  कुसा बाहेरच्या गावाचा, देशाचा आणि  देशातल्या बहिष्कृत देशाचा विकास हा भारतीय संविधानाने झाला आहे - नवनाथ रणखांबे यांचे प्रतिपादन      भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा निमीत्ताने  संविधान व सामाजिक परिवर्तनाच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष नवनाथ आनंदा रणखांबे  यांनी अध्यक्षिय भाषणात बोलताना,  "भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने गावचा आणि गाव  कुसा बाहेरच्या गावाचा, देशाचा आणि  देशातल्या बहिष्कृत देशाचा विकास हा भारतीय संविधानाने झाला आहे. कोणताही भेदभाव न करता संविधानाने  सर्व सामान्य माणूस देशाच्या सर्वोच्च पदावर विराज मान झाला आहे. ही किमया  भारतीय संविधानाची आहे. आज संविधानाच्या अमृत महोत्सवादिनानिमित्ताने व्याख्यानमाला, कवी संमेलन, विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा कौतुक सोहळा, संविधान उद्देशिका घराघरात अशा छान उपक्रमा बरोबर संविधानाची जनजागृती प्रसार आणि प्राचार , शाम बैसाने अध्यक्ष पांचपीर ट्रस्ट (मोहाडी) यांनी ...

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

इमेज
राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला. वंचित बहुजन महिला आघाडी मार्फत संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला तसेच या कार्यक्रमात   महिलांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तसेच दुसऱ्या दिवशी पारितोषिक वितरण सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन १८ व १९ जानेवारी २०२५ रोजी. सुभाष टेकडी, उल्हासनगर ४ या ठिकाणी संपन्न झाला  या महोत्सवात महिलांसाठी. कबड्डी.धावणी. दोरी उडी.स्मरणशक्ती.बकेट बॉल.संगीत खुर्ची.वेशभूषा.उखाणे.भाषण.खो खो. तसेच रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तसेच  मुले, पुरुष व महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम.डान्स.कराओके साँग. आणि बक्षीस वितरण सोहळा पार पडला या वेळी शेकडो पेक्षा अधिक महिलांनी स्पर्धे मध्ये सहभाग घेतला या महोत्सवाला अनेक मान्यवर व पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवली अशी माहिती  महिला अध्यक्ष उल्हासनगर शहर जिल...

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

इमेज
विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार.. उल्हासनगर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचारी या कर्जदारांवर लादले कर्जापेक्षा चारपट अधिक व्याज .  उल्हासनगर महानगरपालिका सफाई कर्मचारी यांनी सन 2011 मध्ये विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्थेमधून एकूण दीड लाख रुपये कर्ज घेतले होते कर्जदारांकडून तीस हजार रुपये शेअरचे आणि पंधरा हजार रुपये बुडीत खात्यात. जमा करून घेतले होते बाकी शिल्लक एक लाख 5 हजार रुपयांमधून तीन हजार रुपये कर्ज मंजूर करण्यासाठी पतपेढीचे कर्मचारी यांनी चहा पाणी खर्च म्हणून घेतले होते बाकी शिल्लक एक लाख दोन हजार रुपये मात्र कर्जदारांच्या हातात दिले होते कर्ज देताना विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्थेचे कर्मचारी यांनी कर्जदारांचे बँक बुक आणि एटीएम कार्ड पतपेढीमध्ये जमा करून घेतले होते तसेच दिलेल्या कर्जाचा  हप्ता  तसेच शिशु उत्कर्ष ठेव. 100. दाम दुप्पट ठेव. 500 सभासद कल्याण निधी ठेव. 200 ही सर्व रक्कम जमा करून बाकी शिल्लक रक्कम 4400 रुपये कर्जाचा हप्ता म्हणून जमा करून घेत होते एकूण रुपये 5200 प्रमाणे मासिक हप्ता  प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्यांच्या ...

म्हातारपणीचे बालपण

म्हातारपणीचे बालपण        "मोहन बेटा ! मी तुझ्या काकांच्या घरी चाललो आहे."         "का हो बाबा ? आणि तुम्ही आजकाल काकांच्या घरी सारखं का जाता ...? तुम्हाला वाटतं तर जरुर जा बाबा...  घ्या, हे पैसे राहू द्या, कामी येतील."        बाबांचे मन भरुन आले, त्यांना आज आपल्या मुलाला दिलेल्या संस्कारांचे फळ दिसत होते.       जेव्हा मोहन शाळेत जात असे... त्याला बाबांकडून खर्चायला पैसे घेण्यात कायम संकोच वाटत असे, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. बाबा मजूरी करून मोठ्या कष्टाने घर चालवत होते... पण कितीही नाही म्हटले तरी आई त्याच्या खिशात थोडेफार पैसे ठेवून देत असे.      मोहनच्या पत्नीचे त्याच्या बाबांशी वागणे काही चांगले नव्हते. ती रोज बाबांविषयी तक्रार करीत असे,त्याला हे सर्व आवडत नसे... मुलंही आजोबांच्या खोलीत कधीच जात नसत. मोहनलाही कामावरून येण्यास उशीर होत असे म्हणून वेळ मिळत नसे.            बाबांना दररोज काकांच्या घरी जाण्याची इतकी घाई कां असते ते बघण्यास...