उल्हासनगर मधील रस्त्यांची खोदकाम सुरू असल्याने वाहन चालकांची कोंडी

उल्हासनगर मधील रस्त्यांची खोदकाम सुरू असल्याने वाहन चालकांची कोंडी 
.                        ( पटेल लो प्राईस/लिंक रोड मार्ग )

उल्हासनगर मधील रस्त्याच्या खोदकामा मुळे रस्त्यांची दुरवस्था सध्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत रस्त्यावर कामे सुरू असून प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसून येत आहे तसेच रस्त्याचे खोदकाम सुरू असताना वाहन चालकांना कोणत्या रस्त्यावर खोदकाम सुरू आहे हे नेमके कळत नाही त्याच्या मागचे कारण म्हणजेच पुढे रस्त्याचे काम सुरू आहे परंतु चौकात कोणत्याच प्रकारचे रस्ता बंद असल्याचे फलक लावलेले नसल्याने वाहन चालक सरळ पुढे गेल्यानंतर त्याला पुढे काम चालू असल्याचे दिसून येते परंतु पुढे वाहन घेऊन जाता येत नसल्याने पुन्हा त्याला त्या ठिकाणाहून परत मागे वळावे लागते त्यामुळे शहरात ट्राफिक ची समस्या निर्माण झाली आहे                    ( पटेल लो प्राईस/लिंक रोड मार्ग )

यामुळे रस्त्यावर वाहन चालकांना वाहन चालवत असताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच वृद्ध जेष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थी यांना रस्त्यावर राहणारी करीत असताना धूळ मातीच्या प्रदूषणातून ये जा करावी लागत आहे.                      ( गांधी रोड नेताजी चौक मेन रोड  )

अनेक ठिकाणी रस्त्याचे खोदकाम पूर्ण झाले असून सुद्धा ते खड्डे जसेच्या तसेच अवस्थेत दिसून येत आहे ज्यामुळे वृद्ध व ज्येष्ठ नागरिक यांना संकटाला सामोरे जावे लागेल आहे संबंधित अधिकारी यांनी तात्काळ याची दखल घेऊन संबंधित ठेकेदार यांना रस्त्याचे खोदकाम सुरू असताना तसे फलक लावूनच काम सुरू करावे. तसेच चौकातील एका रस्त्याचे काम पुढील बाजू चालू असल्यास चौकामध्ये फलक लावून रस्ता बंद असल्याचे वाहन चालक यांना सूचना करावी ज्यामुळे शहरांमध्ये वाहतूक समस्या निर्माण होणार नाही तसेच वाहनचालकांनाही त्रास होणार नाही संबंधित अधिकारी यांनी तात्काळ लक्ष केंद्रित करून नागरिकांना त्रास मुक्त करावे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप