विरोधकांच्या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत

विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीतआता अशा लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये ऐवजी केवळ पाचशे रुपये मिळणार अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं.                  राज्यातील महायुती सरकारने गेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेची प्रचंड चर्चाही झाली या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात.                      मात्र आता, नमो शेतकरी योजनेतील पात्र महिलांना, लाडकी बहीण योजनेतून १५०० रुपयांऐवजी केवळ ५०० रुपयेच मिळणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. यासंदर्भात विचारले असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच शब्दात भाष्य केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

खरे तर, ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, त्याच महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा महिलांची संख्या तब्बल ८ लाख एवढी आहे. अशा महिलांना पुढील महिन्यापासून लाडकी बहीण योजनेतून केवळ ५०० रुपयेच मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. यावरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

यासंदर्भात विचारले असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "आमचे म्हणणे आहे की, यांपैकी कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा. केंद्राची योजना ही त्यांना मिळेलच. केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्था-अर्थी काहीही संबंध नाही. कारण पंतप्रधान मोदीजी यांनी ती देशातील शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे. जर असे काही असेल, तर ही ५०० रुपयांची योजना न घेता १५०० रुपयांचा लाभ घ्यावा. कुठला लाभ निवडायचा हे ऐच्छिक. हे आपण लाडक्या बहिणींवर सोपवले आहे."

अदिती तटकरे यांनीही दिले स्पष्टीकरण -
अदिती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले आहे, "दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७७४१४८ महिलांना उर्वरित फरकाचे ५०० रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे."

अदिती पुढे म्हणाल्या, "एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून, सदर प्रक्रियेत दिनांक ३ जुलै २०२४ नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे. तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे किंवा योजनेच्या देदीप्यमान यशाने त्यांचे मनोबल खचले आहे. विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे."

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप