प्रयत्न आमचेनशा मुक्त अंबरनाथ करण्याचे__मा , सुभाष साळुंके

प्रयत्न आमचे
नशा मुक्त अंबरनाथ करण्याचे__मा , सुभाष साळुंके 
चरस,गांजा,ड्रग्स इ.नशा केल्याने व दारू व्यसनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याचे तसेच काही जण ऐन तारुण्यात मृत्युमुखीला जवळ केल्याच्या घटना घडताना मन सुन्न होत असे,
यावर उपाय म्हणून दारू मुक्त घर व नशा मुक्त अंबरनाथ करण्याचा प्रयत्न संवाद फाऊंडेशन च्या वतीने मा.नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या वाढदिवसानिमित 
भव्य नशा मुक्ती शिबिर
रविवार,११ मे २०२५* रोजी
सकाळी १० ते दु.१ वाजेपर्यंत*
 रोटरी क्लब हॉल, वडवली विभाग अंबरनाथ पूर्व येथे आयोजित केले आहे.
लाखो व्यक्तींना दारुमुक्ती देणारे *प्रख्यात उपचार तज्ज्ञ मा.डॉ.कृष्णा भावले हे समुपदेशन व आयुर्वेदिक औषध देणार असून IRS मा. समीर वानखेडे व सिने अभिनेत्री मा. क्रांती रेडकर उपस्थित राहणार आहे.
सदर आयुर्वेदिक उपचारामुळे लाखो व्यसनाधीन व्यक्तीनी दारू पासून मुक्ती मिळविले आहे, म्हणूनच अंबरनाथमधील व्यसनाधीन व्यक्ती दारू पासून मुक्ती करण्याचा व त्यांचा कुटुंबात सुख समाधानाचा आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न कार्यकुशल नगरसेवक - सुभाष साळुंके यांच्या संकल्पनेतून होत आहे,
मा.सुभाष साळुंके यांच्या ८ मे रोजी होणाऱ्या वाढदिवस वरील अवाढव्य खर्च टाळून तो व्यसन मुक्तीच्या कार्यात,अभियानात खर्ची पाडवा,, प्रतीव्यक्ती ₹१५००/– प्रमाणे १०० व्यक्तींना होणारा औषध खर्च करणार आहेत, जेणेकरून व्यसनाधीन व्यक्ती व कुटुंबाला भार न पडता मदत होऊन विनामूल्य औषध उपलब्ध होणार आहे.,याची संबंधित व्यक्तींनी नोंद घेऊन १००% दारू मुक्ती करण्यासाठी *नावे नोंदणी मा. सुभाष साळुंके, मा.नगरसेवक यांच्या जनसंपर्क कार्यालयात, Mb.9423080608/8788515075 येथे दि.8/5/25 पूर्वी करावी,
सदर प्रभावी व  दारूत्रस्त कुटुंब आनंदी करण्याच्या दृष्टीने अंबरनाथ मध्ये प्रथमच आयोजित केलेल्या  उपक्रमात त्रस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन 
संवाद फाऊंडेशन अध्यक्षा व अंबरनाथ विधानसभा संघटक – *सौ.सुवर्णा साळुंके* यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन