जनहित'न्यूज महाराष्ट्रच्या ठाणे जिल्हा क्राईम रिपोर्टर पदी मच्छिंद्र मोरे यांची नियुक्ती

*जनहित'न्यूज महाराष्ट्रच्या ठाणे जिल्हा क्राईम रिपोर्टर पदी मच्छिंद्र मोरे यांची नियुक्ती* 
​ *ठाणे (प्रतिनिधी आबासाहेब साठे )* 

राज्यात आपल्या परखड पत्रकारितेमुळे अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले 'जनहित न्यूज महाराष्ट्र' आणि 'साप्ताहिक बातमी जनहित' या वृत्तसमूहाचा विस्तार आता अधिक जोमाने होत आहे. जनहित कार्याचा आणि अन्यायाविरुद्धचा आवाज तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये ठाणे जिल्हा क्राईम रिपोर्टर म्हणून मच्छिंद्र विक्रम मोरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
​ *मान्यवरांची उपस्थिती:* 
या विशेष नियुक्ती प्रसंगी जनहित न्यूज महाराष्ट्र व'बातमी जनहित'चे संपादक व अध्यक्ष श्री. हरी चंदर आल्हाट यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन मोरे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी कार्यकारी संपादक विनोद तायडे, प्रतिनिधी आबासाहेब साठे यांच्यासह जनहित परिवारातील सदस्य आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​मच्छिंद्र मोरे यांच्या नियुक्तीमुळे ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी क्षेत्रातील बातम्यांना वाचा फोडण्यास आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यास मदत होईल, असा विश्वास संपादक हरी चंदर आल्हाट यांनी यावेळी व्यक्त केला. मोरे यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप