पोस्ट्स

कलर्स मराठी वरील कस्तुरी मालिकेत आशु सुरपूर दमदार भूमिकेत

इमेज
कलर्स मराठी वरील कस्तुरी मालिकेत आशु सुरपूर दमदार भूमिकेत प्रतिनिधी मुंबई: सोमवार दिनांक 26 जुन 2023 पासून रात्री साडे दहा वाजता नव्याने सुरू झालेल्या कस्तुरी या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आशु सुरपूर ही एका महत्त्वाच्या भूमिका मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये तिच्यासोबत शिल्पा कुलकर्णी यांची भूमिका असून या मालिकेचे दिग्दर्शक  दीपक नलावडे आहेत.  आज पर्यंत अनेक  चित्रपटांमध्ये आपण तिला पाहिलेले आहे. या मालिकेच्या निमित्ताने गप्पा मारत असताना आपण स्वकष्टाने आतापर्यंत जवळपास 20 मालिकांमध्येही  अभिनयाचा प्रवास  पूर्ण केल्याचे तिने सांगितले. कोविडच्या कालावधीमध्ये अचानक झालेल्या आईच्या निधनामुळे ती पूर्ण खचून गेली होती. इंडस्ट्रीमध्ये पुन्हा आगमन करण्यासाठी कस्तुरी मालिकेचे कार्यकारी निर्माते सुनील कुलकर्णी यांनी दिलेली संधी तिने स्वीकारली. त्याबद्दल ती त्यांचे आभारही मानते.  "सुरुवात छोटी असली तरी चालेल, मोठे होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे असते". असे मत व्यक्त करून आशु सुरपूर हिने तिच्या महाराष्ट्रातील तमाम चाहत्या प्रेक्षकांना ही मालिका बघण्या

उल्हासनगर महानगरपालिका इमारतीमध्ये राहत असलेले कर्मचारी यांना भरमसाठ घर भाडे कपात करूनही मूलभूत सुविधा मिळत नाहीत

इमेज
उल्हासनगर महानगरपालिका इमारतीमध्ये राहत असलेले कर्मचारी यांना भरमसाठ घर भाडे कपात करूनही मूलभूत सुविधा मिळत नाहीत उल्हासनगर महानगरपालिकेच्या ए बी आणि सी अशा एकूण तीन इमारती उल्हासनगर महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांना राहण्याकरिता दिलेल्या आहेत या इमारतीमध्ये एकूण 128 खोल्या आहेत,प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्यांच्या वेतनातून घर भाडे कपात होत आहे उल्हासनगर महानगरपालिका इमारतीमध्ये मागील अनेक वर्षापासून पाणीपुरवठा करणारी जलपरी ही मोटर बंद पडली असून स्थानिक रहिवासी यांना पिण्याचे पाणी मिळत नाही,घराच्या खिडक्या व दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असून याची डागडुजी सुद्धा महानगरपालिका करीत नाही,पीडब्ल्यूडी विभागाकडे या इमारतीचे विकास कामाची मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मिळत असतानाही पीडब्ल्यूडी विभागाने या इमारतीची कोणतीही डागडुजी केली नाही,कर्मचाऱ्यांच्या वेतनातून घर भाडे रुपये सहा हजार पासून  साडे आठ हजार रुपये पर्यंत घर भाडे कपात होत आहे परंतु कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या इमारतीमध्ये सुविधा मिळत नाही,अशा तक्रारी इमारतीमध्ये राहत असलेले कर्मचारी करीत आहेत, दिनांक १७/०८/२०२२

महानगर पालिका वसाहती मध्ये राहतं असलेल्या सफाई कामगार यांना मिळणार मालकी हक्काचं घर..उ म पा आयुक्त यांनी दीले आश्वासन

इमेज
महानगर पालिका वसाहती मध्ये राहतं असलेल्या सफाई कामगार यांना मिळणार हक्काचं घर..उ म पा आयुक्त यांनी दीले आश्वासन   उल्हासनगर प्रतिनिधी. दिनांक १७/०८/२०२२ रोजी उल्हासनगर महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी यांच्या हक्काच्या घराबाबत प्रलंबित असलेले प्रकरण घेऊन हरि चंदर आल्हाट यांनी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर माटे यांना निवेदन देण्यात आले होते   त्या निवेदनाची दखल घेऊन कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर माटे कोकण विभागीय अध्यक्ष नितीन साळवे कोकण विभागीय सचिव आनंद भाऊ गांगुर्डे व हरि चंदर आल्हाट तसेच त्यांचे सहकारी यांनी उल्हासनगर महानगर पालिका आयुक्त अजीज शेख यांना उल्हासनगर महानगर पालिका वसाहती मध्ये राहतं असलेल्या सफाई कर्मचारी यांना हक्काची घरे देण्यात यावी असे लेखी पत्र देवून विनंती केली असता तत्काळ आयुक्त साहेब यांनी उप आयुक्त व संबधित अधिकारी यांना आदेश दिलें की लवकरात लवकर सफाई  कामगारांच्या मालकी हक्काच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी आदेश देण्यात आले.

.मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा टँकर उलटला आहे.

इमेज
 मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर टँकर उलटला मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणामपुण्यातून टँकर अपघाताची मोठी अपघात घडली आहे. गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना घडली आहे. चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने आज पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा टँकर उलटला आहे. यामुळे या जुन्या महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात काल मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या दरम्यान गॅस कॅप्सूल टँकरचा अपघात झाला. गॅस कॅप्सूल टँकर चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने वाहन उलटून हा अपघात झाला आहे. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बीपीसीएल कंपनीच्या या गॅस टँकरचा अपघात झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील जुन्या पुणे - मुंबई महामार्गावरील मधुकरराव पवळे पुलाच्या सुरुवातीलाच हा अपघात झाला आहे.वायू गळती थांबवण्याचा प्रयत्न सुरू गॅस टँकरचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यांनंतर पिंपरी चिंचवड महापालिकेचे अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी वायू गळती थांबवण्याचे

प्रवाशांची गर्दी‎ लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी ७६ विशेष‎ गाड्यांचे नियोजन केले आहे

इमेज
प्रवाशांची गर्दी‎ लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी ७६ विशेष‎ गाड्यांचे नियोजन केले आहे अमरावती: पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त‎ संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक‎ दाखल होतात. प्रवाशांची गर्दी‎ लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी ७६ विशेष‎ गाड्यांचे नियोजन केले आहे.‎ यातील १६ फेऱ्यांतून विदर्भातील‎ भाविकांचीही सोयी होणार आहे.‎ यात‎ नागपूर-मिरज (४ फेऱ्या),‎ नागपूर-पंढरपूर (४ फेऱ्या), नवी‎ अमरावती-पंढरपूर (४ फेऱ्या), व‎ खामगाव-पंढरपूर (४ फेऱ्या) या विशेष गाड्या ‎ विदर्भातून धावणार आहेत,नागपूर-मिरज विशेष गाडी‎ क्रमांक ०१२०५ विशेष गाडी २५‎ आणि २८ जून रोजी ८.५० वाजता ‎ ‎ नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी‎ ११.५५ वाजता मिरजला पोहोचेल.‎ तर गाडी क्रमांक ०१२०६ ही गाडी २६‎ आणि २९ जून रोजी १२.५५ वाजता‎ सुटून दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता‎ नागपूरला पोहोचेल. या गाडीला‎ अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव,‎ चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर,‎ अकोला, शेगाव, मलकापूर,‎ भुसावळ, जळगाव, चाळीसगाव,‎ मनमाड, कोपरगाव, बेलापूर,‎ ‎अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी,‎ पंढरपूर, सांगोला, म्हसाबा‎ डोंगरगाव, जठरगाव धालगाव,‎ कवठेमह