प्रवाशांची गर्दी‎ लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी ७६ विशेष‎ गाड्यांचे नियोजन केले आहे



प्रवाशांची गर्दी‎ लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी ७६ विशेष‎ गाड्यांचे नियोजन केले आहे
अमरावती: पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त‎ संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक‎ दाखल होतात. प्रवाशांची गर्दी‎ लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी ७६ विशेष‎ गाड्यांचे नियोजन केले आहे.‎ यातील १६ फेऱ्यांतून विदर्भातील‎ भाविकांचीही सोयी होणार आहे.‎ यात‎ नागपूर-मिरज (४ फेऱ्या),‎ नागपूर-पंढरपूर (४ फेऱ्या), नवी‎ अमरावती-पंढरपूर (४ फेऱ्या), व‎ खामगाव-पंढरपूर (४ फेऱ्या) या विशेष गाड्या ‎ विदर्भातून धावणार आहेत,नागपूर-मिरज विशेष गाडी‎ क्रमांक ०१२०५ विशेष गाडी २५‎ आणि २८ जून रोजी ८.५० वाजता ‎ ‎ नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी‎ ११.५५ वाजता मिरजला पोहोचेल.‎ तर गाडी क्रमांक ०१२०६ ही गाडी २६‎ आणि २९ जून रोजी १२.५५ वाजता‎ सुटून दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता‎ नागपूरला पोहोचेल. या गाडीला‎ अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव,‎ चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर,‎ अकोला, शेगाव, मलकापूर,‎ भुसावळ, जळगाव, चाळीसगाव,‎ मनमाड, कोपरगाव, बेलापूर,‎ ‎अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी,‎ पंढरपूर, सांगोला, म्हसाबा‎ डोंगरगाव, जठरगाव धालगाव,‎ कवठेमहांकाळ व सुलगरे या‎ ठिकाणी थांबा दिला आहे,अमरावती-पंढरपूर‎ गाडी क्रमांक ०१११९ ही विशेष गाडी‎ अमरावती येथून २५ व २८ जून रोजी‎ दुपारी २.४० वाजता सुटून दुसऱ्या‎ दिवशी ९.१० वाजता पंढरपूरला‎ पोहोचेल. गाडी क्रमांक ०११२०‎ पंढरपूर येथून २६ व २९ जून रोजी‎ सायंकाळी ७.३० वाजता सुटून‎ दुसऱ्या दिवशी १२.४० वाजता‎ अमरावती येथे पोहोचेल. या‎ गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर,‎ अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा,‎ मलकापूर, बोदवड, भुसावळ,‎ जळगाव, पाचोरा, चाळीसगाव,‎ नांदगाव, मनमाड, कोपरगाव,‎ अहमदनगर, दौंड हे थांबे आहेत 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप