कलर्स मराठी वरील कस्तुरी मालिकेत आशु सुरपूर दमदार भूमिकेत

कलर्स मराठी वरील कस्तुरी मालिकेत आशु सुरपूर दमदार भूमिकेत
प्रतिनिधी मुंबई:
सोमवार दिनांक 26 जुन 2023 पासून रात्री साडे दहा वाजता नव्याने सुरू झालेल्या कस्तुरी या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आशु सुरपूर ही एका महत्त्वाच्या भूमिका मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये तिच्यासोबत शिल्पा कुलकर्णी यांची भूमिका असून या मालिकेचे दिग्दर्शक  दीपक नलावडे आहेत. 
आज पर्यंत अनेक  चित्रपटांमध्ये आपण तिला पाहिलेले आहे. या मालिकेच्या निमित्ताने गप्पा मारत असताना आपण स्वकष्टाने आतापर्यंत जवळपास 20 मालिकांमध्येही  अभिनयाचा प्रवास  पूर्ण केल्याचे तिने सांगितले. कोविडच्या कालावधीमध्ये अचानक झालेल्या आईच्या निधनामुळे ती पूर्ण खचून गेली होती. इंडस्ट्रीमध्ये पुन्हा आगमन करण्यासाठी कस्तुरी मालिकेचे कार्यकारी निर्माते सुनील कुलकर्णी यांनी दिलेली संधी तिने स्वीकारली. त्याबद्दल ती त्यांचे आभारही मानते. 
"सुरुवात छोटी असली तरी चालेल, मोठे होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे असते". असे मत व्यक्त करून आशु सुरपूर हिने तिच्या महाराष्ट्रातील तमाम चाहत्या प्रेक्षकांना ही मालिका बघण्याचे आवाहन केले आहे. 
जनहित न्युज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट आणि टीम तर्फे  पुढील वाटचालीसाठी आशु सुरपूर हिला भरपूर शुभेच्छा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप