पोस्ट्स

एक अविस्मरणीय क्षण ९ मे २०२४ माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस

इमेज
एक अविस्मरणीय क्षण ९ मे २०२४ माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस  मुंबई:आमचे मित्र किरण कुडाळकर यांनी  अचानक बोलावून दिलेला सत्कार हा खरंच आश्चर्यकारक होता , निवेदक संतोष जी आणि  सचिन जी ,हरी पाटकर सर माझे जुने मित्र यांनी माझे नाव सत्कारारसाठी पुकारून  एक धक्का दिला , आत्तापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून सत्कार होत आला आहे.  ९ मे २०२४  रोजी " महाराष्ट्र बाजारपेठ " यांचा  " ७ वर्धापन दिवस " होता आणि या गुणगौरव सोहळ्यात मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांसोबत माझा सुद्धा सत्कार सत्कार झाला हे माझे भाग्य म्हणायचे . या गुण गौरव सोहळ्यात माझा सत्कार केला  त्याबद्दल मी महाराष्ट्र बाजारपेठ चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्माननीय डॉ. कौतिक दांडगे सरांचा शतश आभारी आहे.. महाराष्ट्र बाजारपेठ च्या ७ व्या  वर्धापन दिनानिमित्त गुणगौरव पुरस्कार सोहळा - २०२४ ,चा गुरुवारी ९  मे  २०२४ ला दुपारी ठीक ३.३० वाजता सुरू झाला आणि रात्री १२ वाजता संपला ... तरी मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे , आपण सर्वांनी दादर येथील श्री शिवाजी नाट्यमंदिर येथे या सोहळ्यास उपस्थिती दर्शविली. अनेक नवीन जुने

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तर्फे केंद्रप्रमुख गणेश तळेकर यांचा सत्कार

इमेज
गणेश तळेकर यांचा अ. भा.म.नाटय परिषद तर्फे मुंबई केंद्रप्रमुख म्हणून सन्मानचिन्ह देऊन सत्कार   मुंबई : अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या *१००वे* वर्ष निमित्ताने "नाट्यजागर स्पर्धा" भरविण्यात आली , त्यात "नाट्यसंगीत पद" स्पर्धा घेण्यात आली, दिनांक : ६ मे २०२४ रोजी अ.भा.मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त श्री. शशी प्रभू, प्रमुख कार्यवाह अजित भुरे, कोषाध्यक्ष सतीश लोटके, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज डाफळे, प्रसिद्ध सिने- नाटय विजय गोखले व सविता मालपेकर , परिक्षक - शारदा दादरकर, ज्ञानेश पेंढारकर, मधुवंती दांडेकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.     अखिल भारतीय मराठी नाटय परिषद तर्फे " नाट्यजागर स्पर्धा - २०२४ " मध्ये मुंबई यशवंतराव नाटय संकुल , माटुंगा येथे माझा " मुंबई केंद्रप्रमुख म्ह्णून सन्मानचिन्ह " देऊन मान्यवर परिक्षक प्रसिद्ध मधुवंती दांडेकर , शारदा दादरकर ,ज्ञानेश पेंढारकर व प्रसिद्ध सिने-नाटय अभिनेत्री सविता मालपेकर, विजय गोखले यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.मला दिलेल्या या सन्मानाबद्दल मी अखिल भारतीय मराठी नाटय परिषद

कविता जीवन मूल्यांची वाहिनी असते. - प्रा .दामोदर मोरे

इमेज
कविता जीवन मूल्यांची वाहिनी असते.                                   - प्रा .दामोदर मोरे (प्रतिनिधी आशा रणखांबे) नेरळ : कविता ही जीवन मूल्यांची वाहिनी असते. मूल्यें समाजाची पातळी  उंचावण्याचे काम करीत असतात. कवितेला करुणा या मूल्याचे अधिष्ठान असले पाहिजे. संघपाल वाठोरे यांच्या 'अन् देव निरुत्तर झाला' या कविता संग्रहाला जशी ग्रामीण, सामाजिक पर्यावरणाची पार्श्वभूमी आहे तशीच माथेरान सारख्या निसर्ग रम्य ठिकाणाचीही पार्श्वभूमी आहे. तरल संवेदनशीलता, संवाद शैली आणि ग्रामीण बोलीचा जिवंत झरा यामुळे या कविता मनाची पकड घेतात." असे प्रतिपादन जेष्ठ मराठी हिंदी साहित्यिक प्रा.दामोदर मोरे यांनी केले. संघपाल वाठोरे यांच्या 'अन् देव निरुत्तर झाला' या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभात अध्यक्षीय भाषण करतांना ते हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृह बोपेले नेरळ येथे  बोलत होते .     पीपल्स पब्लिकेशनकडून  प्रकाशित करण्यात आलेल्या 'अन् देव निरुत्तर झाला' या कवितासंग्रहाचे प्रकाशन जोशी बेडेकर महाविद्यालयाचे माजी  मराठी  विभागप्रमुख, मराठी व हिंदी ज्येष्ठ सा

भंडारी हायस्कूलची माजी विद्यार्थीनी असलेल्या हर्षदा हिचा मुंबई दादर येथील भंडारी कित्ते मंडळ हॉल येथे सत्कार

इमेज
भंडारी हायस्कूलची माजी विद्यार्थीनी असलेल्या हर्षदा हिचा मुंबई दादर येथील भंडारी कित्ते मंडळ हॉल येथे सत्कार मुंबई:भारतीय सैन्यामार्फत घेण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील फायरिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून २४ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यामध्ये मालवण मधील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची विद्यार्थिनी हर्षदा दादा  पवार हिची निवड झाली आहे. आतापर्यंत बटालियन आणि ग्रुप मधून तीन राउंड यशस्वी पूर्ण करून चौथ्या राऊंडसाठी तिची निवड झाली आहे.  स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात  शिक्षण घेणाऱ्या  हर्षदा पवार हीचे शालेय शिक्षण मालवणच्या भंडारी हायस्कूल मध्ये झाले असून  तीन वर्षापूर्वी भंडारी हायस्कूल मध्ये शिक्षण घेत असताना तिने राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज स्पर्धेत संघ निवडीच्या पात्रता फेरीसाठी तिची निवड झाली होती तर नेमबाज स्पर्धेत कु  हर्षदा हिने यश मिळविल्याने भंडारी एज्युकेशन सोसायटी ( मालवण ) मुंबई  यांनी भंडारी हायस्कूलची माजी विद्यार्थीनी असलेल्या हर्षदा हिचा मुंबई दादर येथील भंडारी कित्ते मंडळ हॉल येथे सत्कार करण्यात आला होता अशी माहिती मुं

भारतीय बौध्द महासभा उल्हासनगर तालुका शाखेचे वतीने कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न

इमेज
भारतीय बौध्द महासभा उल्हासनगर तालुका शाखेचे वतीने कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न  (प्रतिनिधी:अशोक शिरसाट ) उल्हासनगर भारतीय बौध्द महासभा राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका आद मीराताई यशवंतराव आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन डॉ हरीश  रावलिया, रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन अॕड सुभाष जोंधळे, कार्याध्यक्ष डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर, यांच्या आदेशानुसार, राष्ट्रीय उपाध्यक्ष अॕड एस  के भंडारे सर, राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड गुरुजी, केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख अॕड एस एस वानखेडे सर, यांच्या मार्गदर्शनाखालील सोमवार दि ६ मे २०२४ रोजी उल्हासनगर - मध्ये सुभाष नगर पंचशील बुद्ध विहारात उल्हासनगर तालुका शाखेच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होत या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक व्हि जाधव होते तसेच या संवाद मेळाव्याचे उद्घाटन ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी यांच्या हस्ते झाले तसेच या मेळाव्यात ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सुर्यवंशी सर, सचिव कातीलाल  भडांगे गुरुजी,  आरतीताई  कांबळे,  यांनी मार्गदर्शन केले होते तसेच या कार्यक्रमात वंचितांच्या  रेखाताई, कुरवाडे, रेखाता