आता ‘या’ नवीन तारखेला होणार अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक
आता ‘या’ नवीन तारखेला होणार अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक (अंबरनाथ वृत्त) मतदान अवघ्या काही तासांवर असताना काही नगरपालिका आणि नगरपरिषदांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. यात अंबरनाथ नगरपरिषदेचाही समावेश आहे. या नगरपरिषदेची निवडणूक वीस दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे.नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकींच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील काही नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीला ब्रेक लागला आहे. यात अंबरनाथ नगरपरिषदेचाही समावेश आहे. अंबरनाथ नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 2 डिसेंबरला होणारं मतदान आता थेट 20 डिसेंबरला होणार आहे. निवडणूक अधिकारी विजयानंद शर्मा यांनी याबाबतची माहिती दिली. तर कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात सहा प्रभागांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आलं आहे. कोणत्या प्रभागातील निवडणूक पुढे ढकलली? अंबरनाथ नगरपरिषेदतील प्रभाग क्रमांक 5 ब आणि प्रभाग 15 ब, प्रभाग क्रमांक 17 अ, प्रभाग क्रमांक 10 ब, प्रभाग क्रमांक 8 अ, प्रभाग 19 अ या प्रभागात नव्या कार्यक्रमानुसार निवडणूक घ्य...