पलावा तमिळ संगम'तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्याचा जागर
पलावा तमिळ संगम'तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्याचा जागर * डोंबिवली: प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'पलावा तमिळ संगम' (PTS) या संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यंदाच्या वर्षी देखील या परंपरेचे जतन करत संस्थेने डोंबिवलीतील 'रोटरी मूक-बधिर विद्यालया'ला आर्थिक मदत सुपूर्द केली, तसेच वृद्धाश्रमात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून एक आगळावेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. मूक-बधिर विद्यालयाला आर्थिक बळ संस्थेच्या महिला विभागाने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता. सदस्या उमा मणिकवासगम आणि लक्ष्मी वैरावन यांच्या समन्वयाखाली महिला विंगने या सत्कार्यासाठी भरीव निधी संकलित केला. 'पलावा तमिळ संगम'चे अध्यक्ष पांडियन सर, समिती सदस्य लक्ष्मी वयरवन, श्रीविद्या, कलावती जी, आणि मालती यांनी प्रत्यक्ष विद्यालयाला भेट देऊन शाळेच्या प्रमुखांकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी सदस्यांनी वर्गांना भेटी देऊन मुलांशी संवाद साधला. मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि शिक्षकांचे समर्पण पाहून सर्व सदस्य भा...