पोस्ट्स

पलावा तमिळ संगम'तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्याचा जागर

इमेज
पलावा तमिळ संगम'तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्याचा जागर  * डोंबिवली: प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट*   जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'पलावा तमिळ संगम' (PTS) या संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यंदाच्या वर्षी देखील या परंपरेचे जतन करत संस्थेने डोंबिवलीतील 'रोटरी मूक-बधिर विद्यालया'ला आर्थिक मदत सुपूर्द केली, तसेच वृद्धाश्रमात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून एक आगळावेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. मूक-बधिर विद्यालयाला आर्थिक बळ संस्थेच्या महिला विभागाने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता. सदस्या उमा मणिकवासगम आणि लक्ष्मी वैरावन यांच्या समन्वयाखाली महिला विंगने या सत्कार्यासाठी भरीव निधी संकलित केला. 'पलावा तमिळ संगम'चे अध्यक्ष पांडियन सर, समिती सदस्य लक्ष्मी वयरवन, श्रीविद्या, कलावती जी, आणि मालती यांनी प्रत्यक्ष विद्यालयाला भेट देऊन शाळेच्या प्रमुखांकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी सदस्यांनी वर्गांना भेटी देऊन मुलांशी संवाद साधला. मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि शिक्षकांचे समर्पण पाहून सर्व सदस्य भा...

समाज सेवा के क्षेत्र में 'सिमरन सेवा एनजीओ का सराहनीय कदम; पटेल रिटेल लिमिटेड' ने सी एस आर के माध्यम से बढ़ाया मदद का हाथ

इमेज
समाज सेवा के क्षेत्र में 'सिमरन सेवा एनजीओ का सराहनीय कदम; '* पटेल रिटेल लिमिटेड' ने सी एस आर के माध्यम से बढ़ाया मदद का हाथ उल्हासनगर: रिपोर्टर बाळकृष्ण आल्हाट*                     पिछले 12 वर्षों से निरंतर समाज के जरूरतमंद वर्गों की सेवा में समर्पित 'सिमरन सेवा एन जी ओ के राजकुमार शर्मा के  कार्यों को देखते हुए, प्रसिद्ध रिटेल श्रृंखला 'पटेल रिटेल लिमिटेड' ने अपना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सी एस आर योगदान संस्था को प्रदान किया है। इस सहयोग का उद्देश्य समाज के वंचित लोगों तक आवश्यक सहायता पहुँचाना है समाज सेवा के क्षेत्र में 'सिमरन सेवा एनजीओ का सराहनीय कदम;  पटेल रिटेल लिमिटेड' ने सी एस आर के माध्यम से बढ़ाया मदद का हाथ उल्हासनगर: पिछले 12 वर्षों से निरंतर समाज के जरूरतमंद वर्गों की सेवा में समर्पित 'सिमरन सेवा एनजीओ के कार्यों को देखते हुए, प्रसिद्ध रिटेल श्रृंखला 'पटेल रिटेल लिमिटेड' पटेल लो प्राईसने अपना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सी एस आर योगदान संस्था को प्रदान किय...

अध्यक्ष चषक २०२६:* अंबरनाथ शिवसेना नगरसेवक संघाचा दणदणीत विजय

इमेज
* अध्यक्ष चषक २०२६ :* अंबरनाथ शिवसेना नगरसेवक संघाचा दणदणीत विजय ​ * कल्याण/डोंबिवली:*  शिवसेनेचे कल्याण-डोंबिवलीतील ज्येष्ठ नगरसेवक मा. अर्जुनशेट पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'अध्यक्ष चषक २०२६' या क्रिकेट स्पर्धेत राजकीय मैदानानंतर आता क्रिकेटच्या मैदानावरही अंबरनाथच्या नगरसेवकांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शिवसेना अंबरनाथ नगरसेवक+युवासेना विरुद्ध कल्याण-डोंबिवली नगरसेवक+युवासेना यांच्यात रंगलेल्या प्रेक्षणीय सामन्यात अंबरनाथ संघाने एकतर्फी विजय मिळवत बाजी मारली. ​ * अंबरनाथ संघाची अष्टपैलू कामगिरी*  या अटीतटीच्या लढतीत नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ संघाने मैदानात उतरत उत्कृष्ट रणनीती आखली होती. प्रथम फलंदाजी करताना अंबरनाथ संघाने अवघ्या ४ षटकांत २ गडी गमावून ४६ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये नगरसेवक शैलेश भोईर यांनी स्फोटक फलंदाजी करत संघाला भक्कम धावसंख्या उभारून दिली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना 'सामनावीर' (Man of the Match) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ​ * सार्थक साळुंके यांची ...

उल्हासनगर तहसील कार्यालयामार्फत 'महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न*

इमेज
*उल्हासनगर तहसील कार्यालयामार्फत 'महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न*  ​एकाच छताखाली विविध शासकीय दाखले व सेवांचे वाटप; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ​ *उल्हासनगर:* महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली, उल्हासनगर तहसील कार्यालयाच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' अभियानाचे शनिवारी, ७ मार्च २०२६ रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले. नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवा आणि दाखले विनाविलंब उपलब्ध करून देणे, हा या शिबिराचा *मुख्य उद्देश होता.*  ​तहसीलदार कार्यालयातील कॅम्प नंबर ५ येथे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर पार पडले. तहसीलदार कल्याणी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे जागेवरच वाटप करण्यात आले. ​ *विविध सेवांचा लाभ*  ​या शिबिरात नागरिकांच्या सुविधेसाठी विविध कक्षांची स्थापना करण्यात आली होती, ज्यामध्ये खालील सेवा पुरवण्यात आल्या: ​ *महसूल दाखले:* उत्पन्न द...

कालकथित सावित्रीबाई दामू सुरवाडे यांचा उद्या प्रथम स्मृतिदिन; कल्याण येथे अभिवादन सभेचे आयोजन*

इमेज
* कालकथित सावित्रीबाई दामू सुरवाडे यांचा उद्या प्रथम स्मृतिदिन; कल्याण येथे अभिवादन सभेचे आयोजन*   * कल्याण:*  बहुजन संग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा वृत्तदर्शन मीडियाचे संपादक भीमराव निकम-चिलगावकर यांच्या भगिनी  कालकथित सावित्रीबाई दामू सुरवाडे यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम उद्या, रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दुपारी १२ वाजता लेक कॅन्सल बिल्डिंग (रूम नं. ७०४), बिर्ला कॉलेज जवळ, कल्याण (पश्चिम), जिल्हा ठाणे येथे संपन्न होईल.  * मेहनती आणि संघर्षमय जीवनप्रवास*  सावित्रीबाई सुरवाडे यांचा जीवनप्रवास अत्यंत कष्टप्रद आणि प्रेरणादायी राहिला आहे. मूळच्या वाकडी येथील असलेल्या सावित्रीबाई पतीच्या निधनानंतर आपल्या तीन मुलांसह चिलगाव येथे माहेरी आल्या होत्या. त्यांचे काका रामा निकम (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे खंदे समर्थक) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भीमराव निकम-चिलगावकर व त्यांच्या बंधूंच्या (सुखदेव व श्रावण निकम) सहकार्याने त्यांनी आपल्या मुलांचे संगोपन केले. ' * सावित्रीबाई यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत ...

भारत पुन्हा गुलामगिरीच्या दिशेने; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात*

इमेज
* भारत पुन्हा गुलामगिरीच्या दिशेने; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात*   * मुंबई/ (प्रतिनिधी, अशोक शिरसाट)*  आर.एस.एस.चे इस्रायलशी असलेले संबंध, केंद्राचे परराष्ट्र धोरण आणि अमेरिकेसोबतचे एकतर्फी करार यामुळे भारत पुन्हा एकदा गुलामगिरीच्या दिशेने जात असल्याची भीती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. या धोरणांमुळे भारतीय नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली असून, देशात संतापाची लाट असल्याचे सांगत आंबेडकरांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेल्या 'एपस्टीन फाईल्स' आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या एकतर्फी व्यापार कराराच्या निषेधार्थ सोमवारी मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसर कार्यकर्त्यांच्या घोषणांनी दणाणून गेला होता. ' * मोदी हटाव, देश बचाव'च्या घोषणांनी मुंबई दणाणली*  या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी 'मोदी हटाव, देश बचाव' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आंदोलनाचे गांभीर्य लक्ष...

दिव्यांगांना आता १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य; तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णयतीन दशकानंतर निधीत १५ पट वाढ; स्वयंरोजगारासाठी 'दिव्यांग सहाय्यक' पोर्टलवर नोंदणीचे आवाहन

इमेज
दिव्यांगांना आता १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य; तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय तीन दशकानंतर निधीत १५ पट वाढ; स्वयंरोजगारासाठी 'दिव्यांग सहाय्यक' पोर्टलवर नोंदणीचे आवाहन मुंबई : राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी आणि त्यांच्या स्वयंरोजगाराला बळ देण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री (टूलकिट) खरेदी करण्याकरिता आता १,००० रुपयांऐवजी थेट १५,००० रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तब्बल ३० वर्षांनंतर या रकमेत १५ पटीने वाढ करण्यात आल्याने दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, "विकसित महाराष्ट्र २०४७" या आराखड्याचा भाग म्हणून दिव्यांगांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हे शासनाचे मुख्य ध्येय आहे. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि स्वरूप थेट लाभ हस्तांतरण (DBT): मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाईल. पात्रता: अर्जदाराने शासकीय किंवा शासनमान्य संस्थेतून कौशल्य ...