*समर्पण चँरिटेबल ट्रस्टने साजरी केली आदिवासी पाड्यावर आपुलकीची दिवाळी.* सोमवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२० रोजी भाऊबीजचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेल्या माऊली गडाच्या पायथ्याशी असलेल्या तानसा अभयारण्यातील घनदाट जंगलाने वेढलेल्या दुर्गम भागातील दुर्लक्षित,उपेक्षित आदिवासी बहुल वस्तीच्या खोर गावातील नागरिकांना दिवाळी फराळाचे साहित्य,महिलांना साडी तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करून संस्थेच्या वतीने आपुलकीची दिवाळी - २०२० हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी तानसा वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने,खोर - वांद्रे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच वनिता झुगरे,वांद्रे गावचे सुपुत्र ठाणे ग्रामीण पोलीस विभागात कार्यरत असलेले शिंगे मेजर,खोर गावाचे पोलीस पाटील पांडुरंग दुभेले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सदरील कार्यक्रमात वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तानसा वन्यजीव विभागातील वनक्षेत्र पिवळीचे वनपाल व्हि.के.दरेकर वनरक्षक बी.जी.शिंदे,एस.ए.खंडागळे,एस.एच.पेढवी,प्रसाद पाटील,दिपक लटपटे,सुनिल वाटोरे यांनी कार्यक...