वंचित बहुजन महिला आघाडी यांच्या वतीने शुगर, ब्लड प्रेशर, तसेच डोळे तपासणी शिबिराचे आयोजन

वंचित बहुजन महिला आघाडी यांच्या वतीने 
शुगर, ब्लड प्रेशर, तसेच डोळे तपासणी शिबिराचे आयोजन 
 8 ऑक्टोबर 2022 रोजी वंचित बहुजन महिला आघाडी आणि पिरामल स्वास्थ यांच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी फ्री शुगर, ब्लड प्रेशर आणि डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले
वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष,माया ताई कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उल्हासनगर शहर महिला अध्यक्ष रेखाताई संदीप उबाळे, यांच्या पुढाकाराने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते 
शिबिरात जवळपास 100 नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली. तसेच गरजू नागरिकांना एक महिन्याचे मोफत औषध देण्यात आले,आणि भविष्यातही ही मदत त्यांना कायमस्वरूपी देण्यात येणार आहे. तसेच डोळे तपासणी मोफत करण्यात आली व अल्प दरात चष्मे पुरविण्यात आले, 
या वेळी उल्हासनगर शहर अध्यक्ष शेषराव वाघमारे यांनी कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली.
या शिबीराला यशस्वी करण्यासाठी,शहर संघटक शीतल ताई कर्डक, कामनाताई म्हस्के,  नंदाताई मिसाळ, पुनमताई देशमुख, लक्ष्मीताई चंदनशिव, सहसचिव सुनील इंगळे, संदीप उबाळे गुरुजी, निशांत कांबळे, विशाल म्हस्के, अक्षय इंगळे, सिद्धार्थ बागडे, पत्रकार हरी आल्हाट, पिरामल स्वास्थ चे डॉ. स्वाती जाधव मॅडम आणि त्यांची टीम यांचे सहकार्य लाभले अशी माहिती 
उल्हासनगर महिला अध्यक्ष रेखाताई संदीप उबाळे यांनी दिली 
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार