नासिक मध्ये उभ्या असलेल्या बसला लागली आग

*नासिक मध्ये उभ्या असलेल्या बसला लागली आग*                           
नाशिक: नाशिकमध्ये मोठी दुर्घटना टळली,,नाशिकच्या नांदगाव बसस्थानकात उभ्या असलेल्या बसने अचानक पेट घेतला.आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही क्षणात बस पूर्णपणे जळून खाक झाली. बसमधील चालक - वाहकासह सर्व प्रवासी हे खाली उतरलेले असल्याने मोठा अनर्थ टळला.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

नाशिकच्या नांदगाव बस स्थानकात हा प्रकार घडला. बस मधून धूर येत होता. यामुळे वाहक आणि चालकाने सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. आजूबाजूला उभ्या असलेल्या बस प्रसंगावधान राखत सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्या. तसेच प्रवाशांना तात्काळ बाजूला हलविण्यात आल्याने इतर नुकसान टळले.
दरम्यान, बसला आग लागली तेव्हा आग थोड्या प्रमाणात होती मात्र आगीवर नियंत्रण मिळविण्याची साधनसामुग्री वेळेत उपलब्ध न झाल्याने बस पूर्णतः जळून खाक झाली. बॅटरीच्या शॉर्ट सर्किट झाल्याने बस पेटली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप