मुं. म.साहित्य संघाचे सं.माऊली नाटकदिल्लीच्या एन एस डी भारंगम मध्ये विशेष निमंत्रित

मुं. म.साहित्य संघाचे सं.माऊली नाटक
दिल्लीच्या एन एस डी भारंगम मध्ये विशेष निमंत्रित.
साहित्य संघाने निर्मिती केलेले प्रदिप ओक लिखित आणि प्रमोद पवार दिग्दर्शित  संगीत माऊली नाटकाला विशेष निमंत्रित केले आहे.याचे संगीत- डॉ राम पंडित ,नेपथ्य- सुधीर ठाकूर,प्रकाश - श्याम चव्हाण यांची असून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेल्या साहिल विशे,तन्वी गोरे, श्रेयस व्यास ,डॉ गौरी पंडित अशी नव्या दमाची मंडळी काम करीत आहेत. नुकताच डॉ.गौरी पंडित हिला दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा उदयोन्मुख संगीत नाट्य कलाकार पुरस्कार मिळाला. साहिल इंजिनिअरिंग तर श्रेयस कला शाखेत शिक्षण घेत आहेत. तन्वी शास्त्रीय गायन, कथकमधेही पारंगत आहे. यांच्या जोडीला कविता विभावरी,आनंद पालव,मनोज नटे,सचिन नवरे आहेत.
विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या जीवन प्रवासावर हे नाटक बेतलेले आहे. सुमधुर संगीत आणि उत्तम अभिनय यामुळे रसिकांच्या मनाचा हे नाटक ठाव घेते. १५ फेब्रुवारी ला, श्रीराम सेंटर,नवी दिल्ली येथे सायं. ६ वाजता याचा प्रयोग सादर होईल.
 दिल्लीतील मराठी मंडळी, खासदार, सनदी अधिकारी खास निमंत्रित आहेत. अशी माहिती गणेश तळेकर यांनी जनहित न्युज महाराष्ट्रला दिली 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप