घबाडकुंड'च्या सेटवरचा मजेशीर किस्सा; १९ जूनला उलगडणार रहस्याचा पडदा
फिटनेसच्या बाबतीत देवदत्त नागेचा 'रोल मॉडेल' कुशल बद्रिके! ' घबाडकुंड'च्या सेटवरचा मजेशीर किस्सा; १९ जूनला उलगडणार रहस्याचा पडदा मुंबई (विशेष प्रतिनिधी : गणेश तळेकर) : मनोरंजन सृष्टीतील 'पिळदार शरीरयष्टी' आणि दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता देवदत्त नागे सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. आपल्या फिटनेससाठी प्रचंड मेहनत घेणाऱ्या देवदत्तने चक्क अभिनेता कुशल बद्रिके हा आपला 'फिटनेस रोल मॉडेल' असल्याचा खुलासा केला आहे. आगामी 'घबाडकुंड' चित्रपटाच्या फर्स्ट लूक लाँच सोहळ्यात देवदत्तने सेटवरील हे मजेशीर गुपित उघड केले. मैत्री आणि फिटनेसची अनोखी जुगलबंदी 'घबाडकुंड' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणींना उजाळा देताना देवदत्त नागे म्हणाला, "मित्रांकडून मिळणारी प्रेरणा आयुष्याला नवी ऊर्जा देते. माझ्यासाठी फिटनेसच्या बाबतीत कुशल बद्रिके खऱ्या अर्थाने रोल मॉडेल आहे." देवदत्तने पुढे सेटवरची धमाल सांगताना कुशलची फिरकी घेतली. "पहाटेच्या अंधारात दिव्याच्या प्रकाशात कुशलसोबत केलेला व्यायाम, त्यानंतर घेतलेला फ...