३२वर्षाच्या यशस्वी सेवेनंतर एमआयडीसीचे उपअभियंता सुधीर कुंभार सेवानिवृत्त
अंबरनाथमधील अति. एमआयडीसी उपविभागात निरोप समारंभ संपन्न; मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव *अंबरनाथ (प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट):* महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अतिरिक्त अंबरनाथ उपविभागाचे उप अभियंता सुधीर कुंभार हे आपल्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर ३० मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त ३० मार्च २०२६ रोजी अंबरनाथ येथील 'सुदामा हॉटेल, कृष्णा पॅलेस' येथे एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत भावूक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी कुंभार यांच्या कार्यशैलीचा गौरव केला. *कर्तव्यतत्पर आणि अभ्यासू अधिकारी* सुधीर कुंभार यांनी आपल्या ३२ वर्षांच्या सेवाकाळात अनेक आव्हानात्मक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले. लोकप्रतिनिधी, उद्योजक, पत्रकार किंवा सामान्य कर्मचारी असो, प्रत्येकाचे प्रश्न स्मितहास्याने ऐकून घेऊन ते मार्गी लावण्याकडे त्यांचा कल असे. मितभाषी आणि साधे व्यक्तिमत्व असूनही कर्तव्यपालनात ते तितकेच कठोर होते. विभागातील कामकाजा...