पोस्ट्स

३२वर्षाच्या यशस्वी सेवेनंतर एमआयडीसीचे उपअभियंता सुधीर कुंभार सेवानिवृत्त

इमेज
अंबरनाथमधील अति. एमआयडीसी उपविभागात निरोप समारंभ संपन्न; मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव  *अंबरनाथ (प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट):*  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अतिरिक्त अंबरनाथ उपविभागाचे उप अभियंता सुधीर कुंभार हे आपल्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर ३० मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त ३० मार्च २०२६ रोजी अंबरनाथ येथील 'सुदामा हॉटेल, कृष्णा पॅलेस' येथे एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत भावूक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी कुंभार यांच्या कार्यशैलीचा गौरव केला.   *कर्तव्यतत्पर आणि अभ्यासू अधिकारी*  सुधीर कुंभार यांनी आपल्या ३२ वर्षांच्या सेवाकाळात अनेक आव्हानात्मक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले. लोकप्रतिनिधी, उद्योजक, पत्रकार किंवा सामान्य कर्मचारी असो, प्रत्येकाचे प्रश्न स्मितहास्याने ऐकून घेऊन ते मार्गी लावण्याकडे त्यांचा कल असे. मितभाषी आणि साधे व्यक्तिमत्व असूनही कर्तव्यपालनात ते तितकेच कठोर होते. विभागातील कामकाजा...

पलावा तमिळ संगम'तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्याचा जागर

इमेज
पलावा तमिळ संगम'तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्याचा जागर  * डोंबिवली: प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट*   जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'पलावा तमिळ संगम' (PTS) या संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यंदाच्या वर्षी देखील या परंपरेचे जतन करत संस्थेने डोंबिवलीतील 'रोटरी मूक-बधिर विद्यालया'ला आर्थिक मदत सुपूर्द केली, तसेच वृद्धाश्रमात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून एक आगळावेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. मूक-बधिर विद्यालयाला आर्थिक बळ संस्थेच्या महिला विभागाने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता. सदस्या उमा मणिकवासगम आणि लक्ष्मी वैरावन यांच्या समन्वयाखाली महिला विंगने या सत्कार्यासाठी भरीव निधी संकलित केला. 'पलावा तमिळ संगम'चे अध्यक्ष पांडियन सर, समिती सदस्य लक्ष्मी वयरवन, श्रीविद्या, कलावती जी, आणि मालती यांनी प्रत्यक्ष विद्यालयाला भेट देऊन शाळेच्या प्रमुखांकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी सदस्यांनी वर्गांना भेटी देऊन मुलांशी संवाद साधला. मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि शिक्षकांचे समर्पण पाहून सर्व सदस्य भा...

समाज सेवा के क्षेत्र में 'सिमरन सेवा एनजीओ का सराहनीय कदम; पटेल रिटेल लिमिटेड' ने सी एस आर के माध्यम से बढ़ाया मदद का हाथ

इमेज
समाज सेवा के क्षेत्र में 'सिमरन सेवा एनजीओ का सराहनीय कदम; '* पटेल रिटेल लिमिटेड' ने सी एस आर के माध्यम से बढ़ाया मदद का हाथ उल्हासनगर: रिपोर्टर बाळकृष्ण आल्हाट*                     पिछले 12 वर्षों से निरंतर समाज के जरूरतमंद वर्गों की सेवा में समर्पित 'सिमरन सेवा एन जी ओ के राजकुमार शर्मा के  कार्यों को देखते हुए, प्रसिद्ध रिटेल श्रृंखला 'पटेल रिटेल लिमिटेड' ने अपना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सी एस आर योगदान संस्था को प्रदान किया है। इस सहयोग का उद्देश्य समाज के वंचित लोगों तक आवश्यक सहायता पहुँचाना है समाज सेवा के क्षेत्र में 'सिमरन सेवा एनजीओ का सराहनीय कदम;  पटेल रिटेल लिमिटेड' ने सी एस आर के माध्यम से बढ़ाया मदद का हाथ उल्हासनगर: पिछले 12 वर्षों से निरंतर समाज के जरूरतमंद वर्गों की सेवा में समर्पित 'सिमरन सेवा एनजीओ के कार्यों को देखते हुए, प्रसिद्ध रिटेल श्रृंखला 'पटेल रिटेल लिमिटेड' पटेल लो प्राईसने अपना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सी एस आर योगदान संस्था को प्रदान किय...

अध्यक्ष चषक २०२६:* अंबरनाथ शिवसेना नगरसेवक संघाचा दणदणीत विजय

इमेज
* अध्यक्ष चषक २०२६ :* अंबरनाथ शिवसेना नगरसेवक संघाचा दणदणीत विजय ​ * कल्याण/डोंबिवली:*  शिवसेनेचे कल्याण-डोंबिवलीतील ज्येष्ठ नगरसेवक मा. अर्जुनशेट पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'अध्यक्ष चषक २०२६' या क्रिकेट स्पर्धेत राजकीय मैदानानंतर आता क्रिकेटच्या मैदानावरही अंबरनाथच्या नगरसेवकांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शिवसेना अंबरनाथ नगरसेवक+युवासेना विरुद्ध कल्याण-डोंबिवली नगरसेवक+युवासेना यांच्यात रंगलेल्या प्रेक्षणीय सामन्यात अंबरनाथ संघाने एकतर्फी विजय मिळवत बाजी मारली. ​ * अंबरनाथ संघाची अष्टपैलू कामगिरी*  या अटीतटीच्या लढतीत नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ संघाने मैदानात उतरत उत्कृष्ट रणनीती आखली होती. प्रथम फलंदाजी करताना अंबरनाथ संघाने अवघ्या ४ षटकांत २ गडी गमावून ४६ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये नगरसेवक शैलेश भोईर यांनी स्फोटक फलंदाजी करत संघाला भक्कम धावसंख्या उभारून दिली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना 'सामनावीर' (Man of the Match) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ​ * सार्थक साळुंके यांची ...

अभिनेत्री मीनाक्षी पाखरे :अभिनयाच्या चंदेरी दुनियेतून समाजसेवेचा 'झंझावात'

इमेज
अभिनेत्री मीनाक्षी पाखरे :अभिनयाच्या चंदेरी दुनियेतून समाजसेवेचा 'झंझावात' समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा संस्थे'च्या माध्यमातून समाजसेवेचा वसा; शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि व्यसनमुक्तीसाठी उल्लेखनीय कार्य मुंबई : प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट  अभिनय क्षेत्रातील एक चमकणारा चेहरा आणि तितकीच प्रबळ सामाजिक बांधिलकी जपणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून अभिनेत्री मीनाक्षी महादेव पाखरे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ रुपेरी पडद्यावर भूमिका साकारण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांनी 'समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा संस्थे'च्या माध्यमातून समाजसेवेचा डोंगर उभा केला आहे. शिक्षण, महिला सक्षमीकरण, पर्यावरण रक्षण आणि व्यसनमुक्ती अशा विविध क्षेत्रांत त्या सध्या झोकून देऊन कार्य करत आहेत. कला क्षेत्रातील यशस्वी वाटचाल कांदिवली (पूर्व) येथील रहिवासी असलेल्या मीनाक्षी पाखरे यांनी मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं', 'गाथा नवनाथांची', 'प्रतिशोध', 'स...

घबाडकुंड'च्या सेटवरचा मजेशीर किस्सा; १९ जूनला उलगडणार रहस्याचा पडदा

इमेज
फिटनेसच्या बाबतीत देवदत्त नागेचा 'रोल मॉडेल' कुशल बद्रिके! ​' घबाडकुंड'च्या सेटवरचा मजेशीर किस्सा; १९ जूनला उलगडणार रहस्याचा पडदा ​मुंबई (विशेष प्रतिनिधी : गणेश तळेकर) : मनोरंजन सृष्टीतील 'पिळदार शरीरयष्टी' आणि दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता देवदत्त नागे सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. आपल्या फिटनेससाठी प्रचंड मेहनत घेणाऱ्या देवदत्तने चक्क अभिनेता कुशल बद्रिके हा आपला 'फिटनेस रोल मॉडेल' असल्याचा खुलासा केला आहे. आगामी 'घबाडकुंड' चित्रपटाच्या फर्स्ट लूक लाँच सोहळ्यात देवदत्तने सेटवरील हे मजेशीर गुपित उघड केले. ​मैत्री आणि फिटनेसची अनोखी जुगलबंदी 'घबाडकुंड' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणींना उजाळा देताना देवदत्त नागे म्हणाला, "मित्रांकडून मिळणारी प्रेरणा आयुष्याला नवी ऊर्जा देते. माझ्यासाठी फिटनेसच्या बाबतीत कुशल बद्रिके खऱ्या अर्थाने रोल मॉडेल आहे." देवदत्तने पुढे सेटवरची धमाल सांगताना कुशलची फिरकी घेतली. "पहाटेच्या अंधारात दिव्याच्या प्रकाशात कुशलसोबत केलेला व्यायाम, त्यानंतर घेतलेला फ...

उल्हासनगर तहसील कार्यालयामार्फत 'महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न*

इमेज
*उल्हासनगर तहसील कार्यालयामार्फत 'महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न*  ​एकाच छताखाली विविध शासकीय दाखले व सेवांचे वाटप; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ​ *उल्हासनगर:* महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली, उल्हासनगर तहसील कार्यालयाच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' अभियानाचे शनिवारी, ७ मार्च २०२६ रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले. नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवा आणि दाखले विनाविलंब उपलब्ध करून देणे, हा या शिबिराचा *मुख्य उद्देश होता.*  ​तहसीलदार कार्यालयातील कॅम्प नंबर ५ येथे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर पार पडले. तहसीलदार कल्याणी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे जागेवरच वाटप करण्यात आले. ​ *विविध सेवांचा लाभ*  ​या शिबिरात नागरिकांच्या सुविधेसाठी विविध कक्षांची स्थापना करण्यात आली होती, ज्यामध्ये खालील सेवा पुरवण्यात आल्या: ​ *महसूल दाखले:* उत्पन्न द...