पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) सामाजिक न्याय विभागाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

इमेज
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट)  सामाजिक न्याय विभागाच्या जनसंपर्क कार्यालयाचे  उद्घाटन   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) सरचिटणीस मा. भारत गंगोत्री साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष मा. सुनिल मगरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित दादा गट)सामाजिक न्याय विभागाच्या जनसंपर्क कार्यालयाचे   उद्घाटन मा. भारत गंगोत्री (महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस) तसेच हरकिरन कौर (सोनिया) धामी मॅडम (महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस)यांच्या हस्ते उल्हासनगर येथील भीमनगर या ठिकाणी करण्यात आले. त्या प्रसंगी प्रवीण खरात साहेब (प्रदेश सरचिटणीस)रेखा अमर हिरा( प्रदेश संघटन,) दिनकर फुंदे प्रदेश पदाधिकारी , रोहित गमलाडू प्रदेश पदाधिकारी, बलविर सिंह शीख सेल अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) सामाजिक न्याय विभाग उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष मा. जनार्दन (अनिल) बंगाळे, कार्याध्यक्ष राजू उघडे, महासचिव हरिश्चंद्र मल्हे, सचिव व्यंकटेश राव दासी, विजय गणपत सा

मुंबईच्या आसमंतात झळकला "चांदतारा"६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे निकाल जाहीर

इमेज
मुंबईच्या आसमंतात झळकला "चांदतारा" ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे निकाल जाहीर मुंबई ( प्रतिनिधी गणेश तळेकर ) : ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मुंबई-२ केंद्रातून विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या 'चांदतारा' या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच पोलीस कल्याण केंद्र, मुंबई या संस्थेच्या 'एकेक पान गळावया' या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज (२९ डिसेंबर) एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे  या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई-२ केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड या संस्थेच्या 'घायाळ' या नाटकाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक सुनिल कदम (एकेक पान गळावया), द्वितीय पारितोषिक रमाकांत जाधव (चांदतारा), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (चांदतारा), द्वितीय पारितोषिक व

तंजावर येथे १०० व्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ

इमेज
तंजावर येथे १०० व्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ   तंजावर दि. २७ नाटककार शहाजी (शाहराज) राजे भोसले हे मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार असून , 'लक्ष्मी नारायण कल्याण' हे पहिले मराठी नाटक होय, असे उद् गार ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी, तंजावर येथील सरस्वती महालात संपन्न झालेल्या कार्यक्रमात काढले.  १०० व्या मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ शाहराज राजे भोसले यांच्या वाङमयाला वंदन करून व नटराज पूजन करण्यात आले. त्यावेळी नाटककार प्रेमानंद गज्वी बोलत होते. पुढे गज्वी म्हणाले, शाहराजांनी २२ मराठी,२० तेलगु, १ संस्कृत,१ तमिळ व ३ हिंदी नाटके लिहिली असून ते मराठी रंगभूमी बरोबरच तामिळ आणि हिंदी रंगभूमीचेही आद्य नाटककार होते. ते काव्य भाषा शास्त्राचे अभ्यासक होते. त्यांनी बारामास आणि षडरूतुवर्णन ही काव्ये लिहिली असून ते शूर, राजकारणपटू रसिक, कलाज्ञानी आणि नृत्य कलेचे मर्मज्ञ होते. असेही गज्वी म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नटराजाचे पूजन करून आणि शाहराजाचे वाङमयाला पुष्पांजली वाहून करण्यात आली. यावेळी केलेल्या भाषणात शिवाजी राजे भोसले म्हणाले, "मी व्

सुप्रिया प्रॉडक्शनची अनोखी बोलीभाषा एकांकिका स्पर्धा

इमेज
सुप्रिया प्रॉडक्शनची अनोखी बोलीभाषा एकांकिका स्पर्धा गोपीनाथ सावकार-अनंत काणेंच्या नावाने सांघिक पुरस्कार       मुंबई - महाराष्ट्रातील महत्वाच्या स्पर्धांपैकी एक असलेल्या सुप्रिया प्रॉडक्शनच्या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेचे सांघिक पुरस्कार रंगभूमीला ललामभूत ठरलेली उत्तमोत्तम नाटके दिलेले नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार आणि एकाहून एक सरस अशा नाटकांची निर्मिती केलेले ज्येष्ठ नाट्यनिर्माते अनंत काणे यांच्या नावाने दिले जाणार आहेत. तसेच वैयक्तिक पुरस्कारदेखील मराठी रंगभूमीवर आपला ठसा उमटवलेल्या अनेक दिग्गजांच्या नावे दिले जातात, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. श्री शिवाजी स्मारक मंडळ आणि व्हिजन यांच्या सहकार्याने आयोजित केल्या जात असलेल्या या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी ५ ते ७ जानेवारी आणि अंतिम फेरी १२ जानेवारी रोजी नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या जन्मदिनी शिवाजी मंदिरमध्ये होणार आहे.       महाराष्ट्रभरातील रंगकर्मींसाठी ही एक आव्हानात्मक आणि वेगळी स्पर्धा असल्यामुळे या स्पर्धेला गेली ६ वर्षे उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील सुमारे १६ बोलींत

आईच्या गावात मराठीत बोल......

इमेज
आईच्या गावात मराठीत बोल...... मराठी चित्रपटात जर जबरदस्त असा नैसर्गिक आणि खळखळून हसवणारा विनोद असेल तर चित्रपटाचे प्रदर्शन होण्याआधीच त्याची धमाल चर्चा सुरु होते.  असाच एक मराठी चित्रपट आहे 'आईच्या गावात मराठीत बोल'   ‘आईच्या गावात मराठीत बोल’ चे ट्रेलर आणि संगीत अनावरण मुंबई मध्ये सर्व कलाकार , तंत्रज्ञ आणि मिडीया यांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले. ‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटाद्वारे ओमी वैद्यची भन्नाट मराठी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे आणि हसून लोटपोट होणार आहेत.   तर १९ जानेवारी २०२४ निश्चित करून ठेवा. मुहूर्त चुकवू नका...   ‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटाची गाणी व्हिडिओ पॅलेसची प्रस्तुती आहे तर संगीत आणि पार्श्वसंगीत अविनाश विश्वनाथ यांचे आहे. 'आईच्या गावात मराठीत बोल' या शीर्षक गीताचे धमाल बोल वैभव जोशी यांनी लिहीले आणि ठेका धरायला भाग पाडणाऱ्या या गीताला स्वप्निल बांदोडकर, विश्वजीत जोशी, मनीष राजगिरे आणि रोहित राऊत यांनी अस्सल मराठी आवाज दिला आहे. ‘तू हवीशी’ हे गाणे विश्वजीत जोशी यांनी लिहले आहे . तर ऋषिकेश रानडे याने गायले आहे  आई

डिलिव्हरी बॉय चे एक जबरदस्त पोस्टर सोशल मीडियावर धडकले आणि सगळ्यांचेच लक्ष वेधले

इमेज
डिलिव्हरी बॉय चे एक जबरदस्त पोस्टर सोशल मीडियावर धडकले आणि सगळ्यांचेच लक्ष वेधले   काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक गिफ्ट रेप केलेल्या एका बॉक्स मधून एक गोडस बाळ बाहेर आल्याचे दिसत होते त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला होता की डिलिव्हरी बॉय आणि या बॉक्सचा नेमका संबंध काय ?  तर प्रेक्षकांची ही उत्सुकता थोड्याफार प्रमाणात कमी होणार आहे कारण आता डिलिव्हरी बॉय चे एक जबरदस्त पोस्टर सोशल मीडियावर धडकले असून ते सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे  पोस्टर मध्ये एका आलिशान खुर्चीवर प्रथमेश परब विराजमान झालेला दिसत असून त्याच्यामागे अंकिता लांडे पाटील डॉक्टरच्या ड्रेस  मध्ये दिसत आहे तर प्रथमेश परब जवळ  पृथ्वीक प्रताप आहे या पोस्टर मध्ये विशेष लक्षवेधी ठरत आहेत त्या आठ गरोदर महिला त्यामुळे आता नेमके काय आहे हे प्रकरण हे जाणून घेण्यासाठी 9 फेब्रुवारी पर्यंत वाट पहावी लागणार आहे  9 फेब्रुवारी पासून जवळच्या सिनेमागृहात डिलिव्हरी बॉय हा कॉमेडी चित्रपट सर्वांना पाहायला मिळणार आहे   हा चित्रपट सर्वांना नक्कीच आवडेल आवर्जून पहावा जनहित न्यूज महाराष्ट्र मुंबई 9960504729

महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना उल्हासनगर युनिट उपाध्यक्ष पदावर हरी चंदर आल्हाट यांची नियुक्ती

इमेज
महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना उल्हासनगर युनिट उपाध्यक्ष पदावर हरी चंदर आल्हाट यांची नियुक्ती महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना चे उल्हासनगर युनिट अध्यक्ष दिलीप थोरात यांच्या नेतृत्वात  तसेच राज साहेब ठाकरे व संदीप देशपांडे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना उल्हासनगर महानगरपालिका युनिट उपाध्यक्ष म्हणून हरि चंदर आल्हाट यांची नियुक्ती 27 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आली यावेळी कार्यालय प्रमुख किशोर हिरालाल चौव्हाण शहर संघटक, हर्षद पठाडे, महिला शहर संघटक निशा किशोर आल्हाट, महिला शहर संघटक ज्योती पवार, यांना उल्हासनगर महानगरपालिका युनिट मध्ये पद नियुक्त करून नियुक्तीपत्र देण्यात आले हरि चंदरआल्हाट यांना उल्हासनगर युनिट उपाध्यक्ष या पदावर नियुक्त करण्यात आल्या बद्दल हरी आल्हाट यांनी समस्त वरिष्ठ यांचे आभार व्यक्त केले यावेळी शालिग्राम सोनवणे, सुभाष हटकर, मनोज मीठू, योगीराज देशमुख, बाळू मीसळे, पुंडलिक त्तरे, अनिल देवकर, दिनेश अहुजा, रमेश वाघेल

अंध कल्याण संघ अंध हितकारी संघ महाराष्ट्र उल्हासनगरच्या वतीने ३०६ वा दिव्यांग विवाह सोहळा उत्साहात पार पडला

इमेज
अंध कल्याण संघ अंध हितकारी संघ महाराष्ट्र उल्हासनगरच्या वतीने ३०६ वा दिव्यांग विवाह सोहळा उत्साहात पार पडला. . उल्हासनगर: अंध कल्याण संघ अंध हितकारी संघच्या वतीने नेहमीप्रमाणे दिव्यांग कन्या जया मोडले यांचा अनिल यांच्याशी  २४ डिसेंबर २०२३ रोजी विवाह सोहळा पार पडला. या वेळी इतर सामाजिक संस्थांच्या सहभागातून मुलीला योग्य सन्मानाने घरगुती वस्तू देऊन कन्यादान करण्यात आले  जगदीश पटेल आणि सुशीला पटेल यांनी आतापर्यंत ३०५ अंध, अपंग मुलांचे विवाह केले आहेत. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते

रोटरी क्लब ॲाफ भिवंडी रूरल तर्फे भिवंडीतील जि. प. शाळांतील ३८ शिक्षकांना नेशन बिल्डर ॲवार्ड ने सन्मानित

इमेज
रोटरी क्लब ॲाफ भिवंडी रूरल तर्फे भिवंडीतील जि. प. शाळांतील ३८ शिक्षकांना नेशन बिल्डर ॲवार्ड ने सन्मानित भिवंडी: रोटरी क्लब ॲाफ भिवंडी रूरल तर्फे शनिवार दि. २३/१२/२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता ओहोळ तलाव, ग्रामपंचायत हॅाल, पुर्णा येथे जिल्हा परिषद ठाणे (पंचायत समिती भिवंडी कार्यक्षेत्रातील) शाळेतील शिक्षकांना नेशन बिल्डर अॅवार्ड चा *"सन्मान सोहळा"* आयोजित करण्यात आला होता. भिवंडी तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमधील निवडक ३८ शिक्षकांना त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानामुळे *"नेशन बिल्डर ऑवोर्ड"* ने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी डिस्ट्रीक्ट ३१४२ चे रो.डॉ. माधव बैतुले डिस्ट्रिक लिटरसी कमिटी चेअर,रो.डॉ.निलेश जयवंत डिस्ट्रिक मेम्बरशिप चेअर, रो.प्रकाश म्हात्रे डिस्ट्रिक सेक्रेटरी, रो.सदानंद भोईर GSA, श्री संजय आसवले गट शिक्षण अधिकरी पं. स.भिवंडी असे प्रमुख अतिथी या सोहळ्यासाठी  उपस्थित होते.तर क्लबचे प्रेसिडेंट रो.भानुदास पाटील,सेक्रेटरी रो.संदेश भोईर,P.P.रो.प्रेमनाथ नाईक,P.P.रो.जगदीश म्हात्रे,P.P.रो.जगदीश पाटील, रो. प्रमोद भोकरे, रो.पंढ

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा अनोखा कानमंत्र

इमेज
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा अनोखा कानमंत्र सध्या चला फिरूया.. हसूया.. जगूया.. म्हणत, नाना पाटेकर एका धम्माल सहलीला निघालेत. हा प्रवास सिद्धार्थ आणि सायलीसोबत चालू आहेच पण यात मकरंद अनासपुरे सुद्धा त्यांच्या साथीला आहेत. दिग्गज कलाकारांची मैत्री आपल्याला चित्रपटाच्या प्रवासात पहिल्यांदाच एकत्र पाहता येणार आहे.  बऱ्याच वर्षानंतर ही कलंदर जोडी 'ओले आले' या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. आपल्या अभिनयाचे आणि विनोदाचे चौकार आणि षट्कार मारायला नाना आणि मकरंद अनासपुरे सज्ज असून कोकोनट मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'ओले आले' हा चित्रपट नववर्षात म्हणजे ५ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  'ओले आले' चित्रपटात 'व्यस्त रहा.. पण मस्त रहा..' असं म्हणणारे नाना सिद्धार्थला जगण्याचे सूत्र सांगताना दिसताहेत. खरं तर हा मूलमंत्र ते स्वतःच्या दैनंदिन व्यवहारातून, कधी प्रेमाने तर कधी हट्टाने मुलाला शिकवू पाहताहेत. बाबा आणि मुलाच्या या मजेशीर जुगलबंदीमध्ये मकरंद अनासपुरे देखील सामील झालेले दिसणार आहेत.

व्हाईस ऑफ मीडिया उल्हासनगर तालुकाच्या वतीने बैठक संपन्न

इमेज
व्हाईस ऑफ मीडिया उल्हासनगर तालुकाच्या वतीने बैठक संपन्न उल्हासनगर दि २३ डिसें २०२३रोजी सुभाष नगर,काली माता मंदिर च्या मागे उल्हासनगर कॅम्प नंबर ३ पत्रकार सुरेश जगताप ,यांच्या जनसंपर्क कार्यालयात व्हाईस ऑफ मीडिया उल्हासनगर तालुकाच्या वतीने बैठक संपन्न झाली  या बैठकीचे अध्यक्ष अशोक शिरसाट होते तसेच या बैठकीत अध्यक्ष अशोक शिरसाट, कोषाध्यक्ष सिध्दांत गाडे, हरि आल्हाट, कार्यवाहक रत्ना सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख हर्षद पठाडे,  सदस्य सुमन शेंडगे, ज्योती पवार यावेळी उपस्थित होते तसेच व्हाईस ऑफ मीडिया उल्हासनगर तालुका या मिंटिगसाठी पत्रकार सुरेश जगताप, यांनीं जनसंपर्क कार्यालय उपलब्ध करून दिले याबद्दल सर्वांच्या वतीने जगताप यांचे आभार व्यक्त करण्यात आले ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

DRUCC समिती बैठक

इमेज
DRUCC समिती बैठक DRUCC समिती बैठक वरिष्ठ विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल, यांच्या उपस्थितीत मध्य मुख्य कार्यालय,कॉन्फरन्स हॉल, मुंबई येथे पार पडली. यावेळी DRUCC सदस्यांसह मध्य रेल्वे चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी अंबरनाथ रेल्वे स्टेशन व परिसराच्या भौतिक सोयी सुविधाबाबत सुभाष साळुंके यांनी दि.26/6/23 च्या बैठकीत मांडलेल्या मुद्दाबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक असून प्रशासकीय काम प्रगतीपथावर असल्याचे गोयल यांनी सांगितले. अंबरनाथ रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्र.३,१ -२ वर  लिफ्ट किंवा सरकते जिने तातडीने बसविणे बाबत आग्रही भूमिका मांडली. जेणेकरून लांब पल्ल्यासाठी प्रवाशी , बॅगा व सामान वाहतूक करणे इ.तसेच जेष्ठ नागरीक,महिला यांची अडचण दूर होईल. किमान लिफ्ट बसविण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल असे आश्वासन गोयल, यांनी दिले. बी कॅबिन रोड लगतच्या नाल्याची खोली व रुंदीकरण करणे.,ज्यामुळे बी कॅबीन रोड परिसरात पावसाचे पाणी साचणार नाही. याबाबत मी रेल्वे अभियंते,अंबरनाथ नगर परिषद अधिकारी व एमआयडीसी अभियंता यांच्यासह एकत्रित पाहणी दौरा केला होता, यामुळे वादाचे ,जागा मालकीचे