उल्हासनगरमध्ये "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन*

*उल्हासनगरमध्ये "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन* 
उल्हासनगर:
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत, मा. जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे व तहसिलदार कार्यालय उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" या अभियानांतर्गत “भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान” (सन २०२६-२०२७) आयोजित करण्यात आले आहे.
 *ठिकाण* : गोपाळ समाज मंदिर, शास्त्रीनगर, विठ्ठलवाडी, उल्हासनगर-३
 * *दिनांक:* २९ सप्टेंबर २०२६ (मंगळवार)
 * *वेळ:* सकाळी ११.०० ते सायंकाल ३.०० वाजेपर्यंत
 
 *शिबिरात वाटप व सेवा मिळणारे दाखले व योजना* 
या शिबिरात नागरिकांसाठी विविध महत्त्वाच्या कागदत्रांची आणि योजनांची सोय करण्यात आली असून, त्याखालीलप्रमाणे लाभ मिळणार आहे:
 * उत्पन्न / अधिवास / रहिवास दाखले
 * जातीचा / नॉनक्रिमिलेअर दाखला
 * निवडणूक ओळखपत्र
 * आधार कार्ड नोंदणी / दुरुस्ती
 * संजय गांधी निराधार अनुदान योजना
 * आयुष्मान भारत कार्ड
 * श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना
 * शिधापत्रिका (रेशनिंग कार्ड)
 * विवाह नोंदणी
 * दिव्यांग प्रमाणपत्र

या अभियानाचे आयोजन उपविभागीय अधिकारी, उल्हासनगर मा. विजयानंद शर्मा आणि जिल्हाधिकारी, ठाणे मा. श्रीकृष्णा पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार