पोस्ट्स

नांदेड जिल्हा अध्यक्षपदी श्री अविनाश भाऊ परडे यांची नियुक्ती करण्यात आली

इमेज
नांदेड जिल्हा अध्यक्षपदी  श्री अविनाश भाऊ परडे यांची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष श्री अरुणजी निटूरे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री अनिल जी मेश्राम तसेच महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष श्री अर्जुन रावजी गालफाडे साहेब आदेशानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये  राष्ट्रीय अध्यक्ष श्री अरुण जी निटुरे साहेब नांदेड जिल्हा दौरा करून नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री अविनाश भाऊ परडे  यांची नियुक्ती करण्यात आली आहे कार्यक्रमांमध्ये सागर जी आठवले कुलदीप जी खंडारे आसिफ खान व ज्योतिबा साबळे  या सर्वांनी नियुक्ती बद्दल अभिनंदन करण्यात आले               ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र 

उल्हासनगर महानगर पालिका कर्मचारी पतपेढी निवडणूक २०२२ वादाच्या भोवऱ्यात

इमेज
उल्हासनगर महानगरपालिका पतपेढी निवडणूक परिवर्तन पॅनलचे ९ उमेदवार झाले विजय तसेच सिद्धांत पॅनलचे २ आणि कामगार एकता पॅनलचे २ उमेदवार विजयी झाले उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक २०२२ कर्मचारी पतपेढी चे मतदान दिनांक २० मे २०२२ रोजी पार पडले  उल्हासनगर महानगरपालिका पतपेढीचे १२६४ सभासद असलेले कर्मचारी यांनी मतदान केले  परिवर्तन पॅनल मध्ये एकूण १३ उमेदवार होते त्या पैकी  ९ उमेदवार विजय झाले  विजय झालेल्या उमेदवारा मध्ये अच्युत सासे. विनोद केणे. एकनाथ पवार. दिपक भोये. नरेश परमार. ब्रह्मानंद करोतीया. अनिल राठी. संदीप बिडलान. आशा कजानीया. हे परिवर्तन पॅनल चे नऊ उमेदवार विजयी झाले तसेच सिद्धांत पॅनल चे. जयश्री साठे.मनोज जाधव. विजय झाले आहेत कामगार एकता पॅनल मधून विजय बेहनवाल. दीपक दाभने . विजय झाले आहेत. सर्वसाधारण अपक्ष उमेदवारांना बलाढ्य असलेल्या पॅनल ने जिंकण्याची संधी दिली नाही सर्वसाधारण अपक्ष उमेदवारांचा सफेद रंगाचा बॅलेट पेपर यावर ५० उमेदवारांना एकत्र ठेवले आणि सफेद रंगाच्या बॅलेट पेपर वर मतदारांनी फक्त ८ सिक्के मारावे ८ शिक्क्या पेक्षा जास्त झाल्यास मतपत्रिका ब...

चिन्मयी साळवी रुपेरी पडदयावर

इमेज
चिन्मयी साळवी रुपेरी पडदयावर ‘तू माझा सांगाती’, ‘छोटी मालकीन’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ अशा मराठी मालिकांमधून आणि आता ‘वागले की दुनिया’ या हिंदी मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री चिन्मयी साळवी आता मराठी रुपेरी पडदयावर पदार्पण करणार आहे. आगामी ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटामध्ये तिचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. १७ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शारीक खान यांची असून दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे. ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटात अंजली ही व्यक्तिरेखा चिन्मयी साकारत आहे. चित्रपटातील माझ्या भूमिकेला प्रेमाची वेगळी किनार आहे, जी प्रत्येकाला स्पर्शून जाणारी असेल, असं ती सांगते. कॉलेजमध्ये एकांकिका करत असताना चित्रपटातील या भूमिकेसाठी मला विचारणा झाल्याचं ती सांगते. प्रत्येकाला चित्रपटाच्या माध्यमातून मोठया पडदयावर काम करायची इच्छा असते. येरे येरे पावसा’च्या निमित्ताने माझं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करताना काही तरी सांगू पाहणारा हा चित्रपट प्रत्येकाने नक्की पहायला हवा असं ती सांगते. नृत्यनिपुण...

प्री-पेड विज मीटर धारकांना अनामत रक्कम भरणा करण्याची गरज नाही

इमेज
प्री-पेड विज मीटर धारकांना अनामत रक्कम भरणा करण्याची गरज नाही महावितरणने आपल्या वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम म्हणून दोन महिन्यांच्या वीज बिलाएवढी रक्कम भरण्याबाबत बिले दिली आहेत. मात्र सदरची अनामत रक्कम प्री-पेड वीज मीटरधारकांनी भरण्याची गरज नसल्याचे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केले आहे तसेच ज्या ग्राहकांनी सुरक्षा ठेव रक्कम भरणे आवश्यक आहे, त्यांनाही ती एकरकमी न भरता समान सहा हप्त्यांमध्ये भरता येईल, असेही ग्राहक संघटनेने स्पष्ट केले आहे. महावितरणचे राज्यभरात सुमारे अडीच कोटी वीज ग्राहक असून महावितरणने वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार ग्राहकांच्या वाढीव वीज वापराच्या प्रमाणात अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याबाबत बिले दिली आहेत. सुरुवातीला सदरची वीज बिले एकरकमी भरावीत असे स्पष्ट केले होते. मात्र वीज आयोगाने सदरची सुरक्षा ठेव रक्कम सहा हप्त्यांमध्ये भरण्याची तरतूद केल्याचे ग्राहक संघटनेने निदर्शनास आणून देताच महावितरणनेही ग्राहकांना सहा हप्त्यांमध्ये सुरक्षा ठेव भरता येईल असे म्हटले आहे. त्यानंतर आता ज्या वीज ग्राहकांकडे प्री-पेड मीटर आहे, म्हणजे वीज वापरण...

स्वर वंदना

इमेज
श्री गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधी व इव्हेंट एनीथिंग अँड एवरीथिंग च्या सहकार्याने कै. पं. रामदास कामत, कीती शिलेदार, आशालता वाबगावकर या दिग्गजांना        *सांगीतिक  मानवंदना* *श्री गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधी निर्मित व इव्हेंट एनीथिंग अँड एवरीथिंग* च्या सहकार्याने दिवंगत पं रामदास कामत ,आशालता वाबगावकर , *किर्ती* शिलेदार यां संगीत नाट्य  क्षेत्रातील दिग्गजांना सांगीतिक मानवंदना देण्याचा कार्यक्रम *शनिवार* दिनांक 21 मे रोजी सायंकाळी चार वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथील पु ल *देशपांडे* अकादमीच्या तिसऱ्या मजल्यावरील थिएटर मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे . या कार्यक्रमात या तीनही दिग्गजांनी गायलेल्या नाट्य *गीतांचे*  सादरीकरण होणार आहे .या कार्यक्रमाची संकल्पना रवींद्र ढवळे, सुभाष सराफ यांची असून मानसी फडके- केळकर, नुपूर गाडगिळ,  धनंजय म्हसकर, निनाद जाधव हे कलाकार ही गीते सादर करणार आहेत .त्यांना संगीत साथ राजेंद्र भावे ,सुहास चितळे ,ओमकार अग्निहोत्री यांची असून *तांत्रिक* साहाय्य  राकेश जोशी, विश्वास महाशब्दे, ...

मूकनायकाच्या हाकेची १०२ वर्ष कल्याण नगरीत पत्रकारितेचा जागर

इमेज
( कल्याण प्रतिनिधी आशा नवनाथ रणखांबे  )        भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १०२ वर्षापूर्वी सुरु केलेलं मूकनायक पाक्षिक मराठी पत्रकारितेतील ऐतिहासिक परंपरेची स्थापना करणारी घटना ठरली. मूकनायकचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी मुंबईत प्रकाशित करण्यात आला. आपल्या चळवळीची भूमिका आणि आपल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी वृत्तपत्राची गरज असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आलं होतं. त्या भूमिकेतूनचं बाबासाहेबांनी मूकनायक पाक्षिकाची सुरुवात केली.    मूकनायकाच्या याच धरतीवर  कल्याण तालुक्यात मूकनायक ते प्रबुद्ध भारत टीम द्वारा आंबेडकरी पत्रकारितेचा वैचारिक जागर  पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रीडांगण येथे घालण्यात आला.  हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.            या कार्यक्रमा समयी विचारमंच्यावर  प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून पत्रकार सुजात प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले  तर  प्रबुद्ध भारतचे वृत्तसंपादक जितरत्न पटाईत , फिल्ममेकर सोमनाथ वाघमारे , वि...

उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतपेढी संचालक मंडळ निवडणूक 2022 चे

इमेज
उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतपेढी संचालक मंडळ निवडणूक 2022 चे सर्वसाधारण अपक्ष उमेदवार आल्हाट किशोर हरी  यांना बहुमताने विजयी करा यांची निशाणी आहे पगडी मतदान केंद्र आय टी आय कॉलेज मयुर लॉन्स च्या समोर सेंट्रल हॉस्पिटल रौड उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथे आपले बहुमूल्य मत पगडी ह्या निशाणी वर शिक्का मारून आपल्या कर्तव्यदक्ष उमेदवाराला विजय करा  ( ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून.. कामगारांच्या तळहातावर तरली आहे ) हे सिद्ध करायची वेळ आली आहे ? तर चला कामगारांनो इतिहास घडवूया......