चिन्मयी साळवी रुपेरी पडदयावर

चिन्मयी साळवी रुपेरी पडदयावर
‘तू माझा सांगाती’, ‘छोटी मालकीन’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ अशा मराठी मालिकांमधून आणि आता ‘वागले की दुनिया’ या हिंदी मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री चिन्मयी साळवी आता मराठी रुपेरी पडदयावर पदार्पण करणार आहे. आगामी ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटामध्ये तिचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. १७ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शारीक खान यांची असून दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे.
‘येरे येरे पावसा’ या चित्रपटात अंजली ही व्यक्तिरेखा चिन्मयी साकारत आहे. चित्रपटातील माझ्या भूमिकेला प्रेमाची वेगळी किनार आहे, जी प्रत्येकाला स्पर्शून जाणारी असेल, असं ती सांगते. कॉलेजमध्ये एकांकिका करत असताना चित्रपटातील या भूमिकेसाठी मला विचारणा झाल्याचं ती सांगते. प्रत्येकाला चित्रपटाच्या माध्यमातून मोठया पडदयावर काम करायची इच्छा असते. येरे येरे पावसा’च्या निमित्ताने माझं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करताना काही तरी सांगू पाहणारा हा चित्रपट प्रत्येकाने नक्की पहायला हवा असं ती सांगते.
नृत्यनिपुण आणि अभिनयाची आवड असणाऱ्या चिन्मयीने दूरदर्शन वाहिनीवरील ‘दम दमा दम’, ई टीव्ही मराठी वाहिनीवरील फूल टू धमाल, कलर्स मराठी वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ यासारख्या स्पर्धांमध्ये बाजी मारत आपला वेगळा ठसा उमटवला होता.

‘येरे येरे पावसा’ या चित्रपटात चिन्मयी सोबत छाया कदम, मिलिंद शिंदे, संदेश जाधव,  विनायक पोतदार, आर्या आढाव, प्रदीप नवले, प्राजक्ता वाड्ये, वैभव जेऊघाले पाटील, हृषीकेश करळे, नकुल चौधरी, वैष्णवी रानमाळे, उत्कर्ष करळे, अचला पांचाळ, प्रज्ञा गोपाले यांच्या भूमिका आहेत.

‘एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून सहनिर्मिती अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स) यांची आहे. ग्यानचंद चौहान, सुमेध गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी सांभाळली असून संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. साऊंड झाकीर हुसैन तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे.
प्रतिनिधी गणेश तळेकर
जनहित न्यूज महाराष्ट्र मुंबई 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार