उल्हासनगर तहसील कार्यालयामार्फत 'महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न*
*उल्हासनगर तहसील कार्यालयामार्फत 'महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न* एकाच छताखाली विविध शासकीय दाखले व सेवांचे वाटप; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद *उल्हासनगर:* महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली, उल्हासनगर तहसील कार्यालयाच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' अभियानाचे शनिवारी, ७ मार्च २०२६ रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले. नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवा आणि दाखले विनाविलंब उपलब्ध करून देणे, हा या शिबिराचा *मुख्य उद्देश होता.* तहसीलदार कार्यालयातील कॅम्प नंबर ५ येथे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर पार पडले. तहसीलदार कल्याणी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे जागेवरच वाटप करण्यात आले. *विविध सेवांचा लाभ* या शिबिरात नागरिकांच्या सुविधेसाठी विविध कक्षांची स्थापना करण्यात आली होती, ज्यामध्ये खालील सेवा पुरवण्यात आल्या: *महसूल दाखले:* उत्पन्न द...