स्वतःला येशू मसिहा समजत होता...* व्हाइट हाऊसबाहेर थरार! सुरक्षा रक्षकांवर अंदाधुंद गोळीबार करणारा तरुण ठार;
*स्वतःला येशू मसिहा समजत होता...* व्हाइट हाऊसबाहेर थरार! सुरक्षा रक्षकांवर अंदाधुंद गोळीबार करणारा तरुण ठार; *वॉशिंग्टन* :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवासस्थान असलेल्या 'व्हाइट हाऊस'च्या परिसरात शनिवारी संध्याकाळी गोळीबाराची एक धक्कादायक घटना घडली. एका २१ वर्षीय तरुणाने थेट व्हाइट हाऊसच्या सुरक्षा रक्षकांना लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला. यावर 'सीक्रेट सर्व्हिस'च्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाला आहे. नसीर बेस्ट असे या मृत हल्लेखोराचे नाव असून, त्याच्याबाबत आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. *नेमका कसा झाला हल्ला?** मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास व्हाइट हाऊसपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या '१७वी स्ट्रीट आणि पेनसिल्वेनिया आव्हेन्यू NW' या सुरक्षा रक्षकांच्या चेक पॉइंटजवळ हा प्रकार घडला. आरोपी नसीर बेस्ट याने अचानक आपल्या बॅगेतून बंदूक काढली आणि तैनात अधिकाऱ्यांच्या दिशेने थेट फायरिंग सुरू केली. त्याने जवळपास २० ते ३० राऊंड गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या ...