पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स*राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष डॉ.शंकरजी पोवार यांच्या आदेशानुसार व राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ.प्रतिभाताई शंकर पोवार यांच्या अध्यक्षतेखाली दि.३१ डिसेंबर २०२१ रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जागर व्यसनमुक्तीचे या कार्यक्रमाचे आयोजन ठाणे जिल्हास्तरीय पातळीवर बदलापुर शहर येथे करण्यात आले होते.जीवन आधार फाउंडेशनच्या बॅनर खाली जागर व्यसनमुक्तीचा पत्रके वाटप करून जनजागृती करण्यात आली.या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी रवी कोळीठाणे जिल्हा कार्याध्यक्ष व कु.सुरेश पाटीलबदलापुर शहर युवक अध्यक्ष यानी मार्गदर्शक अनिल चाळके याच्या मार्गदर्शना खाली केली.बदलापुर नगरपरिषद प्रवेशद्वारा बाहेर पत्रक वाटप करण्यात आले व बदलापूर पूर्व तिकीट घराबाहेर तसेच रेल्वे ब्रीजवरील येणाऱ्या जाणार्‍या प्रवाशांना व्यसनमुक्ती साठी शालेय विद्यार्थांमार्फत पत्रक वाटप करण्यात आले. व्यसनमुक्तीचे एक छान सामाजिक संदेश आपल्या बदलापुर मधिल जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न जीवन आधार फाउंडेशन मार्फत करण्यात आला.अंजली मॅडमच्या अचिव्हर्स अकॅडमी (सतत जीवन आधार फौंडेशन च्या उपक्रमात सामील होतात )म्हणजेच शालेय विद्यार्थांचे खुप मोठे सहकार्य दरवेळे प्रमाणे लागले.कार्यक्रमाच्या शेवटी व्यसनमुक्तीवर एक शपथ ही ग्रहण करण्यात आली कार्यक्रमास अनेक पदाधिकारी उपस्थित होते.चाळके साहेबांच्या मार्गदर्शना मुळेच जागर व्यसनमुक्तीचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या वेळीसौ.प्रतिभाताई शंकर पोवार.सौ.निरजाताई रूपेश आंबेरकर.रोहितकुमार प्रजापती.सौ.अंजलीताई नारकर.अनिल चाळके.रवी कोळीकु.सुरेश भिकन पाटील .सौ.श्रद्धा मेस्त्री .रूपेश आंबेरकर.भुषण राऊत समस्त अचिव्हर्स अकॅडमी {बच्चेपार्टी} तसेच पदाधिकारी उपस्थित होते.उपस्थित सर्व सदस्य पदाधिकारी व विद्यार्थी यांचे आभार व्यक्त करण्यात आले

इमेज

ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम असताना दुसरीकडे ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणूक घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.राज्य निवडणूक आयोगाने आता नाशिक, सोलापूर, अकोला, अमरावती, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोम्बिवली, उल्हासनगर सह महापालिकांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 4 ते 7 जानेवारीपर्यंत सर्वच महापालिकांना सुधारित आराखड्यानुसार आरक्षण निश्चितीसाठी सर्वसाधारण प्रवर्ग , अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लोकसंख्या तसेच अन्य सांख्यिकी माहिती व प्रारूप प्रभाग रचना पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

इमेज

स्वर्गीय श्रीमती ज्योती कालानी जी का 18 अप्रैल 2021 के दिन दुःखद निधन हुवा था,शिक्षिका से समाजसेविका, कुशल नगरसेविका, सफल राजनीतिज्ञ, उत्कृष्ट विधायक होने के नाते उनके सामाजिक योगदान को ध्यानमे रखते हुये महाराष्ट्र विधानसभा मे दिनांक 5 जुलै 2021 के दिन स्वर्गीय ज्योती कालानी के निधन का शोक प्रस्ताव पारित किया गया था,महाराष्ट्र सरकार द्वारा महाराष्ट्र विधानसभा के नियम के अनुसार स्थानिक विधायक कुमार आयलानी जी द्वारा प्रांत अधिकारी जयराज कारभारी, तहसिलदार श्रीमती कोमल ठाकूर व मान्यवरो ने कालानी महल जाकर उनके परिवार को महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ द्वारा भेजा गया स्मृतीपत्र सम्मानपूर्वक दिया गया।

इमेज

उल्हासनगर महानगरपालिका चे जबाबदार अधिकारी अखेर गेले कुठे ? उल्हासनगर महानगरपालिका च्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या खुर्च्या नेहमी रिकाम्या का ?असतात. उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त रजेवर आहेत. तर उपआयुक्त हजर नाहीत ?. तसेच लेखा अधिकारी व आरोग्य अधिकारी सुद्धा हजर नाहीत ?. उल्हासनगर महानगरपालिका मनसे युनियन संघटना चे दिलीप थोरात यांनी उल्हासनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या. वाढ पगार. तसेच सातवा वेतन चा थकित वेतन तसेच कर्मचारी यांच्या अनेक मागण्या केल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागणी संदर्भात मनसे युनियनचे दिलीप थोरात आणि त्यांचे सहकारी कार्यालयात गेले असता कार्यालयात एक ही जबाबदार अधिकारी हजर नसल्याची माहिती पत्रकारांना देऊन जबाबदार अधिकारी यांच्या बाबत नाराजी व्यक्त केली . उल्हासनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत उल्हासनगर महानगर पालिकेचे कर्मचारी यांना नवीन वर्षात वाढ पगार मिळेल असी आशा होती परंतु कार्यालयात जबाबदार अधिकारी नसल्या मुळे कर्मचाऱ्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल तसेच कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आणि पगारात सुद्धा लावण्यात आला परंतु सातवा वेतनाची थकित रक्कम तीन टप्प्याने देण्याचे आदेश असताना सुद्धा एका ही टप्प्याची थकित रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही ही मोठी आश्चर्याची बाब आहे कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागचे नेमके कारण म्हणजे उल्हासनगर महानगरपालिका ला जबाबदार अधिकारीच नाहीत

इमेज

आई-वडिलांमधील वादाचा आरोपीने घेतला फायदा मित्राला मदत मागितली असता मित्राने ही केला अत्याचार अकोला अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे दोन सख्खे भाऊ अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करत होते याची माहिती तिने तिच्या मित्राला सांगितले तर त्याने हि गैरफायदा घेत तिला तो शेगावला घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला अशी माहिती पीडितेने पोलिसांना दिली आहे पोलिसांनी गुन्हे दाखल केले असले तरी या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे आई वडीला मधील वाद व त्यानंतर मुलांकडे होणारे दुर्लक्ष यातून नराधमांनी त्याचा फायदा कसा उचलला हे या घटनेवरून समोर येते वडील कामावर जायचे आणि त्याचा फायदा घेत शेजारी राहणारा आरोपी मुलीच्या घरात जायचा आणि तिच्यावर अत्याचार करायचा आरोपी व पीडित मुलगी शेजारी राहायचे मुलीचे वडील आणि आई मध्ये कौटुंबिक वाद झाल्यानंतर तिची आई माहेरी निघून गेली. आई माहेरी गेल्यानंतर ती वडिलांसोबत एकटीच राहत होती तिचे वडील शेतावर गेले की मुलगी घरात एकटीच राहायची त्या दरम्यान आरोपी तिच्या एकटेपणाचा गैरफायदा उचलायचे 2019 पासून मुलगी 14 वर्षाची होती तेव्हा पासून तिचे लैंगिक शोषण सुरू होतेअखेर तिने मित्राला मदत मागितली असता मित्राने तिला गार्डन मध्ये बोलावले तेथून तो तिला शेगावला घेऊन गेला आणि त्यानेही नको तेच केले मुलीच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध कायद्यानुसार भादवि कलम 376 नुसार गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना 27 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवले आहे त्यांची कसून चौकशी करीत असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री राजेश गोमासे करीत आहेत

इमेज

उल्हासनगर कचरामुक्त शहर करायच्या कामात सक्रिय महिला पर्यावरण प्रेमी...उल्हासनगर शहरातील एक कर्तव्यनिष्ठ समाजसेविका, पर्यावरण प्रेमी, उल्हासनगर महानगर पालिका तर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा अभियानात प्रथम महिला स्वच्छता निरीक्षक, स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये स्वतःच्या विकास टॉवर रहिवासित इमारतीला ज़ीरो गार्बेज सोसायटी करुन प्रथम पारितोषिक प्राप्त करणारी, आज स्वच्छ भारत अभियान नागरी अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानात शासन निर्णय नुसार प्लास्टिक बंदी अभियानात एकूण 300 बेरोजगार महिलांना कागदी व कापडी पिशव्या निर्मिति करुन रोजगार देणाऱ्या वृक्ष फाउंडेशन च्या श्रीमती ज्योती तायडे यानी आता उल्हासनगर व आसपास चा परिसर ज़ीरो गार्बेज करुन कचरामुक्त करण्याचा संकल्प केला आहे,त्याची सुरुवात म्हणुन त्यांनी उल्हासनगर कैम्प 1 शहाड स्टेशन समोर असलेले कोणार्क रेसीडेंसी ह्या निवासी संकुलामध्ये 10 महिलांना रोजगार उपलब्ध करवुन देत ओला कचरा, सूखा कचरा व मेडिकल वेस्ट वेगवेगळे करुन त्यापासुन खत निर्मिती करणे, झाड़े व गार्डन चा सूखा पाला, पत्ते जमा करुन त्या पासुन खत निर्मिती करणे, प्लास्टिक पिशवी, थर्माकोल, बाटली, पेपर वेगवेगळे करुन त्यांना रिसाइक्लिंग करणेअशी कामे गेल्या 6 महिन्यापासुन सोसायटी चे चेयरमैन डॉ नागपाल, पर्यावरण प्रेमी रेखा ठाकुर जी व उल्हासनगर महानगर पालिकेच्या सहकार्यने सुरु केलेली आहेत, त्या अनुषंगाने येणाऱ्या महिन्यात कोणार्क रेसीडेंसी ही उल्हासनगर ची पहिली सोसायटी जी कचरामुक्त ज़ीरो गार्बेज सोसायटी ठरेल ह्या सोसायटी च्या कचर्याची विल्हेवाट सोसायटी मध्येच लावली जाईल व उल्हासनगर मनपा च्या डंपिंग ग्राउंड वर कचरा जाणार नाही अशी खात्री ज्योती तायडे यानी व्यक्त केली.

इमेज

उल्हासनगर मे 25 दिसम्बर को मनाया गया ब्लेंकेट डे ठंड की शुरुआत में ज़रूरतमंद और सड़कों पर सोने वाले भाई बहनों के लिये, विशेषकर अंध दिव्यांग भाई बहनों को एव वृद्ध दिव्यांगों को ठंड से संरक्षण देने वाले साधन, बिछाने के लिये चटाई उपलब्ध करवाते हुये 25 दिसंबर ब्लाइंड असोसिएशन के जगदीश पटेल व सुषमा पटेल की उपस्थिति में उल्हासनगर में सुरदासों के बीच जाकर ब्लेंकेट कम्बल दिवस मनाया गया, इस अवसर परकाजल मुलचंदानी, मुकेश पुनवानी, हरेश गालानी, महेश लीलवानी, दिपक व जितु जगियासी परिवार, गौरव भाऊ, अमित उदासी इत्यादि समाजसेवी मित्र उपस्थित रहे।

इमेज

दुचाकी चोरून भंगारात विकल्याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी दीपक सलगरे सह पाच जणांना अटक केली आहे. यावेळी चोरीची वाहने खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांनी आधी कागदपत्रे तपासून मगच दुचाकी खरेदी करावी, अन्यथा चोरीची वाहने खरेदी केल्याचा गुन्हा सर्वसामान्य ग्राहकांवर लादला जाईल, असे गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेदीपक सलगरे याने गेल्या तीन वर्षांपासून बाजार पेठ पोलीस ठाणे, डायघर पोलीस ठाणे, मानपाडा पोलीस ठाणे आणि कल्याण पोलीस ठाण्यातून दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला होता. गाड्या चोरणे आणि नंतर त्या पालवा येथील राहूल याला विकणे किंवा त्याची मोडतोड मित्राला कमी किमतीत विकणे असे गुन्हे करण्यात तो आणि त्याचे मित्र सामील होते. पोलिसांनी आठ लाख दुचाकी तसेच भंगार धातूचे विविध भाग आणि वाहनांचे भाग वेगळे करण्यासाठी वापरलेले कटर जप्त केले आहेत. राहुल डवरे सह दीपक, चायना व्हॅन चव्हाण उर्फ ​​बबलू, धर्मदेव चव्हाण, समशेर खान, भैरवसिंग खरवड, भंगार व्यापारी यांना अटक करण्यात आली आहे.

इमेज

कल्याण डोंबिवली मध्ये शनिवारी २५ डिसेंबर रोजी नाताळ आणि ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर कल्याण मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी आराखडा तयार केला ३१ डिसेंबरला कल्याण परिमंडळ ३ मधील जवळ जवळ पावणे दोनशे अधिकारी आणि साडेनऊशे कर्मचारी हे सर्व रस्त्यांवर जागोजागी गस्त घालणार आहेत. शहरात येणाऱ्या आणि शहरातून बाहेर जाणाऱ्या मार्गांवर प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी लावली जाईल. नाकाबंदीच्या ठिकाणी ब्रेथ अॅनालायझर ठेवले जातील आणि ड्रंक अँड ड्राइव्हचे गुन्हे ही दाखल केले जातील, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कल्याण-डोंबिवलीतील पोलीसही सज्ज झाले आहेत. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कल्याण परिमंडळ ३ मधील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला अधिकारी व महिला पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने त्यांच्याकडून सर्व ठिकाणी तपासणी केली जाईल. तसेच प्रामुख्याने शांतता समिती व हॉटेल व्यावसायिकांशी संपर्क साधून बैठका घेण्यात आल्या आहेत. करोना नियमांचे पालन करून ३१ डिसेंबर आणि नववर्ष स्वागताचा जल्लोष शांततेच्या मार्गाने कसा साजरा करता येईल, याबाबत सविस्तर निर्देश देण्यात आले आहेत, असे पोलीस उपायुक्त गुंजाळ यांनी सांगितले हॉटेल, रिसॉर्टवर राहणार लक्ष, हॉटेल रिसॉर्ट मध्ये पार्टीचे आयोजन केले असल्यास त्या ठिकाणी केडीएमसी अधिकारी यांच्या सोबत एक पथक तयार करून करोनाच्या अनुषंगाने नियमांचे पालन होते की नाही, याची तपासणी केली जाईल. त्याच प्रमाणे स्मार्ट सिटी अंतर्गत केडीएमसी ने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस स्टेशनचे व्हिडिओ कॅमेरे आणि काही ठिकाणी आवश्यकते प्रमाणे ड्रोनचा वापर करून चालणाऱ्या पार्ट्या आणि सेलिब्रेशन यावर लक्ष ठेवले जाईल,. असे पोलीस उपायुक्त गुंजाळ यांनी सांगितले

इमेज

क्रिश्चन एकता सामाजिक संघटना कल्याण पूर्व के पद अधिकारियों की नियुक्ती संघटन के अध्यक्ष व ख्रीस्चन समाज के नेता जीतू भाई राठौड़ द्वारा की ख्रीस्चन एकता सामाजिक संघटना महाराष्ट्र मे ख्रीस्चन समाज के लिऐ सक्रियता से काम करने वाली संघटना है लगभग सभी जिल्हा मे संघटन मजबूती से काम करता है कल्याण पूर्व मे संघटन के पद अधिकारियो की नियुक्ती की गई है इस समय फादर.ई.जोश,पास्टर अन्थोनी राज,फादर.सेलवराज, फादर.जॉनी अल्मेड, फादर.रिचड,पास्टर.राजू, फादर. सैमसन विल्सन, स्टीफन गोषि, पास्टर.जॉशेफ गोषि,राजा मण्डला,अल्वीन, मार्टिन, पास्टर भास्कर, पास्टर .आनंद व अन्य सदस्य बड़ी संख्या मे उपस्थित थे रिपोर्टर इस्माईल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण

इमेज

रसिक प्रेक्षकांनी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा लावण्य दरबार चा कार्यक्रम जरूर पाहावा संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला लावण्य दरबार हा लावणी शो सह परिवार जरूर पहावा घरंदाज लावणीचा प्रेक्षणीय शो लॉकडॉऊनच्या प्रदीर्घ काळानंतर पहिल्यांदाच पाहण्याची संधी मिळणार आहे. सिनेतारका लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे, मुंबईची फटाकडी कविता घडशी .चैनई एक्सप्रेस अंबिका पुजारी .अप्सरा फेम चांदनी देशमुख,तसेच मुंबई ची राणीआकांक्षा कदम, स्मिता. अशा एकापेक्षा एक लावणी नृत्यांगना लावण्या सादर करुन रसिक प्रेक्षकांची दाद मिळवणार आहेत. तर आवर्जून पहा येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागत दिनी दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी कल्याणकर यांना लावण्य दरबार हा लावणी शो आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण या ठिकाणी दुपारी ४.३० वाजता नवीन वर्षाची मनोरंजक सुरवात म्हणून पाहावयास मिळणार आहे लावण्य दरबार या शो ची तिकीट बुकिंग ऑनलाइन सुरू असून आजच आपले तिकीट बुक करण्याकरिता book my show.com किंवा ९७७३४१७७७६ वर बुक करा आणि परिवार सोबत पहा सौ. स्मिता पाटणकर व श्री समीर खाडिलकर प्रस्तुत तसेच. हरी पाटणकर संकल्पित लावण्य दरबार संगीतकार अमोल परेश गायिका संगीता मोरजकर मनोरंजक लावणी चा कार्यक्रम

इमेज

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क. प्रभाग परिसरातील जीन्स पॅन्टच्या कारखान्यांवर निष्कासनाची धडक कारवाई महापालिका परिसरात अवैधरित्या कार्यरत असलेल्या जीन्स वॉशिंग उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे,या अवैधरित्या चालू असलेल्या जीन्स वॉशिंग कारखान्यांवर कारवाई करणे बाबत पत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या, कल्याण प्रादेशिक कार्यालयाने काल महापालिकेस पाठवले होते.या पत्राची त्वरित दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अनधिकृतरित्या महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या जीन्स कारखान्यांवर निष्कासनाची धडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त यांना दिले दिनांक १८ डिसेंबर २०२१रोजी सकाळी लगेचच सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे आणि सुधीर मोकल यांनी विभागीय उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखालीगोविंदवाडी परिसरातील दोन ते तीन हजार स्क्वेअर फुटाचे चार कारखाने ३ जेसीबी आणि प्रभागातील अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी यांच्या मदतीने निष्कासित*करण्याची धडक कारवाई केलीपरिसर संवेदनशील असल्यामुळे महापालिकेच्या विनंतीनुसार या कारवाईसाठी परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त गुंजाळ तसेच पंचवीस ते तीस पोलीस कर्मचारी आणि महापालिकेचे १५ पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने हे अनाधिकृत कारखाने पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात आले.प्रतिनिधी इस्माईल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण

इमेज

मां की स्मृति में कंबल वितरित कर मनाया कंबल दिवस...कल्याण ग्रामीण क्षेत्रों के युवा सामाजिक कार्यकर्ता श्री उल्हासनादी बचाव कार्य समिति के सदस्य हैं रवींद्र लिंगायत की माताजी मुक्ताबाई एकनाथ लिंगायत की 20वीं पुण्यतिथि पर कल रात 12 बजे से 3 बजे तक कल्याण स्टेशन, शहद स्टेशन, उल्हास स्टेशन, कल्याण बस स्टॉप और रोड पर सो रहे बेघर लोगों को कंबल वितरित किए गए। ठंड बड़े पैमाने पर बढ़ रही है। इन बेघर लोगों को मानवता प्रदान करने के साधन के रूप में 60 बेघर लोगों को उनकी माताओं की स्मृति में कंबल वितरित किए गए। इस दिन कंबल दिवस भी मनाया गया, जिसमें मिशन माय म्हारल, समाजसेवी निकेत व्यवहारे, विशाल देशमुख, सचिन वारंगडे, योगेश व्यावरा, विशालकोकाटे, पंकज भोसले, विकास हासुलकर, राजू चोबदार, अजीत सिंह आदि युवाओं ने भाग लिया।

इमेज

मा.श्री.तुषार पाटील यांची जीवन आधार फाउंडेशन व रेस्क्यु फोर्स ( कार्यक्षेत्र संपूर्ण भारत देश )महाराष्ट्र राज्य सचिव पदी नियुक्ती सामाजिक कार्यात हिरीरीने पुढाकार घेऊन नेहीमीच काम करत असलेले तुषार जगन्नाथ पाटील यांना जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्य चे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा. शंकर पोवार. तसेच संजय कदम. प्रतिभा पोवार. युवराज पोवार आणि सौ डॉ शोभा महाजन यांच्या वतीने तुषार जगन्नाथ पाटील यांना महाराष्ट्र राज्य सचिव या पदावर नियुक्त करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन व हार्दिक शुभेच्छा दिल्या

इमेज

उल्हासनगर : घरकाम करण्याच्या बहाण्याने घरात घुसून ९१ तोळे सोने चोरी करणाऱ्या महिलेला उल्हासनगर पोलीस आणि क्राइम ब्रांचने अटक केली आहे. या महिलेकडून २५ तोळे सोने हस्तगत केले आहे. पोलीस तपासात तिच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये तिने अशाच प्रकारे चोऱ्या केल्या आहेत. तिच्यावर १२ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमध्ये चोरी करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. एका घरातून तिने तब्बल ९१ तोळे सोने चोरले होते. घरकाम करण्याच्या बहाण्याने ती घरात गेली. कुटुंब घराबाहेर गेले असताना, तिने आपल्याकडील चावीने दरवाजा उघडून सोने चोरी केले होते. त्यानंतर ती पसार झाली होतीमिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमध्ये घरकाम करण्याचा बहाणा करून एका घरातून ९१ तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला गजाआड केले आहे. राम तनवाणी यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेने ही चोरी केली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी महिलेला सापळा रचून अटक केली. आरोपी महिला पोलिसांना चकवा देत होती. धक्कादायक म्हणजे, या महिलेवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत १२ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती मिळाली आहे. उल्हासनगर क्राइम ब्रांचने महिला आरोपीकडून २५ तोळे सोने हस्तगत केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगळे यांनी दिली.

इमेज

उल्हासनगर महानगरपालिका येथील वाहन विभाग मधील व्यवस्थापक व त्याचा साथीदार कंत्राटी वाहन चालक यास लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी घेतले ताब्यात लोकसेवक यशवंत रतन सगळे व्यवस्थापक वाहन विभाग उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर जिल्हा ठाणे.भारत सोपानराव येटाळे कंत्राटी ड्रायव्हर उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर यातील तक्रारदार यांना व त्याचप्रमाणे इतर काही वाहन चालक व हेल्पर यांना पगार वेळेवर काढून देण्याकरिता व इतर सुविधा देण्याकरिता. एका कंत्राटी ड्रायव्हर याच्या मार्फतीने दरमहा कंत्राटी ड्रायव्हर व हेल्परयांचेकडून ३००० रुपये घेत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक १३ डिसेंबर २०२१ रोजी पडताळणी केली असता नमूद लोक सेवक यांनी कंत्राटी ड्रायव्हर यांच्यामार्फतीने तक्रारदार यांचेकडे त्यांना पगार वेळेवर काढून देण्याकरिता ३००० रुपये लाचेची मागणी करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने ए सी पी ठाणे युनिटने सापळयाचे आयोजन करून कंत्राटी ड्रायव्हर यांना तक्रारदार यांचेकडून ३००० रुपयांची लाच स्वीकारताना उल्हासनगर महानगरपालिका तरण तलावाच्या समोरील रस्त्यावर रंगेहाथ पकडण्यात आले असून. लोकसेवक यांना उल्हासनगर महानगरपालिकेतील वाहन विभाग कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले आहे

इमेज

जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे व उल्हासनगर तहसिलदार कार्यालय तसेच उल्हासनगर महानगरपालिका यांच्या वतीने तृतीयपंथी बांधवांसाठी मतदान कार्ड तथा आधार कार्ड चे अमृताचा स्वातंत्र्य महोत्सव निमित्ताने शिबिर राबवण्यात आले सदर शिबिर मा. तहसिलदार कोमल ठाकुर मॅडममा. उपायुक्त सुभाष जाधव साहेब मा. उपायुक्त प्रियंका राजपूत मॅडममा.नायब तहसिलदार अमित बनसोडे साहेब प्रभारी अधिकारी नंदा सलोनी मॅडमयांच्या उपस्थित श्री.हरी राऊत यांच्या मार्गदर्शनाने सेतू व्यवस्थापक राजेंद्र सानप व सहदेव सुर्यवंशी ,साधना खोब्रागडे मोनिका केदार यांनी पार पडलासदर शिबिरामध्ये शेकडो तृतीयपंथी बांधवांनी लाभ घेऊन मा. आयुक्त वा मा.तहसिलदार यांचे आभार व्यक्त केले

इमेज

अंबरनाथ आणि बदलापूर मध्ये अधिकृत रिक्षा प्रवासी भाडे घोषित रिक्षा चालकांना किमान भाडे ९ रुपये ठरवून देण्यात आले आहे, अशी माहिती कल्याण आरटीओचे अधिकारी तानाजी चव्हाण यांनी सांगितलेअंबरनाथ आणि बदलापूरमध्ये बेकायदा पद्धतीने प्रवासी रिक्षा भाडेवाढ करणाऱ्या रिक्षाचालकांना उपप्रादेशिक परिवहन विभागाने (Kalyan RTO) दणका दिला आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांतील अधिकृत रिक्षा प्रवासी भाडे घोषित केले असून, दीड किलोमीटरपर्यंत ९ रुपये, तर चार किलोमीटरपर्यंत कमाल भाडे २४ रुपये इतके जाहीर करण्यात आले आहे, असे कल्याण आरटीओचे अधिकारी तानाजी चव्हाण यांनी सांगितले. बदलापूर व अंबरनाथ शहरात सध्या किमान भाडे १० ते १५ रुपये आकारले जाते. तर कमाल भाडे ३० ते ३५ रुपयांपर्यंत आकारले जाते. त्यामुळे आता प्रवाशांना दिलासा मिळणार आहेकरोना काळात रिक्षांमधून प्रवासी वाहतूक बंद होती. कालांतराने राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार रिक्षात दोन प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी देण्यात आली. त्यामुळे प्रवासी फेरी परवडावी म्हणून रिक्षाचालकांनी अघोषित भाडेवाढ केली. पर्याय नसल्याने प्रवाशांनी अतिरिक्त भाडे देण्यास सुरुवात केली. सध्या रिक्षात तीन ते चार प्रवासी बसवले जात असतानाही अतिरिक्त भाडे आकारले जात आहे. त्यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये वाद होत आहेत. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाने याची दखल घेत, आता अधिकृत रिक्षा प्रवासी भाडे घोषित केले असून, यात किमान भाडे ९ रुपये ठरवून देण्यात आले आहेमात्र सकाळी लोकल पकडण्याच्या गडबडीत वाद टाळण्यासाठी प्रवासी मागेल ते भाडे देऊन निघून जातात, त्यामुळे रिक्षाचालकांचे फावते. अशावेळी परिवहन विभागाने केलेली भाडेकपात रिक्षाचालक स्वीकारण्याची शक्यता कमी वाटते, असे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले.

इमेज

जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सेवा केली म्हणून मध्यवर्ती रुग्णालयास प्रथम पारितोषिक कोविड योध्दा सन्मानचिन्ह म्हणून- डाॕ सुधाकर शिंदे यांचा सत्कार उल्हासनगर (अशोक शिरसाट ) महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था वडाळा अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण कक्ष ठाणे व पालघर यांच्यातर्फ जागतिक एड्स दिन २०२१ संपवूया महामारी प्रथम पारितोषिक व रक्तपेढी विभाग मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर - ३ . येथे उत्कृष्ठ सुविधा पुरविल्या बदल जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला म्हणून डाॕक्टर आणि कर्मचारी यांनी रुग्णांना चांगल्या सुविधा पुरवण्या बरोबर रुग्णांना वेळोवेळी मार्गदर्शन केले असून कोरोनाच्या महामारीत आपल्या कुटुंबाची परवा न करता खरे कोरोना योध्दा म्हणजे डाॕक्टर आहेत तसेच डाॕ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी कोविंड योध्दा म्हणून सन्मानचिन्ह मध्यवर्ती रुग्णालयाचे एम डी डी जिल्हा शल्यचिकित्सक डाॕ सुधाकर शिंदे सर यांना पुरस्काराने सन्मानित केले असून रुग्णालयास जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सेवा देणारे अतिरिक्त जिल्हा सर्जन डाॕ जाफर तडवी . प्रशासकीय अधिकारी डाॕ राजेश म्हस्के . डाॕ उषा ससाणे. डाॕ विश्वनाथ पेहकर. डाॕ विलास वाघमारे. डाॕ सुहास मोहनाळकर. डाॕ संजय कुकेड. डाॕ सोनिया ओचानी. मंगला रवडसे. छाया घोष . सुहास बागूल . किशोर आहिरराव. बागडे. राजकुमार चव्हाण . सोनाली गोडाम. संजोग भराडे. शिल्पा गोतपगार. विदया चौधरी. सुनंदा मॕडम. यांनी सुध्दा कोरोनाच्या महामारीत आपल्या कुटुंबाची परवा न करता खरे कोरोना योध्दा आहेत तसेच मध्यवर्ती रुग्णालयास जिल्हा स्तरावर डाॕक्टर यांनी उत्कृष्ट सेवा केली आणि प्रथम क्रमांक पारितोषिक मिळाले म्हणून लहुजी सेना शहर अध्यक्ष उल्हासनगर व निसर्ग सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य सदस्य केशरभाऊ लोणार यांनी केला सत्कार या सत्कारामुळे उल्हासनगर शहरात सामाजिक कार्यकर्ते. समाज सेवक . आणि पत्रकार यांच्याकडून मध्यवर्ती रुग्णालयाचे डाॕक्टर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

इमेज

*ज्ञानाच्या क्षेत्रातील अजिंक्य वीर म्हणजे भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर -* ( बदलापूर प्रतिनिधी आशा रणखांबे) बेलवली येथील डॉ .आंबेडकर ग्रंथ अध्यासनाच्या उद्‌घाटन सोहळ्यात प्रा.दामोदर मोरे यांचे प्रतिपादनबदलापुर - यश हे दिसत असते परंतु त्या यशा मागचा त्याग कधीच दिसत नसतो,भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाची तहान लागली होती, ज्ञानाच्या क्षेत्रातील अजिंक्य वीर म्हणजे भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे आहेत असे प्रतिपादन जेष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि मराठी - हिंदी साहित्यिक प्रा . दामोदर मोरे यांनी बदलापूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ अध्यासनाच्या उद्‌घाटन समयी केले .महाराष्ट्र राज्याच्या भूषणात भर टाकणारे ग्रंथालय बदलापूर येथे निर्माण करण्यात आले आहे . या ग्रंथालयाचा उद्‌घाटन सोहळा नुकताच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला . या समयी उपस्थिताना संबोधित करतांना प्रा . दामोदर मोरे पुढे म्हणाले की, डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी सलगअठरा-अठरा तास अभ्यास करुन वंचितांची शेकडो शतकांची तहान भागविली आहे, आपल्या प्रज्ञेने त्यांनी कल्याणकारी भारतीय घटना लिहिली, म्हणूनच त्यांना ज्ञानाच्या क्षेत्रातील अजिंक्य वीर आणि विद्यापीठाच्या क्षेत्रातील विविध पदव्या मिळविणारे 'अलेक्झांडर ' म्हटले जाते . बदलापूर येथील 'साहित्य गौरव ग्रंथालयाने' आयोजित केलेल्या ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ अध्यासनाचे ' उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष पदावरुन बोलतांना प्रा . दामोदर मोरे यांनीडॉ. आंबेडकर अध्यासन निर्मिती आणिग्रंथालयासाठी विनामूल्य इमारत देणारे नगर सेवक कैप्टन आशिष दामले आणि ग्रंथालयाचे विश्वस्त मा.शाम जोशी यांच्या सामाजिक बांधिलकीचा त्यांनी आपल्या भाषणात गौरव केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथप्रेमी , ज्ञान प्रेमी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर ग्रंथालयाने निर्माण केलेली एक सुंदर अशी डाकुमेंटरी चल चित्रकित दाखविण्यात आली. या चित्र फिती मध्ये नगरसेवक आशिष दामले, प्रा.दामोदर मोरे, रमेश शिंदे, शाम जोशी, अर्चना कर्णिक यांनी बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश झोत टाकण्यात आला आहे. या समयी डॉ . बाबासाहेब आंबेडकर विषयक मौलिक साहित्याचे जतन करणारे आयु.रमेश शिंदे तसेच आंबेडकरी डिरेक्टरीचे काम हाती घेतलेले कल्याणचे देवचंद अंबादेयांचा प्रत्येकी अकरा हजार रुपये, तसेच स.ग.मालशे यांचा शाम जोशी यांनी संपादितकेलेला ग्रंथ आणि शाल देऊन मा.नगर सेवक आशिष दामले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . याच कार्यक्रमात ग्रंथालयाचे विश्वस्त शाम जोशी यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ अध्यासनाचे ' अध्यक्ष म्हणून प्रा . दामोदर मोरे यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. ग्रंथपाल अर्चना कर्णिक, कवी शिवा इंगोले, लेखक दुनबळे, विठ्ठल मोरे, स्वप्निल सोनवणे, तुकेश मोटघरे, 'संघर्ष ' कार नवनाथ रणखांबे, पत्रकार सुनील शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाम जोशी यांनी केले .कार्यक्रमास महिलाही वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता .

इमेज

*जनहित लोकशाही पार्टी च्या वतीने नांदेड जिल्ह्यातील एस टी डेपो मध्ये होत असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिनांक 05/12/2021/रोजी, नांदेड, येथील जिल्ह्यातील,एस,टी, डेपो,मधे,होत असलेल्या जन आंदोलनात सहभागी कर्मचारी,एस टी, साठी, जनहित लोकशाही पार्टी चा जाहीर पाठिंबा देण्यात आला,मा, अशोकराव आल्हाट संस्थापक अध्यक्ष,मा, रामराव महाराज भाटेगावकर,आदि, मान्यवर या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील सर्व एसटीच्या कामगारांना, शासनाने , सरकार मधे विलीनीकरण करून, त्यांच्या वर , होत असलेला अन्याय,दूर करावा,अशी मागणी करूण, त्यांच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आलाजनहित लोकशाही पार्टीच्या वतीने,आज अंतिम इशारा देण्यात आला,की ,जर ह्या कर्मचाऱ्यांना, सामावून घेतले नाही तर, आम्ही, यांच्या साठी, रस्त्यावर उतरून आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही.अशी भूमिका घेतली आहे अशी माहिती जनहित लोकशाही पार्टी चे संस्थापक अध्यक्ष अशोकराव आल्हाट यांनी दिली

इमेज

3 डिसेंबर 2021 रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्तदिव्यांग आधार सेवा संस्थेच्या वतीने संस्थेच्या उल्हासनगर येथील कार्यालयाजवळ जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला.जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला कार्यक्रमा दरम्यान उपस्थित असलेल्या सभापती. नगरसेविका. समाजसेवक तसेच उपस्थित मान्यवरांनी महानगरपालिकेच्या दिव्यांग निधी वाढवण्यात आल्या बद्दल माहिती दिली व येणाऱ्या आर्थिक वर्षांमध्ये सन 2022-23 हा निधी दर महिना 2000 रू. प्रमाणे दिव्यांग बांधवांचे बँक खाते मध्ये पेन्शन स्वरूपात जमा होईल असे आश्वासन दिले व एका वृद्ध महिलेला संस्थेच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते वॉकर वाटप करण्यात आली उपस्थित दिव्यांग बांधवांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले

इमेज