पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अग्नीवीरांची पहिली तुकडीची पासिंग आऊट परेड दिमाखात संपन्न

इमेज
अग्नीवीरांची पहिली तुकडीची पासिंग आऊट परेड दिमाखात संपन्न मुंबई - अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची पासिंग आऊट परेड मंगळवार 28 मार्च रोजी मुंबईतील आयएनएस चिल्का येथे संपन्न झाली. अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या सैनिकांची पहिली तुकडी नौदलात दाखल होणार आहे. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीने आयएनएस चिल्का येथे पासिंग आऊट परेडसह त्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारंपारिकपणे सकाळी होणारी परेड आता पहिल्यांदाच सूर्यास्तानंतर आयोजित करण्यात आली होती आयएनएस चिल्का येथे प्रशिक्षण घेत असलेल्या 273 महिला अग्निवीरांसह जवळपास 2600 अग्निवीरांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार हे प्रमुख पाहुणे आणि पासिंग आऊट परेडचे पुनरावलोकन अधिकारी उपस्थित होते. फ्लॅग ऑफिसर, कमांडिंग-इन-चीफ सदर्न नेव्हल कमांडसह इतर वरिष्ठ नौदल अधिकारी आणि मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते. यशस्वी प्रशिक्षणार्थींना त्यांच्या सागरी प्रशिक्षणासाठी आघाडीवर असलेल्या युद्धनौकांवर तैनात केले जाईल.अग्निवीरांच्या या पहिल्या त

सामाजिक प्रतिष्ठाण आणि समाजसेविका डॉ.वर्षा आहुजा मॅडम यांच्या प्रयत्नाने धोकादायक जीवघेणा असलेले एम एस ई बी पोल गेल्या आठ महिन्यापासून प्रकाश आहुजा बंगलो शेजारी उघडा पडला होता

इमेज
सामाजिक प्रतिष्ठाण आणि समाजसेविका डॉ.वर्षा आहुजा मॅडम यांच्या प्रयत्नाने  धोकादायक जीवघेणा असलेले   एम एस ई बी पोल गेल्या आठ महिन्यापासून प्रकाश आहुजा बंगलो शेजारी उघडा पडला होता  त्याच  ठिकाणी राहदारीचा रस्ता असल्याने कोणत्याही प्रकारची जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. समाजसेवक,उद्योगपती. दिनेश आहुजा यांनी सर्व नगरसेवक यांना वारंवार फोन करून देखील कोणी दखल घेतली नाही  अखेर आहुजा यांनी सामाजिक प्रतिष्ठाण चे पदाधिकारी यांच्या कडे तक्रार केली असता  सामाजिक प्रतिष्ठाण चे अध्यक्ष दीपक साठे, सचिव समाधान प्रधान ,कार्याध्यक्ष योगेश साळवी, यांनी तत्काळ mseb चे अधिकारी घाटवड ,यांची भेट घेतली असता घाटवड यांनी तत्काळ दखल घेतली व क्षणाचा ही विलंब न करता लगेच काम करून दिले आणि नागरिकाना होणाऱ्या त्रासापासून मुक्त केले.   या वेळी समाजसेविका डॉ.सौ.वर्षा आहुजा तसेच समाजसेवक,उद्योगपती दिनेश आहुजा ,यांनी सामाजिक प्रतिष्ठाण च्या टीमचे भरभरून कौतुक केले प्रतिनिधी अशोक शिरसाट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर

प्रेरणा फाउंडेशन चा पाचवा वर्धापन व पुरस्कार वितरण समारंभ धुमधडाक्यात साजरा

इमेज
प्रेरणा फाउंडेशनचा पाचवा वर्धापन व पुरस्कार वितरण समारंभ धुमधडाक्यात साजरा . कल्याण: प्रेरणा फाउंडेशन चा पाचवा वर्धापन दिन २५ मार्च २०२३ रोजी कल्याण मधील आचार्य प्र.कै.अत्रे रंगमंदिर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापिका अध्यक्षा दीप्ती उर्फ प्रेरणा (गावकर) कुलकर्णी, यांनी केले. यावेळी सामाजिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यात आलेल्या सर्व मान्यवरांना पुरस्कार , ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती मा डॉ चिंतामण म्हात्रे (दिनदयाल कुष्ठरोग संस्था संस्थाप/अध्यक्ष ), मा.श्री जादूगर अभिजीत (जादुई दुनिया,अभिनेते), मा श्री संजीव जैन (integreon cheif information officer ), मा श्री अविनाश म्हात्रे दिनदयाल कुष्ठरोग संस्था सचिव) ,मा श्री विकास परब (प्रमुख मुंबई अग्निशामकदल फायर ब्रिगेड लिडिंग फारमॅन), मा सौ अनिशा फणसळकर (अमोदीनी संस्था संस्थापक/ अध्यक्ष , मॅरेज आणि चाईल्ड कौन्सिलर ), मा रघुनाथ फडके (मुंबई आकाशवाणी केंद्र , जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य,

नाथपंथी डवरी गोसावी सामाजिक संस्थाचे भिमराव इंगोले यांच्या वाढ दिवसा निमित्त डोळे तपासणी तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

इमेज
नाथपंथी डवरी गोसावी सामाजिक संस्थाचे भिमराव इंगोले यांच्या वाढ दिवसा निमित्त डोळे तपासणी तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन अंबरनाथ; दिनांक २५ मार्च २०२३ भटके विमुक्त सामाजिक संस्थांच्या वतीने भिमराव इंगोले यांच्या वाढ दिवसा निमित्त अंबरनाथ येथील सर्कस मैदान येथे डोळे व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते  भिमराव इंगोले नाथपंथी डवरी गोसावी समाज अध्यक्ष असून सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे  आज त्यांच्या वाढ दिवसाला शहरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून वाढ दिवस साजरा केला तसेच इंगोले यांना वाढ दिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या तसेच वाढ दिवसा निमित्त मेडिकल केंप लावण्यात आले त्या मधे रक्तदाब तपासनी शुगर ,ईसीजी,डोळे तपासणे करिता अनेक गरजु महिला व नागरिकांनी शेकडोच्या संख्येने येवून या शिबिराचा लाभ घेतला या वेळी भटके विमुक्त सामाजिक संस्था चे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी भीमराव इंगोले यांना तमाम भटके विमुक्त जाती जमाती संघ च्या वतीने खुप खुप शुभेच्छा दिल

रात्रीचा पाऊस’मधून उलगडणार स्त्री मनाचा हुंकार फिल्म फेस्टिवलमध्ये नावाजलेला सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला

इमेज
रात्रीचा पाऊस’मधून उलगडणार स्त्री मनाचा हुंकार  फिल्म फेस्टिवलमध्ये नावाजलेला सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला प्रतिनिधी गणेश तळेकर मुंबई स्त्रीची अस्मिता आणि मुख्य म्हणजे अस्तित्व काय असतं ? हे सांगणारा चित्रपट ‘रात्रीचा पाऊस’ येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. आपण स्वतःला कितीही पुरोगामी म्हणत असलो तरी आजही अनेक गावात, अनेक घरात स्त्रीला स्वतःचे निर्णय घेता येत नाहीत, तिच्यासाठी कोणीतरी निर्णय घेते, स्त्रीचे लैंगिक शोषण अनेक वेळा होते आणि तिला तिचा आवाजही नसतो, अशाच विषयांवर थेट प्रहार ‘रात्रीचा पाऊस’ या सिनेमात केला आहे. या सिनेमात दुःष्काळी भागातील होरपळ आणि त्यात गावातून मुंबईकडे झालेला नायिकेचा प्रवास दाखवण्यात आला आहे.  नवोदित अभिरामी बोस यात मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबत लक्ष्मी बॉम्ब, टिकली, जॅकलीन – आय एम कमिंग अशा सिनेमात झळकलेला किरण पाटील आहे. तर मल्याळम सिनेमाचा अनुभव असलेले शाईन रवी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. तर सुमी प्रोडक्शनने यांची या सिनेमाची निर्मीती केली आहे. त्या शिवाय या सिनेमात दोन सुंदर गाणी आहेत, या गाण्यांना प्रसिद्ध गायिका चित्रा आणि बेला शे

शासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला

इमेज
शासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला             देवेंद्र फडणवीस काय म्हणाले… नागपूर:  नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी  संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी कर्मचाऱ्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाबद्दल विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याची बातमी मला तुमच्याकडूनच समजली. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न होता, तो आम्ही समजून घेतला आहे. यामध्ये आम्ही कुठेही अहंकार न ठेवता त्यांच्याशी संवाद साधला.” देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “कर्मचाऱ्यांना जे सामाजिक संरक्षण हवं आहे. त्यांना निवृत्तीनंतर जे फायदे हवे आहेत, त्यासंदर्भात जे तत्व आहे, ते आम्ही मान्य केलं आहे. याची कार्यवाही कशी करायची, यासाठी एक समिती काम करत आहे. सरकारने कुठेही आडमुठी भूमिका न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला. त्यासाठी मी कर्मचाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा सरकारच्या वतीने सांगू इच्छितो की, सगळे कर्मचारी आमचेच आहेत. त्यांना जे चांगल्यात चांगलं देता येईल, ते देण्याचा

धर्म गुरू सुफी संत दरबार फकीर मस्तानशाह वारसी बाबा सर्व धर्म समभाव की अमिट छाँप अंबरनाथ पश्चिम जावसई गाँव ठाकुर पाडा या ठिकाणी सालाबादप्रमाणे यंदा ही "भंडारा व कव्वाली" चा कार्यक्रम

इमेज
धर्म गुरू सुफी संत दरबार फकीर मस्तानशाह वारसी बाबा सर्व धर्म समभाव की अमिट छाँप अंबरनाथ पश्चिम जावसई गाँव ठाकुर पाडा या ठिकाणी सालाबादप्रमाणे यंदा ही "भंडारा व कव्वाली" च्या कार्यक्रम अंबरनाथ प्रतिनिधी आस्ताना धर्मगुरु हजरत पीर हाफिजशाह वारसी बाबा फकीर बारगाहा वारीसपाक देवाशरीफ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने धर्म गुरू सुफी संत दरबार फकीर मस्तानशाह वारसी बाबा सर्व धर्म समभाव की अमिट छाँप अंबरनाथ पश्चिम जावसई गाँव ठाकुर पाडा या ठिकाणी सालाबादप्रमाणे यंदा ही "भंडारा व कव्वाली" चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाविकांसाठी भंडारा कार्यक्रमाची सुरुवात सकाळीपासून करण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळी वारीस बाबाच्या दरबारात कव्वालीचे शानदार सुफी कलाम सादर करण्यात आले. या भंडारा व कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान ठाणे जिल्ह्यातील कल्याण विठ्ठलवाडी उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर वागणी तसेच इतर ठिकाणाहून भाविकांनी उपस्थिती लावून कार्यक्रमास सहभागी झाले होते.

कल्याण पूर्व येथे ठाणे जिल्हा शाखेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

इमेज
कल्याण पूर्व येथे ठाणे जिल्हा शाखेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न  कल्याण (प्रतिनिधी ) भारतीय बौध्द महासभा  दि. १८ मार्च २०२३ रोजी सुर्यपुत्र  भैय्यासाहेब आंबेडकर सभागृह आनंदवाडी सभागृह  कल्याण (पूर्व ) येथे भारतीय बौध्द महासभा,  ठाणे जिल्हा  आणि वंचित बहुजन आघाडी यांची महत्त्वपूर्ण बैठकाचे आयोजन  करण्यात आले होते तसेच महत्त्वपूर्ण या विषयावर चर्चा करण्यात आली कि दि . २९ एप्रिल  २०२३ रोजी . महाधम्म मेळावा घेण्याचे निश्चित झाले असून या मेळाव्याचे पूर्ण नियोजन करण्यासाठी भारतीय बौध्द महासभा . राष्ट्रीय उपाध्यक्षा.  सुषमाताई पवार, राष्ट्रीय सचिव. बी . एच. गायकवाड गुरुजी  . अॕड . एस एस वानखेडे सर, वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान गायकवाड , महिला अध्यक्षा मायाताई कांबळे , यांच्यासह आदी पदाधिकारी   यांनी  या बैठकीत  मार्गदर्शन    केले असून  या बैठकीत भारतीय बौध्द महासभा . ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी , सरचिटणीस प्रभाकर सूर्यवंशी सर , कोषाध्यक्ष उत्तम सोनवणे,  उल्हासनगर तालुका अध्यक्ष अशोक व्हि जाधव , सरचिटणीस रोशन पगारे , कोषाध्यक्ष  जीवन मोरे , क

अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस ७२६२ स्वतंत्र कामगार यूनियन

इमेज
अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस ७२६२ स्वतंत्र कामगार यूनियन मुंबई दिनांक 20 मार्च 2023 रोजी विधान भवन मुंबई मध्ये  मा. श्री एकनाथ जी शिन्दे मुख्यमंत्री मा मुख्य सचिव मा वित्तीय विभागा चे सचिव / मा . नगरविकास विभागाचे सचिव / मा . सामान्य प्रशासन विभागा चे सचिव / मा . सामाजिक न्याय विभागा चे सचिव यांच्या बरोबर मिटींग संपन्न झाली त्यात वारस हक्काच्या 26/2/2023 च्या शासन आदेशातून वारस हक्का ची नौकरी साठी जाती प्रमाण पत्र जात पडताळणी ची जी अट आहे ती रद्द करण्या संबधी चर्चा झाली मा . मुख्य मंत्री महोदया ने ती अ ट रद्द करण्याचे आदेश संबधीत अधिकान्यांना दिले तसेच १० / २० / 30 ची आश्वासित पदोन्नती ही राज्य शासनाच्या कर्म चान्या प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामगार कर्मचारी यांना लागू करण्यात येईल तसेच नव निर्वाचित नगर पंचायत मध्ये ग्राम पंचायत चे पूर्व चेसर्व कामगारां समावेष करून कायम करण्याचे ठरले या मिटींग मध्य अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री . चरण सिंह टांक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री . जयसिंग कछवा व कार्याध्यक्ष श्री