कल्याण पूर्व येथे ठाणे जिल्हा शाखेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
कल्याण (प्रतिनिधी )
भारतीय बौध्द महासभा दि. १८ मार्च २०२३ रोजी सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर सभागृह आनंदवाडी सभागृह कल्याण (पूर्व ) येथे भारतीय बौध्द महासभा, ठाणे जिल्हा आणि वंचित बहुजन आघाडी यांची महत्त्वपूर्ण बैठकाचे आयोजन करण्यात आले होते तसेच महत्त्वपूर्ण या विषयावर चर्चा करण्यात आली कि दि . २९ एप्रिल २०२३ रोजी . महाधम्म मेळावा घेण्याचे निश्चित झाले असून या मेळाव्याचे पूर्ण नियोजन करण्यासाठी भारतीय बौध्द महासभा . राष्ट्रीय उपाध्यक्षा. सुषमाताई पवार, राष्ट्रीय सचिव. बी . एच. गायकवाड गुरुजी . अॕड . एस एस वानखेडे सर, वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान गायकवाड , महिला अध्यक्षा मायाताई कांबळे , यांच्यासह आदी पदाधिकारी यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले असून या बैठकीत भारतीय बौध्द महासभा . ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी , सरचिटणीस प्रभाकर सूर्यवंशी सर , कोषाध्यक्ष उत्तम सोनवणे, उल्हासनगर तालुका अध्यक्ष अशोक व्हि जाधव , सरचिटणीस रोशन पगारे , कोषाध्यक्ष जीवन मोरे , कल्याण तालुका अध्यक्ष अशोक जाधव , वंचित चे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष शेषराव वाघमारे, अनिल पवार, अशोक सरोदे, यांच्यासह भारतीय बौध्द महासभा सर्व तालुके शहर शाखा आणि वंचित बहुजन आघाडी चे सर्व तालुका पदाधिकारी यावेळी उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद