बळीराजाच्या मदतीसाठी उल्हासनगर (पूर्व) युवासेनेचा पुढाकार: ५० हजारांची मदत सुपूर्द

बळीराजाच्या मदतीसाठी उल्हासनगर (पूर्व) युवासेनेचा पुढाकार: ५० हजारांची मदत सुपूर्द

उल्हासनगर:
महाराष्ट्रातील बळीराजावर ओढवलेल्या दुष्काळाच्या संकटात आधार देण्यासाठी उल्हासनगर (पूर्व) युवासेनेच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा शिवसेनेचे नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला असून, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ५०,००० रुपयांचा धनादेश खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आला.
शेतकऱ्यांप्रती सामाजिक बांधिलकी जपत कठीण प्रसंगात त्यांना धीर देण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. संकटाच्या काळात बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याची भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास युवासेना कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्ष जितेन पाटील, उपजिल्हाध्यक्ष युवराज पाटील, उपशहर अध्यक्ष सिद्धांत रमेश चव्हाण, शेखर भीमराव सपकाळे, युवासेना सचिव गौरव भानुशाली, चिटणीस प्रवीण करीरा, उपशहर अध्यक्ष अक्षय मांडुळकर, विभाग अध्यक्ष भावेश शेजुळे, उपविभाग अध्यक्ष भूषण पवार, शिवसेना शाखा अध्यक्ष रोहित जाधव, उपशाखा अध्यक्ष धीरज सोनावणे, बाबू ढोळई यांच्यासह अनेक शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार