जया प्रदा यांच्या हस्ते पुण्यातील दिमाखदार सोहळ्यात गौरव;
जया प्रदा यांच्या हस्ते पुण्यातील दिमाखदार सोहळ्यात गौरव;
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
*(प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट )*
पुणे इन्साइट्स सक्सेस मीडिया एलएलसी, इन्साइट्स सक्सेस मीडिया आणि ग्लोबल ह्युमॅनिटेरियन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नॅशनल प्रेस्टिज लीडरशिप अवॉर्ड्स २०२६’ हा भव्य व प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा नुकताच पुणे येथे मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न
झाला.
या सोहळ्यात महाराष्ट्र शासनाचे आदिवासी सेवक तथा ‘नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन’चे (नागपूर, महाराष्ट्र राज्य) जनरल सेक्रेटरी डी.लिट. डॉ. व्ही. व्ही. पोपेरे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल ह्युमॅनिटेरियन लीडरशिप नॅशनल अवॉर्ड २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.
हा मानाचा पुरस्कार भारताच्या माजी खासदार तथा सुप्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा यांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते डॉ. पोपेरे यांना प्रदान करण्यात आला.
पुणे येथील या सोहळ्यात भारतातील विविध राज्यांतील उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, उद्योजक तसेच परदेशातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या आणि आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला.
डी.लिट. डॉ. व्ही. व्ही. पोपेरे हे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण व आदिवासी भागाच्या विकासासाठी निःस्वार्थपणे कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील वाहतूक सुविधांच्या विकासासाठी, विशेषतः सार्वजनिक बससेवेशी संबंधित विविध उपक्रमांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
याशिवाय, युवक-युवतींना प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यात डॉ. पोपेरे यांचा मोठा वाटा राहिला आहे.
पोपेरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, स्वर्गीय रुक्मिणी बाई पोपेरे चारिटेबल ट्रस्ट बदलापूर ठाणे यांच्यावतीने देखील खूप शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट
जनहित न्यूज महाराष्ट्र
पुणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद