कल्याण ते चवदार तळे महाड व्हाया गांधार पाले लेणी ते कल्याण : बस प्रवासात रंगले अनोखे चालते फिरते साहित्य संमेलन

*चवदार तळे ते गांधारपाली लेणी:* बसप्रवासात रंगले अनोखे ‘चालते-फिरते साहित्य संमेलन’
चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त महाड येथे ‘पेटले महाडचे पाणी’ कविता संग्रहाचे मुखपृष्ठ अनावरण
 *कल्याण (प्रतिनिधी आशा रणखांबे):* 
चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दीचे औचित्य साधत आणि कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने ‘सार्थक साहित्य प्रकाशन’ आणि ‘चवदार तळे सत्याग्रह शताब्दी समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने एक आगळावेगळा साहित्यिक उपक्रम नुकताच पार पडला. नवनाथ रणखांबे (कल्याण) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या ‘चवदार तळे आणि गांधारपाली लेणी बसमधील चालते-फिरते साहित्य संमेलना’ने उपस्थितांचे लक्ष वेधले. कल्याण ते महाड आणि महाड ते गांधारपाली लेणी असा बसप्रवास करत असताना साहित्य, कविता, वैचारिक मंथन, गझल आणि धम्मसहलीचा सुंदर संगम या निमित्ताने अनुभवयास मिळाला.
या स्तुत्य उपक्रमाचे उद्घाटन साहित्यिक भीमराव रायभोळे (अंबरनाथ) आणि कवी तथा पाचपीर ट्रस्टचे संचालक शाम बैसाने (पवई, मुंबई) यांच्या हस्ते झाले. बसप्रवासालाच एका साहित्यिक विचारपीठाचे स्वरूप प्राप्त करून देणारा हा अनोखा जातील अभिनव उपक्रम ठरला.
विविध सत्रांतून साहित्याचा आणि विचारांचा जागर
संमेलनादरम्यान दिवसभरात विविध वैचारिक व साहित्यिक सत्रे पार पडली:
 * पहिले सत्र (कवी कट्टा): कवी सुधाकर सरवदे (अंबरनाथ/ठाणे) यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. या वेळी नाना नेटावटे (जातेगाव, नाशिक), विजयकुमार भोईर ( सुपेगाव, भिवंडी) आणि भीमराव रायभोळे (लातूर)  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 * दुसरे सत्र (परिसंवाद): ‘महाड चवदार तळे सत्याग्रह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका’ या विषयावर कवी अशोक भवार (पवई, मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद रंगला. अशोक भडांगे (शहापूर) आणि प्रताप पातोडे (कल्याण) प्रमुख पाहुणे होते.  तर या परिसंवादामध्ये वक्ते कवी-पत्रकार मिलिंद जाधव (पडघा, भिवंडी) व शिक्षक-कवी संघरत्न घनघाव (शहापूर) यांनी या विषयावर आपली प्रभावी मते मांडली.
 * तिसरे सत्र: कवी शाम बैसाने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात किसनराव इंगोले (हिंगोली) व जगदेव भटू (धुळे) प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. कवींनी आपल्या कवितांद्वारे सामाजिक वास्तव आणि आंबेडकरी चळवळीच्या भावभावनांना प्रभावी वाचा फोडली.
 * चौथे सत्र: गझलकार विजयकुमार भोईर यांच्या अध्यक्षतेखाली ‘आंबेडकरी चळवळीतील गझलेची भूमिका आणि भोईरांच्या गझला’ या विषयावर व्याख्यान व सुमधुर गझल सादरीकरण झाले.
 * पाचवे सत्र (सांगता समारंभ): साहित्यिक जगदेव भटू यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा सांगता समारंभ पार पडला, ज्यामध्ये त्यांनी संपूर्ण संमेलनाचा सारांश मांडला. स्वागताध्यक्षा प्रा. आशा रणखांबे (कल्याण) यांनी सार्थक साहित्य प्रकाशनाच्या वतीने उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली.

चवदार तळ्याला अभिवादन व पुस्तकाचे अनावरण
या साहित्यिक प्रवासादरम्यान सहभागी साहित्यिकांनी महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक सत्याग्रहाला आणि लढ्याच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

याच ऐतिहासिक पार्श्वभूमीवर, संपादक नवनाथ रणखांबे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या आणि सार्थक साहित्य प्रकाशनाच्या वतीने निर्मित होणाऱ्या ‘पेटले महाडचे पाणी’ या प्रातिनिधिक कविता संग्रहाच्या मुखपृष्ठाचे अनावरण चवदार तळे येथे उपस्थित कवी व समाजबांधवांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून गांधारपाली लेणी येथे धम्मक्रांती सहल आयोजित करण्यात आली, जी ऐतिहासिक दर्शन आणि बौद्ध संस्कृतीच्या परिचयामुळे संस्मरणीय ठरली.

 मनोगत:
 "चवदार तळे सत्याग्रह शताब्दी समितीने माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीमुळे जगातील हे आगळेवेगळे आणि बसप्रवासातील पहिलेच चालते-फिरते साहित्य संमेलन यशस्वी करता आले, याचा मनस्वी आनंद आहे. साहित्याच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा विचार जनमानसात रुजविण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न होता."
— नवनाथ रणखांबे,संमेलनाध्यक्ष

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार