पोस्ट्स

*प्रशांत दामले यांचे ‘नियम व अटी लागू’

इमेज
प्रशांत दामले यांचे ‘नियम व अटी लागू’ गणेश तळेकर मुंबई माणूस हा असा प्राणी आहे की, सामान्यपणे तो कोणत्याही मानवी नियमांत बसत नाही. कालचा माणूस आज वेगळा भासतो. कोणत्या प्रसंगी आपण कसे वागू हे निश्‍चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे सांगणे आणि स्वतः वागणे यात फरक पडतो. थोडक्यात काय तर  नियम व अटींच्या बाबतीत विचाराच्या, वागण्याच्या बाबतीत ठामच असावे, असा हट्ट अनेकदा चुकीचा ठरतो. सोयीनुसार नियमातून पळवाट काढताना अटींचा भंग होऊ शकतो. हे माहीत असूनही नियम व अटी लागू केल्या जातात. त्यात जर या नियम व अटी नवरा व बायकोच्या नात्याला लागू करायच्या असतील तर काय?   नियम अटींची ही कसरत पार पाडताना एका जोडप्याची होणारी तारांबळ पाहायची असेल तर निर्माते प्रशांत दामले यांनी भन्नाट नियम व मजेशीर अटींसह रंगभूमीवर आणलेलं ‘नियम व अटी लागू’ हे आजच्या पिढीचं खुसखुशीत नाटक चुकवू नका. गौरी थिएटर निर्मित व प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘नियम व अटी लागू’ या नव्या नाटकाचा शुभारंभ शनिवार १८ मार्च सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली रात्रौ ८.३० वा. होणार आहे. नाटकातील नियम व अटींच्या बाब...

कंजारभाट समाज सामाजिक संस्था यांच्या उपोषणाला मिळाले यश लवकरच जातीचे दाखले देण्यात येतील असे तहसील कार्यालय कडून मिळाले लेखी पत्र

इमेज
कंजारभाट समाज सामाजिक संस्था यांच्या उपोषणाला मिळाले यश लवकरच जातीचे दाखले देण्यात येतील असे  तहसील कार्यालय कडून मिळाले लेखी पत्र अंबरनाथ : कंजारभाट समाजातील बांधवांना जातीचे दाखले मिळावे या करिता कंजारभाट समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद तामचेकर यांनी अंबरनाथ तहसील कार्यालय या ठिकाणी दिनांक 13 मार्च 2023 रोजी उपोषण केले होते कंजारभाट समाजातील 117 लोकांच्या दाखल्यांचे अर्ज अंबरनाथ तहसील कार्यालय या ठिकाणी दाखल करण्यात आले असतानाही जातीचे दाखले मिळत नसल्याने 13 मार्च रोजी तहसील कार्यालय या ठिकाणी उपोषण सुरू केले असता अंबरनाथ तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी यांनी कंजारभाट समाज सामाजिक संस्थेला उपोषण मागे घेण्याकरिता परिपत्रक देऊन लवकरच  जातीचे दाखले  देण्यात येतील असे लेखी पत्र देऊन आश्वासन दिले व उपोषण मागे घेण्या साठी पत्र दिले असता कंजारभाट समाज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तहसील कार्यालय यांच्या मार्फत मिळालेल्या पत्राचा आदरपूर्वक स्वीकार करून उपोषण मागे घेतले  अशी माहिती कंजार भाट समाज सामाजिक संस्था चे अ...

उल्हासनगर मधील मेट्रो स्टेशनला सिंधूनगर ऐवजी स्व.गोपीनाथ मुंढे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी ने केली

इमेज
उल्हासनगर मधील मेट्रो स्टेशनला सिंधूनगर ऐवजी  स्व.गोपीनाथ मुंढे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी ने केली उल्हासनगर शहरात शासनाकडून मेट्रो रेल्वे प्रकल्प राबविण्यात येणार आहे.ही वार्ता उल्हासनगर शहरात चालू आहे मेट्रो येणार तर स्थानक ही असणारच आहे त्या मेट्रो स्थानकाला नाव हे सिंधूनगर देण्याचे शहरातील सत्ताधारी राजकीय नेत्यांनी पररस्पर निर्णय घेतला सुद्धा आहे.  म्हणून वंचित_बहुजन_आघाडी प्रभाग क्र ४ च्या वतीने ह्या निर्णयाचा विरोध करत शहरात येणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या स्थानकाचे नाव सिंधूनगर न करता महाराष्ट्र घडवण्यासाठी जीवन झिजणारे बहुजनांसाठी लढणारे लोकनेते बहुजन नेते स्वर्गिय गोपिनाथ_मुंडे_साहेब हे नाव देण्यात यावे.  अशी मांगणी करण्यात आली आहे आज प्रांत कार्यालयावर निवेदन देण्यात आले निवेदन वंचित बहुजन आघाडीचे शहर सचिव हरेशभाऊ कथले,युवा शहर उपाध्यक्ष उज्वलभाऊ महाले (रंगीला), प्रभाग निरिक्षक ईश्वरभाऊ सोनवणे,शहर उपाध्यक्ष सुरेंद्र तिडके,वार्ड अध्यक्ष नितिन भालेराव,आरोग्य विभाग तात्या केदार, वार्ड उपाध्यक्ष मुक...

कंजारभाट समाजातील बांधवांनी जातीचे दाखले मिळावे या करिता अंबरनाथ तहसील कार्यालयावर केले उपोषण केले उपोषण

इमेज
कंजारभाट समाजातील बांधवांनी जातीचे दाखले मिळावे या करिता अंबरनाथ तहसील कार्यालयावर केले उपोषण केले उपोषण अंबरनाथ प्रतिनिधी समाजाच्याविकास व प्रगती करिता शिक्षण महत्त्वाचे आहे शिक्षण घेण्याकरिता व शासकीय सवलतीसाठी जातीच्या दाखल्याची गरज भासते याच अनुषंगाने दिनांक 24 नोव्हेंबर 2020 रोजी कंजारभाट समाजातील 117 लोकांच्या दाखल्याचे अर्ज अंबरनाथ तहसील कार्यालय या ठिकाणी सादर केले असताना ही जातीचे दाखले देण्यासाठी संबधित अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने. दिनांक 13 मार्च 2023 रोजी कंजार भाट समाज सामाजिक संस्थेच्या वतीने अंबरनाथ तहसीलदार कार्यालय या ठिकाणी उपोषण करण्यात आले अशी माहिती कंजार भाट समाज सामाजिक संस्था अध्यक्ष विनोद तामचेकर यांनी दिली या वेळी सल्लागार शेखर अभंगे, केवल अभंगे,कैलाश गुमाने, गणेश तमायचिकर, सागर गागडे, भिमराव इंगोले, सुंदर डांगे, विशाल गारुंगे, धनराज डांगे, पप्पू अभंगे, आनंद तामायचीकर, संगम गारूंगे, समर्थ तमायचीकर, गणेश नेतले, हेलन तमायाचिकर, दिपा तामचेकर, शारदा अभंगे, अतिश इंद्रेकर, उपस्थित होते बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी  संपर्क साध...

कुणी गोविंद घ्या...?' नाटक रंगभूमीवर येण्यास सज्ज

इमेज
' कुणी गोविंद घ्या...?' नाटक रंगभूमीवर येण्यास सज्ज ... आपण नात्यांत एकमेकांना गृहीत धरतो. स्वतःच वेगवेगळ्या कल्पना करून घेतो. पण एकमेकांशी बोलण्याने; तसेच आपण आपले मत शांतपणे मांडले तर समस्या नक्कीच सुटतात, असा विचार मांडणारे 'कुणी गोविंद घ्या...?' हे नवीन नाटक रंगभूमीवर येण्यास सज्ज झाले आहे. सध्या या नाटकाच्या तालमी जोरात रंगल्या आहेत. शुक्रवार, १७ मार्च रोजी गडकरी रंगायतन, ठाणे या नाट्यगृहात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.  या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन दीपेश सावंत यांनी केले आहे. प्रसाद रावराणे, सिद्धेश नलावडे आणि विभूती सावंत अशी तरुण कलाकारांची फळी या नाटकात भूमिका साकारत आहे. यशवंत क्रिएशन आणि अर्चना थिएटर्स यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. रॉबिन लोपेज व राम सगरे यांचे नेपथ्य, संकेत शेटगे यांचे संगीत व शिवाजी शिंदे यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे. उदयराज तांगडी हे निर्मिती प्रमुख आहेत. नाटकाचे निर्माते म्हणून मोनाली तांगडी, शेखर दाते व दुर्वा सावंत हे जबाबदारी सांभाळत आहेत.   प्रतिनिधी गणेश तळेकर मुंबई 

मनोहर बदरपटे यांचा वाढ दिवस साजरा

इमेज
मनोहर बदरपटे यांचा वाढ दिवस साजरा ...  अंबरनाथ :  नाथपंथी डवरी गोसावी समाज व भटके विमुक्त सामाजिक संस्था यांच्या वतीने मा श्री मनोहर बदपट्टे साहेब अपर सचिव मंत्रालय यांच्या वाढदिवश अंबरनाथ येथे साजरा करण्यात आले वाढदिवसानिमित्त केक कापुन सत्कार करण्यात आले  या प्रसंगी मा श्री सुंदरजी डांगे व भिमराव इंगोले प्रशुराम कुर्डे सुरेश जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते

अंबरनाथ मध्ये शिवजन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा

इमेज
अंबरनाथमध्ये_प्रथमच_भक्ती_शक्ती_चौकात_शिवजन्मोत्सव_मोठया_उत्साहात_साजरा!.   आगळा वेगळा शिव जयंती उत्सव मा. नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या संकल्पनेतून भक्ती शक्ती शिल्प उभारण्यात आलेल्या चौकामध्ये मा.सुभाष साळुंके व सुवर्णा साळुंके यांनी अंबरनाथ मध्ये प्रथमच शिवजन्मोत्सव व तुकाराम बीजे चे औचित्य साधून भजन संध्या, शिवजन्मोत्सव, शिवकालीन गाणी,नृत्य, पाळणा, फटाक्यांची आतिषबाजी तसेच शिवकालीन वेशभूषा इ. कार्यक्रम दि.९ व १० मार्च २०२३ रोजी मोठया उत्साहात साजरे करण्यात आले. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या वैंकुठगमन अर्थात तुकाराम बीज निमित्त वारकरी परंपरा जपत दि.९ मार्च रोजी सायं ७ ते ११ यावेळेत संगतीमय भजन संध्या स्थानिक पुरुष व महिला भजनी मंडळे सादर करुन उपस्थिताना मंत्रमुग्ध केले.   वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. अशोक भगत यांनी जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या भक्ती शिल्पास पुष्पमाला अर्पण करून तसेच सुभाष साळुंके,ह भ प मोरे महाराज व उत्तेकर महाराज यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून संगीतमय भजन संध्या कार्यक्रमाची सुरुवात केली ...