जनजागृती ग्राहक मंचाची पनवेल महावितरण कार्यालयावर धडक
*जनजागृती ग्राहक मंचाची पनवेल महावितरण कार्यालयावर धडक* पनवेल-मयूर भोसले गेल्या पंधरा दिवसांपासून पनवेल महावितरण कार्यालयातील अधिकारी वीज बिल न भरलेल्या ग्राहकांवर धडक कारवाया करताना दिसत आहेत़.ज्या ज्या वीज धारकांनी वीज बिल भरले नाहीत त्यांची वीज खंडित करून त्यांना वीज बिल भरण्यासाठी भाग पाडले जात आहे. विजेची बिलं भरून महावितरण कार्यालयाला मदत करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहें. पण जर वीज बिल आकारणी जास्त असेल वा बंद मीटरचे बिल वाढून आले असेल तर त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कोणी तरी पुढे यायला हवे. पनवेल मधील जन जाग्रुती ग्राहक मंच हे पनवेल मध्ये अतिशय सक्रिय असुन पनवेल मधील जनतेच्या हाकेला सद्देव उभे राहते.बंद मीटर च्या वाढीव बिलाचा असाच एक प्रकार पुढे आला असुन पनवेल मधील एका नामांकित डॉक्टरला गेल्या वर्ष भरा पासून बंद मीटरचे बिल भरावे लागतं आहें. वारंवार तक्रार करून सुध्दा महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना जाग आली नव्हती. सदर डॉक्टरांनी जनहित न्यूज महाराष्ट्रचे उप संपादक श्री मयूर भोसले यांच्या कडे संपर्क करताच जनजागृती ग्राहक मंच पनवेल यांकडे या बाबत तक्रार केली